कान्हा नॅशनल पार्क मध्य प्रदेश माहिती | Kanha National Park Madhya Pradesh 2024

कान्हा नॅशनल पार्क मध्य प्रदेश माहिती | Kanha National Park Madhya Pradesh 2024

तुम्हाला निसर्गाचा सहवास आवडत असेल तर तुम्हाला जंगल सफारीसाठी कान्हा नॅशनल पार्क (Kanha National Park Madhya Pradesh 2024) हे एक उत्तम पर्याय आहे. या ठिकाणी येऊन तुम्ही नेहमीच्या जीवनातून सवड काढून निसर्गाचा मनमुराद आनंद घेऊ शकता. कान्हा नॅशनल पार्क हे जगातील उत्कृष्ट अभयारण्यापैकी एक आहे.

चला तर मित्रांनो आजच्या या लेखात आपण मध्य प्रदेशमधील बालाघाट आणि मंडला या जिल्ह्यात वसलेल्या कान्हा नॅशनल पार्क बाबत माहिती जाणून घेऊ शकता.

कान्हा नॅशनल पार्क माहिती : Kanha National Park Madhya Pradesh 2024

मध्य प्रदेशमधील बालाघाट आणि मंडला या जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या मैकल पर्वत रांगेत हे कान्हा नॅशनल पार्क वसलेले आहे. या नॅशनल पार्कला सन 1879 ला संरक्षित उद्यान म्हणून दर्जा मिळाला तर राष्ट्रीय उद्यान म्हणून 1 जून 1955ला घोषणा झाली.

सन 1973 ला कान्हा नॅशनल पार्क वाघांसाठी संरक्षित क्षेत्र (Tiger Reserve) घोषित करण्यात आले. हा देशातील पहिला व्याघ्र प्रकल्प म्हणून गणल्या जातो. आज भारतातील सर्वात यशस्वी व्याघ्र प्रकल्प म्हणून कान्हा राष्ट्रीय उद्यान ओळखले जाते.

या नॅशनल पार्क बाबत आणखी महत्त्वाचे सांगायचे झाल्यास सुप्रसिध्द नोबेल पारितोषिक विजेते रुडयार्ड किपलिंग यांना त्यांच्या जगप्रसिध्द जंगल बुक या कांदबरीसाठी कल्पना कान्हा नॅशनल पार्क वरूनच सुचलेली आहे.

See also  गीझाचा भव्य पिरॅमिड विषयी माहिती 2021 | Full Information About Pyramid Of Giza In Marathi

कान्हा नॅशनल पार्क अगोदर हलून आणि बंजर या दोन अभयारण्यामध्ये विभागलेले होते. हे नॅशनल पार्क तसे 940 चौ. किमी परसरत तर बफर आणि कोर झोन मिळून एकूण सुमारे 1945 चौ.किमी. परिसरात पसरलेले आहे.

कान्हा नॅशनल पार्क येथील जंगल प्रकार : Kanha National Park Madhya Pradesh 2024

या नॅशनल पार्क मधील जंगल पानगळी प्रकारात मोडते. येथील जंगलात साल वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळून येतात. पर्यावरणाच्या दृष्टीने विविध प्रकारच्या वनस्पती येथे आढळून येतात.

व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित झाल्यावर या जंगलातील परिसर निर्मनुष्य करण्यात आला. त्यामुळे येथील जंगलात मोठमोठी कुरणे निर्माण झाली. त्यामुळे वन्यजीव देखील मोठ्या प्रमाणात वाढले.

कान्हा नॅशनल पार्क येथे आढळणारे वन्यजीव :

Kanha National Park Madhya Pradesh 2024
Kanha National Park Madhya Pradesh 2024

कान्हा नॅशनल पार्क खऱ्या अर्थाने वन्यप्राण्यांसाठी नंदनवन आहे. प्राणी कान्हा नॅशनल पार्क मुख्यतः व्याघ्र प्रकल्प आहे. त्यामुळे या ठिकाणी वाघ मोठ्या प्रमाणात आढळून येतात.

हमखास वाघांचे दर्शन होणारा हा व्याघ्र प्रकल्प ओळखला जातो. आजच्या घडीला या व्याघ्र प्रकल्पात विविध प्रकारचे सुमारे 500 च्या आसपास वाघ आढळून आले आहेत.

हे ही वाचा:  Kaziranga National Park Information In Marathi | काझीरंगा राष्ट्रीय उद्यान मराठी माहिती

वाघांच्या खेरीज या जंगलात बिबट, रानडुक्कर, जंगली कुत्रे, अस्वल, कोल्हे , लांडगे, उदमांजर, खवल्या मांजर, रान मांजर, मुंगूस, तरास इ. हिंस्त्र पशू आढळतात. तर रानगवे, चितळ, बारासिंगा, सांबर , काळवीट, नीलगायी आणि साळिंदर, माकडे असे प्राणी आढळतात.

याखेरीज कोब्रा, नाग, घोणस, अजगर असे सरपटणारे प्राणी भरपूर मोठ्या प्रमाणात आढळून येतात.

कान्हा नॅशनल पार्क येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ:

कान्हा नॅशनल पार्कला भेट देऊन तेथील निसर्गाचा मुक्त आनंद तुम्ही घेऊ शकता. त्या करिता ऑक्टोबर ते जून हा काळ उत्तम आहे.

कान्हा नॅशनल पार्क येथे कसे जायचे?

हवाई मार्ग :

भारतातील मोठ मोठ्या शहरातून नागपूर, जबलपूर, गोंदिया आणि रायपूर साठी दररोज हवाई सेवा आहे. तेथून by road जाऊ शकता.

See also  सुंदरबन राष्ट्रीय उद्यान माहिती | Sundarban National Park Information In Marathi 2023

कान्हा नॅशनल पार्क जवळ असलेल्या बिरवा या ठिकाणी छोटी विमाने उतरू शकतात. तेथून 1 तासात तुम्ही कान्हा नॅशनल पार्क येथे पोहोचू शकता.

रेल्वे मार्ग :

देशभरातून रेल्वे मार्गाने कान्हा नॅशनल पार्क जोडलेले आहे. जबलपूर, नागपूर, रायपूर, गोंदिया आणि कटनी ही रेल्वे स्टेशन सोईची आहेत. तेथून by road जाऊ शकता.

कान्हा नॅशनल पार्क हे जबलपूर येथून सुमारे 160 किमी, नागपूर येथून सुमारे 300 किमी तर रायपूर आणि बिलासपूर पासून 250 किमी आहे.

पेंच राष्ट्रीय उद्यान पासून कान्हा नॅशनल पार्क 200 किमी आहे.

नेहमीच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात राहून बघा, नवी उमेद नक्की मिळेल.

आमचा Kanha National Park Madhya Pradesh 2024 हा लेख आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा.

संदर्भ : गुगल.

Spread the love

Leave a Comment