महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या पदवीधर उमेदवारांना मिळेल युपीएससी परीक्षेच्या संपूर्ण तयारीचे दिल्ली येथे प्रशिक्षण | UPSC Civil Services Preparation Training For ST Category 2022

महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या पदवीधर उमेदवारांना मिळेल युपीएससी परीक्षेच्या संपूर्ण तयारीचे दिल्ली येथे प्रशिक्षण | UPSC Civil Services Preparation Training For ST Category 2022

UPSC Civil Services Preparation Training For ST Category 2022
Source : Facebook

महाराष्ट्रातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था , पुणे या संस्थेने अनुसूचित जमातीच्या (UPSC Civil Services Preparation Training For ST Category 2022) पदवीधर उमेदवारांसाठी नुकतीच एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था , पुणे यावर्षी महाराष्ट्रातील 100 अनुसूचित जमातीच्या पदवीधर उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा (UPSC) परीक्षा (पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत) संपूर्ण तयारीकरिता सोय उपलब्ध करून देणार आहे.

दिल्ली येथील नावाजलेल्या संस्थेमध्ये महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या पदवीधर उमेदवारांना UPSC Civil Services Preparation बाबतचे ट्रेनिंग या संस्थेमार्फत देण्यात येणार आहे.

हे ही वाचा : बिरसा मुंडा मेडिकल हबबिरसा मुंडा मेडिकल हब नाशिक | Birasa Munda Medical Hub Nashik 2022

महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या पदवीधर उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांची निवड ही सामाईक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test – CET) द्वारे गुणांकन पद्धतीने केली जाईल.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या उमेदवाराची शैक्षणिक अर्हता आणि सामाईक प्रवेश परीक्षेत मिळालेले गुण यानुसार निवड करण्याचे अंतिम अधिकार आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था , पुणे या संस्थेला राहतील.

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था , पुणे या संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी लिंक दिनांक 1 सप्टेंबर 2022 ते 20 सप्टेंबर 2022 पर्यंतच राहील.

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत 20 सप्टेंबर 2022 आहे.

तरी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या योजनेचा फायदा घ्यावा.

अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था , पुणे या संस्थेच्या खालील लिंकवर क्लिक करा.

https://trti.maharashtra.gov.in/index.php/mr/#upsc

मित्रांनो हा लेख जरूर आपल्या मित्रांना शेअर करा.

See also  रिटर्न 31 जुलैच्या आतच भरा, नाहीतर .....

 

Spread the love

Leave a Comment