डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य 2021 | Full Dr Babasaheb Ambedkar Social Work In Marathi

Dr Babasaheb Ambedkar Social Work In Marathi | डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य

आपला महाराष्ट्र हा खरोखरच महान आहे. महाराष्ट्राच्या या मातीत अनेक महान व्यक्ती होवून गेले. त्या महापुरुषांनी आपल्या समाजातील अनिष्ट प्रथा,परंपरा,चालीरीती नष्ट करण्याचा प्रयत्न केला.आपल्या समाजात जातीयता,अस्पृश्यता अशा वाईट चालीरीती होत्या.कनिष्ठ जातीतील लोकांना त्यांचे मुलभुत अधिकार नव्हते. अनेक महापुरुषांनी आपले जीवन कनिष्ठ जातींतील लोकांच्या विकासाकरिता व्यतीत केले. त्यापैकीच एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महान नेते होते. आजच्या या लेखात आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्यांची म्हणजेच dr babasaheb ambedkar social work in marathi विषयी माहिती घेऊ या.

शिक्षणाविषयी जागृती :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय समाजातील कनिष्ठ जातींतील लोक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत याची जाणीव झाली होती. केवळ शिक्षणाच्या अभावानेच आपल्या या लोकांची ही परिस्थिती झाली होती याची जाणीव त्यांनी कनिष्ठ जातींतील लोकांना करून दिली. कनिष्ठ जातीतील लोकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यासाठी प्रोत्साहन दिले. शाळेत जाणाऱ्या या मुलांना त्यांनी शिष्यवृत्ती,गणवेश,भोजन आणि निवारा अशा मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना ‘ शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ‘ असा उन्नतीचा मूलमंत्र दिला.

हे ही वाचा : नालंदा विद्यापीठ Nalanda University History In Marathi 2021 | नालंदा विद्यापीठाचा इतिहास

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इतरांना शिक्षण घेण्याचा आदर्श स्वताच्या जीवनातून दिला. बाबासाहेबांनी अत्यंत कठिन परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. ते स्वता उच्चविद्याविभुषित होते.परदेशातील विद्यापीठातुन अर्थशास्त्रात पदवी संपादन करणारे बाबासाहेब पहिले भारतीय होते.

हे ही वाचा राजा राममोहन रॉय

बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली :dr babasaheb ambedkar social work in marathi

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य 2021 | Dr Babasaheb Ambedkar Social Work In Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कनिष्ठ जातींतील लोकांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. ४ जानेवारी १९२५ साली त्यांनी सोलापूर येथे एक वसतिगृह स्थापन केले. त्याद्वारे कनिष्ठ जातींतील विद्यार्थ्यांना निवास,जेवण,गणवेश आणि शैक्षणिक साहित्य पुरविले. पुढे सोलापूर नगरपालिकेकडून चाळीस हजार रुपयांचे अनुदान प्राप्त करून दिले.

See also  India's First Nuclear Test 1974 Information In Marathi | भारताची अणुचाचणीकडे  यशस्वी वाटचाल

हे ही वाचा राजकुमारी अमृत कौर 

पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली :dr babasaheb ambedkar social work in marathi

बाबासाहेबांनी केवळ अस्पृश्य वर्गातील लोकांसाठीच शैक्षणिक प्रयत्न केले नाहीत. तर निम्न मध्यम वर्गातील लोकांनी शिक्षण घेतले पाहिजे यासाठी प्रयत्न केलेत. त्यासाठी त्यांनी ८ जुलै १९४५ साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्यानंतर १९४६ ला त्यांनी मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, १९५० मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय स्थापन केले. तसेच मुंबई येथेच १९५३ मध्ये सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र आणि सिद्धार्थ विधी महाविद्यालय स्थापन केले.

