Kaziranga National Park Information In Marathi | काझीरंगा राष्ट्रीय उद्यान मराठी माहिती

Kaziranga National Park Information In Marathi | काझीरंगा राष्ट्रीय उद्यान मराठी माहिती

kaziranga-national-park-information-in-marathi
kaziranga-national-park-information-in-marathi

kaziranga-national-park-information-in-marathi संयुक्त राष्ट्र संघाची शैक्षणिक , वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना म्हणजेच युनेस्को (UNESCO) जगातील सांस्कृतिक वा नैसर्गिक वारसा जोपासण्यासाठी उत्कृष्ट वैश्विक मूल्य असलेल्या स्थळांची जागतिक वारसा स्थळ म्हणून निवड करीत असते. आजच्या या लेखात आपण भारतातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान या जागतिक वारसा स्थळाची माहिती जाणून घेऊ या.

हे ही वाचा : भीम बेटका गुहा 

 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान माहिती : kaziranga-national-park-information-in-marathi

भारतातील आसाम या राज्यातील गोलाघाट आणि नागांव या दोन जिल्ह्यांत काझीरंगा राष्ट्रीय उद्यान वसलेले आहे. 1985 ला या अभयारण्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा प्राप्त झाला.

या अभयारण्याचे क्षेत्रफळ 378 चौ. किमी.आहे. काझीरंगा अभयारण्य हे पूर्व – पश्चिम सुमारे 40 किमी आहे. तर उत्तर – दक्षिण 13 किमी. आहे. या उद्यानाची स्थापना 1974 ला झाली. परंतु काझीरंगाला 1905 लाच संरक्षित वनक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे.

काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातून चार प्रमुख नद्या वाहतात. ब्रम्हपुत्रा ही त्यातील एक प्रमुख नदी आहे.

काझीरंगा हे नाव कसे पडले ? History of Kaziranga

या राष्ट्रीय उद्यानाचे काझीरंगा हे नाव पडण्यामागे एक आख्यायिका आहे. त्या आख्यायिकेनुसार या परिसरातील रंगा नावाची मुलगी आणि काझी नावाच्या मुलगा यांच्यात प्रेम होते. दोघांच्याही घरून यांच्या विवाहास विरोध होता. त्यामुळे दोघेही जंगलात पळून गेले आणि तेथेच राहू लागले. त्यावरूनच या जंगलाला काझीरंगा हे नाव मिळाले.

परंतु काझीरंगा परिसरातील स्थानिक लोकांच्या मते कार्बी भाषेतील काझीर-ए -रंग यावरून काझीरंगा हे नाव मिळाले. हे मात्र निश्चित की, फार पूर्वीपासून काझीरंगा हे नाव त्या अभयाण्यास पडलेले आहे.

See also  गीझाचा भव्य पिरॅमिड विषयी माहिती 2021 | Full Information About Pyramid Of Giza In Marathi

काझीरंगा अभयारण्य – एक जागतिक वारसा स्थळ – काझीरंगा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ? काझीरंगा उद्यानात कोणकोणते प्राणी आढळतात ?

kaziranga-national-park-information-in-marathi

काझीरंगा अभयारण्य हे एक शिंगी गेंड्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. जगातील एक सिंगी गेंड्यांपैकी 2/3 गेंडे या अभयारण्यात आहेत. मार्च 2015 ला झालेल्या पशुगणनेनुसार या अभयारण्यात 2401 एक शिंगी गेंडे होते.

जगातील सर्वात मोठा वाघ काझीरंगा अभयारण्यात आहे. या अभयारण्यात वाघही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे याला भारतीय वाघांचे घर असेही म्हटले जाते. या ठिकाणी 118 वाघ आहेत. काझीरंगाला 2006 ला व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले. बिबटे देखील पुष्कळ प्रमाणात आहेत.

kaziranga-national-park-information-in-marathi

सहसा भारतात इतरत्र न आढळणारे प्राणी, पक्षी या ठिकाणी आढळून येतात. काझीरंगामध्ये पांढऱ्या चेहऱ्याचा हंस , काळ्या रंगाचा गळा असलेला सारस, जाळीदार अजगर, रॉक पायथन, किंग कोब्रा, लेसर कॅस्ट्रोल, पल्स फिश ईगल,  इंडियन ग्रे मुंगुस, बंगाल फ़ोक्ष, गोल्देन लंगुर, इंडियन पंगोलीन इत्यादी.

जैवविविधतेने नटलेल्या या अभयारण्यात विविध प्रकारच्या वनस्पती, झाडे आढळून येतात. पर्यटकांचे हे एक आवडीचे ठिकाण आहे. जगभरातून हौसी पर्यटक येथे दरवर्षी येत असतात.

मित्रांनो तुम्हाला kaziranga-national-park-information-in-marathi आमचा हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा.

तुम्ही आमच्या अंतरंग आणि ईतिहासाची सोनेरी पाने या फेसबुक पेजवर जाऊन विविध प्रकारच्या माहिती जाणून घेऊ शकता.

तुम्ही मराठी माहिती या वेबसाईटला भेट देऊ शकता.

संदर्भ : गुगल

Spread the love

3 thoughts on “Kaziranga National Park Information In Marathi | काझीरंगा राष्ट्रीय उद्यान मराठी माहिती”

Leave a Comment