हरित क्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन यांच्याविषयी माहिती | M. S. Swaminathan Information In Marathi 2023

हरित क्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन यांच्याविषयी माहिती | M.S. Swaminathan Information In Marathi 2023

S.M. Swaminathan Information In Marathi 2023
S.M. Swaminathan Information In Marathi 2023

हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन (M.S. Swaminathan Information In Marathi 2023) यांनी भारतीय कृषी क्षेत्रात खूप मोलाचे कार्य केले आहे. मित्रांनो आजच्या या लेखात आपण एम एस स्वामीनाथन यांच्याविषयी माहिती जाणून घेऊ या.

एम एस स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 साली तामिळनाडूमधील तंजावर जिल्ह्यात झाला.

1949 साला पासूनच त्यांनी गहू, बटाटा, ज्यूट आणि तांदूळ यांच्या प्रजातीवर संशोधन सुरू केले.

1960 मध्ये भारतात एम एस स्वामीनाथन यांनी केलेल्या हरित क्रांतीने भारतीय कृषी क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन झाले.

भारतातील अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी तांदुळाच्या विविध प्रकारच्या भरघोष उत्पन्न देणाऱ्या प्रजाती एम एस स्वामीनाथन यांनी विकसित केल्या.

एम एस स्वामीनाथन यांची कारकीर्द : M. S. Swaminathan Information In Marathi 2023

एम एस स्वामीनाथन यांनी आपल्या सेवा काळात  विविध पदांवर कार्य केले. 1961-1972 या काळात त्यांनी भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या संचालक पदाचा कार्यभार सांभाळला.

1972-1979 या दरम्यान एम एस स्वामीनाथन यांनी आयसीएआर चे महासंचालक तसेच केंद्रीय कृषी विभागाचे सचिव पदाचा कार्यभार सांभाळला. पुढल्याच वर्षी ते कृषी खात्याचे सचिव बनले.

पुढे 1980-1982 या काळात एम एस स्वामीनाथन यांनी नियोजन आयोगाचे उपसंचालक म्हणून कार्य केले.

एम एस स्वामीनाथन यांनी 1982-1988 इंटरनॅशनल राइस रिसर्च इन्स्टिट्यूटचे महासंचालक पदाचा कार्यभार सांभाळला.

वाढत्या शेतकरी आत्महत्येमुळे एम एस स्वामीनाथन यांची 2004 साली राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

दोन वर्षांत त्यांनी आपल्या आयोगाचा अहवाल सादर केला. त्यात एम एस स्वामीनाथन यांनी शेतकऱ्यांच्या कृषी मालाला उत्पादन खर्चाच्या किमान दुप्पट हमीभाव देण्याची शिफारस केली होती.

हे ही वाचा : अक्षय उर्जेचे जनक 

एम एस स्वामीनाथन यांना मिळालेले पुरस्कार : M.S. Swaminathan Information In Marathi 2023

1987 साली एम एस स्वामीनाथन यांना पहिला विश्व अन्न पुरस्कार प्राप्त झाला. 1971 ला त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. अल्बर्ट आईन्स्टाईन वर्ल्ड सायन्स अवॉर्ड 1986 त्यांना प्राप्त झाला.

See also  जगातील पहिली महिला अंतराळवीर | World's First Woman Astronuat

या व्यतिरिक्त एम एस स्वामीनाथन यांना विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांमध्ये लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार, इंदिरा गांधी पुरस्कार, एच. के . फिरोदिया पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

एम एस स्वामीनाथन यांचा वयाच्या 98 व्या वर्षी 28 सप्टेंबर 2023 मृत्यू झाला.

सौजन्य – दैनिक लोकसत्ता

Please Do Visit www.aboutindianenglish.comhttp://www.aboutindianenglish.com

 

 

 

Spread the love

Leave a Comment