हे ही वाचा : लाल बहादूर शास्त्री यांच्या विषयी माहिती 

वृत्तपत्र आणि ग्रंथाद्वारे जागृती :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खूप मोठे विद्वान होते. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. त्यासाठी त्यांनी आपल्या घरातच एक ग्रंथालय बनविले होते. आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी काही महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले. ते ग्रंथ सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या फार महत्त्वाचे आहेत. ते ग्रंथ वाचल्याशिवाय आपल्याला त्या ग्रंथांचे महत्त्व लक्षात येणार नाही. ते ग्रंथ आहेत – कास्ट इन इंडिया इट्स मॅकेनिझम अँड जेनेसिस, अन्निहीलेशन ऑफ कास्ट, हू वेअर द शुद्राज ?, बुद्ध अँड हिज धम्म, रिडल्स इन हिंदूइझम इत्यादी.

हे ही वाचा : आम्रपाली

Vaishalichi Nagarvadhu Amrapali | आम्रपाली एक शापित सौंदर्यवती

ग्रंथ लेखणासोबतच त्यांनी वृत्तपत्रे पण सुरू केलीत. राजर्षी शाहू महाराजांनी वृत्तपत्रांवर असलेली उच्च वर्गीय लोकांची मक्तेदारी मोडून काढली. त्यानंतर बाबासाहेबांनी वृत्तपत्रे सुरू केली. त्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी आर्थिक सहाय्य देखील केले.१९२० साली बाबासाहेबांनी मूकनायक हे साप्ताहिक सुरू केले. पुढे १९२७ ला बहिष्कृत भारत व समाज समता संघ ही तर १९२९ ला समता आणि १९३० साली जनता ही वृत्तपत्रे सुरू केलीत. त्याद्वारे बाबासाहेबांनी कनिष्ठ जातींतील लोकांना जागृत करण्याचे कार्य केले.

See also  लाल बहादुर शास्त्री विषयी माहिती 2021 | Full Lal Bahadur Shastri Information In Marathi

हे ही वाचा आयरन लेडी इंदिरा गांधी 

अस्पृश्यतेविरुद्ध चळवळ :

भारतातील कनिष्ठ जातीमधील लोकांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते त्याची बाबासाहेब यांना पूर्ण कल्पना होती. मंदिरामध्ये  प्रवेश नाही. शाळा,  विहिरी ,दवाखाने, रस्ते अशा सार्वजानिक ठिकाणी कनिष्ठ जातीमधील लोकांना मुक्त वावर नव्हता.  तसेच त्यांना पायात चप्पल घालने, छत्री वापरणे, घोडा वापरणे, जमीन विकत घेणे या गोष्टींना मनाई होती. थोडक्यात मुलभुत मानवी हक्कांपासुन कनिष्ठ जातीतील लोकांना वंचित केलेले होते.

बाबासाहेब आंबेडकर यांनी याविरुध्द चळवळ उभारली. सत्याग्रहाच्या माध्यमातून अस्पृश्यांना त्यांचे हक्क प्राप्त करून देण्यास लढा उभारला. महाड येथील चवदार तळे अस्पृश्यांना खुले करून देण्यासाठी तसेच  नाशिकातील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी सत्याग्रह केला.

हे ही वाचा महाराष्ट्र राज्याची निर्मिती 

मनुस्मृतीचे दहन :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते दलितांच्या सर्व समस्यांचे मूळ मनुस्मृती या ग्रंथातच आहे. अंदाजे २००० वर्षांपूर्वी लिहलेला हा ग्रंथ हिंदू धर्मासाठी मार्गदर्शक आहे. परंतु याच ग्रंथामध्ये कनिष्ठ जातीतील लोकांवर खुप बंधने टाकलेली आहेत. ही बंधने असताना कनिष्ठ जातीतील लोकांचा विकास होणे शक्यच नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी अन्याय,आणि विषमतेचे प्रतिक असलेल्या मनुस्मृती या ग्रंथाचे १९२७ साली जाहीरपणे दहन केले.

