Matheran Hill Station 2022 | माथेरान थंड हवेचे ठिकाण माहिती

Matheran Hill Station 2022 | माथेरान थंड हवेचे ठिकाण माहिती

Matheran Hill Station 2022

Matheran Hill Station 2022 आपला महाराष्ट्र हा अप्रतिम निसर्गाने फुललेला आहे. महाराष्ट्रातील काही प्रदेशांवर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेली आहे. अशा या प्रदेशांपैकी एक म्हणजे कोकणची भूमी होय.

कोकणातील अनेक अशी ठिकाणे आहेत कि ती अतिसुंदर असून पर्यटकांना आपल्याकडे येण्यास आतुर करतात.

रायगड जिल्ह्यात असलेले माथेरान हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांचे आवडीचे पर्यटनस्थळ आहे. आजच्या या लेखात आपण माथेरान या थंड हवेच्या ठिकाणाबाबत माहिती घेऊ या.

माथेरान हे रायगड जिल्ह्यात असून सह्याद्री पर्वतापासून वेगळ्या झालेल्या एका डोंगर रांगेवर आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण समुद्र सपाटीपासून सुमारे 803 मीटर म्हणजे 2600 फुट उंचीवर आहे.

हे ही वाचा : काझीरंगा अभयारण्य माहिती Kaziranga National Park Information In Marathi | काझीरंगा राष्ट्रीय उद्यान मराठी माहिती

माथेरान मुंबई पासून जवळपास 110 किमी तर पिंपरी चिंचवडपासून सुमारे 100 किमी लांब आहे. त्यामुळे week End आणि holidays ला या हिल स्टेशनच्या ठिकाणी पर्यटकांची खूप वर्दळ राहते.

See also  The Somnath Temple full information in marathi 2021 | सोमनाथ मंदिर विषयी माहिती

माथेरान या गावाची वस्ती पूर्वीपासूनच होती. मात्र त्या वस्तीचा वा गावाचा विकास ब्रिटिशांनी केला. मुंबईपासून माथेरान जवळ असल्याने आणि तेथील वातावरण थंड असल्याने इसवी सन 1850 मध्ये मुंबईचा तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन आणि ठाण्याचा तत्कालीन कलेक्टर ह्यूज मैलेट या दोघांनी माथेरान शोधले.

निसर्गाच्या कुशीत कोणाला वेळ घालवायला आवडणार नाही. अगदी तसेच या ब्रिटीश अधिकाऱ्यांना झाले आणि त्यांनी या क्षेत्राचा विकास करण्यास सुरवात केली. महाबळेश्वर नंतर थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरानचा नंबर लागतो.

ज्या ब्रिटीश अधिकाऱ्यांनी माथेरानचा विकास केला त्यांनीच येथील ठिकाणांची वेगवेगळी नावे दिली. म्हणूनच बऱ्याच पॉइंटची नावे त्यांच्या नावावर आहेत. जसे पॅनोरमा,गार्बट,हार्ट ,लिटल चौक ,ग्रेट चौक ,वन ट्री हिल,डेंजर ,लुईसा ,बार्टल,एको,मंकी, इत्यादी.

 माथेरान येथील महत्वाची पर्यटन स्थळे कोणती आहेत ? What To See In Matheran ? Matheran Hill Station 2022

माउंटबेरी पॉइंट माथेरान : Mountberry Point Matheran

माउंटबेरी पॉइंट हा माथेरानच्या प्रवेशद्वाराजवळच आहे. या ठिकाणी गाड्या पार्क केल्या जातात. माथेरान बघण्यासाठी येथूनच पुढे जावे लागते.

शार्लोट लेक माथेरान : Sharlot Point Matheran

माथेरान येथील सर्वात सुंदर आणि सर्वाधिक पर्यटक येणारे शार्लोट लेक हे एक पर्यटन स्थळ आहे. निसर्गाने या टिकाणी मुक्तहस्ताने उधळण केली आहे. कुटुंबियासोबत जाण्यासाठी हे एक अतिशय उत्तम पर्यटन स्थळ आहे.

शार्लोट लेक येथे एक प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिराची खासियत अशी कि, सर्वत्र जशी काळ्या रंगाची शिवलिंग आढळतात तसे या ठिकाणी नाही. येथील शिवलिंग हे शेंदुराने माखलेले आहे.

या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आणि वनस्पती आढळून येतात.

मंकी पॉइंट माथेरान : Monkey Point Matheran

माथेरान येथील आणखी एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणजे मंकी पॉइंट आहे. नावात असल्याप्रमाणे या ठिकाणी माकडे पुष्कळ आहेत. या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी आणि वनस्पती आढळून येतात.

