Table of Contents
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी माहिती | Dr. Sarvepalli Radhakrishnan Information In Marathi 2022
Dr. Sarvepalli Radhakrishnan Information In Marathi 2022 थोर भारतीय तत्वज्ञ असलेले भारताचे पहिले उपराष्ट्रपती तसेच दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी माहिती आपण आजच्या या लेखात जाणून घेऊ या.
सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रारंभिक जीवन :Dr. Sarvepalli Radhakrishnan Information In Marathi 2022
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म तामिळनाडूतील तत्कालीन मद्रास संस्थानातील तिरूत्तनी येथे 5 सप्टेंबर 1888 ला झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सर्वपल्ली विरस्वामी तर आईचे नाव सिताम्मा होते. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. त्यांच्या पत्नीचे नाव सिवकामु होते. त्यांना एक मुलगा आणि पाच मुली होत्या. मुलाचे नाव सर्वपल्ली गोपाल असे होते.
हे ही नक्की वाचा: सॉक्रेटिस एक महान तत्वज्ञ Socrates Information In Marathi | महान तत्वज्ञ सॉक्रेटीसबद्दल माहिती
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची शैक्षणिक कारकीर्द
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण मद्रास ख्रिश्चन कॉलेज मधून पूर्ण केले. त्यांनी तत्वज्ञान आणि नीतिशास्त्र हे विषय घेऊन त्यात प्राविण्य मिळविले. लहानपणा पासूनच कुशाग्र बुद्धीच्या जोरावर त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या प्राप्त केल्या.
आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 1918 ते 1921या काळात मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज आणि म्हैसूर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्य केले. म्हैसूर विद्यापीठातर्फे डॉ. राधाकृष्णन यांचा तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून गौरविण्यात आले होते.
कोलकाता विद्यापीठात डॉ. राधाकृष्णन यांनी 1921 ते 1931 या दरम्यान तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कार्य केले.
1931 ते 1936 या काळात डॉ. राधाकृष्णन यांनी आंध्र विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून कार्य केले. तर 1939 ते 1948 या दरम्यान बनारस विद्यापीठाचे कुलगुरु पद सांभाळले. 1939 साली आंध्र विद्यापीठाने त्यांना डी. लिट. ही पदवी बहाल केली. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातदेखील अध्यापनाचे कार्य केले. भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून त्यांचा नावलौकिक होता. ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे त्यांच्या सन्मानार्थ ‘ राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट ‘ हा पुरस्कार देण्यात येतो ब्रिटनने 1931 सा त्यांचा सर ही पदवी देऊन गौरव केला.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची राजकीय कारकीर्द
सन 1946 ते 1949 या काळात घटना समितीतही डॉ. राधाकृष्णन यांनी कार्य केले. 1952 ला ते स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती बनले. त्यानंतर 1957 मध्ये ते पुन्हा उपराष्ट्रपती बनले. 1954 ला भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्नने त्यांना सन्मानित केले गेले.
त्यानंतर 1962 ला देशाचे दुसरे राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आली. 1967 ला ते राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन – एक थोर तत्वचिंतक : Dr. Sarvepalli Radhakrishnan Information In Marathi 2022
पाश्चिमात्य जगताला भारतीय चिद्वादाची तात्विक ओळख करून देणारे अशी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची ख्याती आहे. तत्वज्ञान आणि नीतिशास्त्र हे विषय त्यांच्या आवडीचे होते. त्या अनुषंगाने ते नेहमी विचार करीत असत.
नरहर कुरुंदकर असे लिहितात की, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे तीन प्रश्नावर नेहमी चिंतन करीत असत. बऱ्याचदा कोणाशी चर्चा करतांना ते या प्रश्नांच्या अनुषंगानेच बोलत असत. ते तीन प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत.
पहिला प्रश्न असा की, नीतिमान परंतु चिकित्सक, विज्ञानोन्मुख परंतु अध्यात्मप्वण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल? याकरिता शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकतो का ?
दुसऱ्या प्रश्नाबाबत नरहर कुरुंदकरांनी लिहिले की, प्राचीन भारतीय तत्वचिंतन संपूर्ण जगताला आधुनिक भाषाशैलीत, आधुनिक पद्धतीने कसे समजावून सांगता येईल? भारतीय तत्वचिंतनाचे वैभव या जगाला नेमकेपणाने कसे सांगावे? कसे पटवून देता येईल?
तिसऱ्या प्रश्नाबाबत पुढे नरहर कुरुंदकर म्हणतात की, संपूर्ण मानव जातीचे भवितव्य घडविण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती?
यावरून लक्षात येते की, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि आधुनिक जग यांच्यात समन्वय साधण्याचा दृष्टिकोनातून विचार करीत होते.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी लिहिलेले काही महत्त्वाचे ग्रंथ
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे थोर तत्वज्ञानी होते. त्यांनी लिहिलेले काही महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत.
- The Ethics of Vedanta and it’s metyphiscal presuppositions (1908)
- Essentials of Psychology (1912)
- Indian Philosophy : volume 1 (1922)
- The Hindu View of Life(1926)
- Indian Philosophy : volume 2 (1927)
- Kalki or the Future of civilization (1929)
- East and West in Religion (1933)
- Gautama, The Buddha ( British Academy Lecturs) (1938)
- Eastern Religions and Western Thoughts (1939)
- Is This peace (1945)
- The Bhagavadgita (1948)
- The concept of Man (1960)
- The Creative Life (1975)
- Indian Religions (1979)
अशा या ऋषितुल्य डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
17 एप्रिल 1975 ला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा मृत्यू झाला.
मित्रांनो तुम्हाला आमचा Dr. Sarvepalli Radhakrishnan Information In Marathi 2022 हा लेख आवडला तर नक्की शेअर करा.
तुम्ही आमच्या मराठी माहिती http://www.marathimahiti.comया वेबसाईटला जरूर भेट द्या.
सौजन्य : गुगल