राजकीय कार्य –  dr babasaheb ambedkar social work in marathi

अस्पृश्यांना भारतात कोणतेही राजकीय हक्क त्यावेळी नव्हते. अस्पृश्यांना राजकीय प्रवाहात आणणे आवश्यक होते. त्यासाठीच  डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९३० मध्ये लंडन येथे झालेल्या पहिल्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहिले. त्या परिषदेमध्ये त्यांनी भारतातील अस्पृश्यांची परिस्थिती सर्वांसमोर मांडली. त्यांनी अस्पृश्यता निर्मुलनाची जोरदार मागणी केली. अल्पसंख्याकांसाठी नेमलेल्या समितीसमोर त्यांनी भारतातील सर्व अस्पृश्य समुदायाच्या मूलभूत हक्कांचा एक जाहीरनामा तयार करून सादर केला. या जाहीरनाम्यात त्यांनी अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्यात यावा अशी मागणी केली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य 2021 | Dr Babasaheb Ambedkar Social Work In Marathi

ब्रिटिश सरकारने हा जाहीरनामा मान्य केला. परंतु महात्मा गांधीजींनी मात्र या जाहीरनाम्याला विरोध केला. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ या मागणीला गांधीजींनी विरोध केला. त्यासाठी त्यांनी पुण्यातील येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरु केले. बाबासाहेबांनी शेवटी गांधीजींची भेट घेतली. त्याभेटीत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी सोडली आणि त्याऐवजी कायदेमंडळात अस्पृश्यांना राखीव जागा असाव्या याला मान्यता दिली. हाच सुप्रसिध्द पुणे करार होय.

See also  Information About Commonwealth Of Nations 2021 | राष्ट्रकुलबाबत माहिती

त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३६ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. पुढे त्यांनी १९४२ मध्ये ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनची स्थापना केली.  स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरू यांच्या नेत्रुत्वाखालील मंत्रीमंडळात ते कायदेमंत्री होते. ऑगस्ट १९४७ मध्ये त्यांची भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. बाबासाहेबांनी लिहालेल्या राज्यघटनेची अमलबजावणी २६ जानेवारी १९५० ला झाली. ही बाब आपल्यासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे.

बाबासाहेब कायदेमंत्री असतांना त्यांनी संसदेत हिंदू कोड बिल सादर केले. मात्र त्या बिलास विरोध झाला आणि परिणामी  बाबासाहेबांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

बौद्ध धर्माचा स्वीकार :

१३ ऑक्टोबर १९३५ ला नाशिक जिल्यातील येवला या गावात भरलेल्या परिषदेत भाषण करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असे  जाहीर केले की, ‘ दुर्दैवाने मी हिंदू धर्मात अस्पृश्य म्हणून जन्मलो, हे माझ्या हातात नव्हते. परंतु मी असे जाहीर करतो की , मी हिंदू म्हणून मरणार नाही! याठिकाणीच बाबासाहेबांनी धर्मांतराचा निर्णय घेतला. कारण जातिव्यवस्था ही भारताला एक शापच आहे. त्यामुळ अस्पृश्यांची परिस्थिती आणि सामाजिक दर्जा सुधारणार नाही. धार्मिक गुलामगिरीतुन मुक्त होण्यासाठी धर्मांतर करणे आवश्यक आहे असे बाबासाहेब यांना वाटले.

बाबासाहेबांनी धर्मांतराचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी बौद्ध, इस्लाम , ख्रिचन, आणि शीख या धर्मांचा सखोल अभ्यास करून शेवटी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी आपल्या लाखों अनुयायांसह १४ ऑक्टोबर १९५६ ला नागपुर येथे  बौद्ध भिक्खू चंद्रमणी महस्थविर यांच्या हस्ते बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.

मात्र यानंतर काही काळातच ६ डिसेंबर १९५६ ला दिल्ली येथे त्यांचे महापरिनिर्वाण झाले आणि भारत मातेचा महान सुपुत्र आपल्याला सोडून गेले. मात्र त्यांचे विचार आणि कार्य हे आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे आजही प्रकाश देत आहेत. ३१ मार्च १९९० ला भारत सरकारने त्यांना  मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अशा या थोर महापुरुषामुळेच भारतीय समाजाची प्रगती झाली.

आपण ह्या पोस्ट मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती घेतली . तुम्हाला जर rajarshi shahu maharaj information in marathi बद्दल माहिती जाणून घायची असेल तर तुम्ही हि पोस्ट वाचू शकता .

तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com ला भेट देऊ शकता.

Spread the love

13 thoughts on “डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य 2021 | Full Dr Babasaheb Ambedkar Social Work In Marathi”

Leave a Comment