See also  Ajintha leni history in marathi 2021 | अजिंठा लेणी माहिती

वन ट्री हिल पॉइंट माथेरान : One Tree Hill Point Matheran

या ठिकाणाला वन ट्री हिल पॉइंट या करिता म्हणतात कि, येथील एका टेकडीच्या माथ्यावर एकच झाड आहे.

या पॉइंटवरून आजूबाजूचे जंगल, दूर खोलवर असलेल्या दऱ्या यांचे मनमोहक दृश्य दिसते.हौसी ट्रेकर्स या ठिकाणी ट्रेकिंगसाठी येतात.

पॅनोरमा पॉइंट माथेरान : Panorama Point Matheran

माथेरान येथील पॅनोरमा पॉइंट  सुर्योदयासाठी तसेच सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहे. हा देखावा बघण्यासाठी बरेच पर्यटक या ठिकाणी येत असतात.  या ठिकाणाचे अप्रतिम नैसर्गिक दृश्य पाहून मन प्रसन्न होऊन जाते.

पॅनोरमा पॉइंट माथेरानच्या उत्तर टोकावर आहे. या पॅनोरमा पॉइंटच्या पूर्वआणि पश्चिम दिशेला दरी आहे.

पॅनोरमा पॉइंटवरून गाडेश्वर तलाव, भीमाशंकर आणि खंडाळ्यापर्यंतचा भूभाग दिसतो. येथून पेबचा गडही दिसतो.

नेरळ टॉय ट्रेन माथेरान : Neral Toy Train Matheran : Matheran Hill Station 2022

Matheran Hill Station 2022

माथेरानला जाऊन जर नेरळ टॉय ट्रेनमध्ये नाही बसले तर तुम्ही खूप मोठ्या सुखद अनुभूतीचा आनंद घेण्यापासून वंचित राहणार.

नेरळ टॉय ट्रेनमध्ये बसून तुम्ही पश्चिम घाटातील अद्भुत, मनमोहक निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

नेरळ टॉय ट्रेन ही नेरळ ते माथेरान अशी 21 किमी धावते. सन 1900 मध्ये अदमजी पीरभाय यांनी ही ट्रेन सुरु केली.

लुईसा पॉइंट माथेरान : Luisa Point Matheran : Matheran Hill Station 2022

माथेरानच्या पश्चिमदिशेला लुईसा पॉइंट आहे. या लुईसा पॉइंटवरून प्रबळगडाचा नयनरम्य देखावा सहज दिसतो.

इको पॉइंट माथेरान : Eco Point Matheran

इको पॉइंट हा माथेरानमधील पर्यटकांचा ओढा असलेले पेक्षणीय ठिकाण आहे. दऱ्याखोऱ्यांतून आवाजाचे प्रतिध्वनी या ठिकाणी येतात. येथील विहंगम दृश्य बघून मन अगदी प्रसन्न होऊन जाते.

अंबरनाथ मंदिर : Ambaranath Temple Matheran

अंबरनाथ मंदिर हे माथेरान येथील मध्ययुगीन काळातील मंदिर आहे. हे मंदिर अकराव्या शतकात उभारले गेले आहे. भगवान शंकराला समर्पित असलेले हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

See also  Meenakshi mandir information in marathi 2021 | मीनाक्षी मंदिर माहिती

प्रबळगड किल्ला : Prabalgad Fort Matheran

प्रबळगड किल्ला हा माथेरानवरील पठारावर बांधलेला आहे. ट्रेकिंगसाठी हा किल्ला एक उत्तम ठिकाण आहे. सुमारे 2300 फूट उंच हा किल्ला आहे.

याशिवाय माथेरानला अजूनही बरीचशी प्रेक्षणीय स्थळे आहेत.

माथेरानला कसे जावे ? How To Reach Matheran By Road / Train

बसने माथेरानला कसे जावे ? How To Reach Matheran By Bus : Matheran Hill Station 2022

मुंबई – पुणे महामार्गानजीक माथेरान असल्याने माथेरानला जाण्यासाठी काही समस्या येत नाहीत.  मुंबई, पुणे आणि पनवेल येथून माथेरानला जाण्यासाठी नियमितपणे राज्य परिवहनाच्या बसेस उपलब्ध आहेत.

परंतु बससेवा ही माथेरान नजीकच्या नेरळ पर्यंतच उपलब्ध आहेत. तेथून तुम्हाला दस्तुरी नाक्यापर्यंत ट्राय ट्रेन किंवा खाजगी वाहनाने जावे लागेल.

मित्रांनो आमचा Matheran Hill Station 2022 हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा.

तुम्ही आमच्या या फेसबुक पेज इतिहासाची सोनेरी पाने आणि अंतरंग यांना जरूर फॉलो करा.

आमच्या मराठी माहितीhttp://www.marathimahiti.com या वेबसाईटला जरूर भेट द्या.

संदर्भ : गुगल

 

 

 

 

Spread the love

Leave a Comment