ओसीडी हा नेमका कोणता आजार आहे ? OCD : Obsessive Compulsive Disorder

ओसीडी हा नेमका कोणता आजार आहे ? OCD : Obsessive Compulsive Disorder

OCD : Obsessive Compulsive Disorder
Source : flickr

OCD : Obsessive Compulsive Disorder हा एक हळू हळू वाढणारा गंभीर स्वरूपाचा मानसिक आजार आहे. या आजाराचे वैशिष्ट म्हणजे हा आजार एकाएकी उद्भवत नाही. त्याचप्रमाणे हा आजार असलेली रोगी इतर मनोरुग्णांसारखे दुसऱ्यांना हानी पोहचवत नाहीत वा त्रास देत नाहीत.

आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपले शारीरिक आरोग्य त्याचप्रमाणे मानसिक आरोग्य सांभाळणे अवघड झाले आहे. ताणतणाव निर्माण होत आहे. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात योग्य सवय लावून आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी दिनचर्येत बदल करणे आवश्यक झाले आहे.

ओसीडी या आजाराची लक्षणे कोणती आहेत ? Symptoms of OCD : Obsessive Compulsive Disorder

 • वारंवार एकाच गोष्टीची चिंता करीत राहणे.
 • काही विशेष कारण नसतांना एखादी गोष्ट झपाटल्यासारखे करीत राहणे.
 • काही गोष्टींची विशिष्ट पद्धतीने मांडणी करणे. सतत गोष्टी मोजत राहणे.
 • काही गोष्टींकडे वारंवार लक्ष देणे. जसे गॅस, दरवाजा व्यवस्थित बंद केला आहे का ते बघायला जाणे.
 • अचानकपणे किंवा वारंवार शारीरिक हालचाली करणे. जसे खांदे उडविणे, डोळे मिचकावणे , घसा खाकरणे, आवाजात चढउतार करणे. ई.
 • सतत निराश राहणे.
 • झोप कमी लागणे.
 • स्वतःबद्दल तसेच इतरांसाठी हिंसक विचार डोक्यात येणे.
 • वारंवार हात धुणे. अति प्रमाणात स्वच्छता पाळणे.
 • टीव्ही, न्यूज पेपर मधील वाईट घडलेल्या घटना स्वतः सोबत होतील याची चिंता करीत राहणे.

हे ही वाचा : गुगलवर हे अजिबात सर्च करू नका.What You Should Not Search On Google | गुगलवर हे चुकूनही सर्च करू नका, अन्यथा होईल कारावास

See also  आधार क्रमांक आठवत नाही ? तर मग मोबाईलवरच असा शोधा तुमचा आधार क्रमांक
OCD : Obsessive Compulsive Disorder

ओसीडीची कारणे कोणती आहेत? Reasons Of OCD

 • मेंदूमधील विकृती असणे.
 • आजूबाजूचे वातावरण हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे.
 • आनुवंशिकता.
 • सेरेटीनची खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली पातळी.

ओसीडी या आजारावर मात कशी करायची?

सर्वात प्रथम तर मानसोपचारतज्ज्ञकडे जावे आणि दिलेली औषधे व्यवस्थित घेणे.

त्यासोबतच आपल्या स्वतःला काही नियम, सवयी लावून घेणे. नेहमी सकारात्मक विचार करायची सवय लावा. आपले मित्र मंडळ चांगले ठेवावे. ‘ सु संगती सदा घडो ‘ या वचनानुसार आपली मैत्री असावी.

फावल्या वेळात आपले छंद जोपासा. आवडती गाणी ऐका. विनोदी चित्रपट बघत जा. कुटुंबासोबत ठराविक अंतराने बाहेर ठिकाणी फिरायला जा. नातेवाईकांना भेटण्यासाठी वेळ काढा.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे धार्मिक असाल तर देवावर विश्वास ठेवा म्हणजे काही वाईट होणार नाही ही भावना ठेवा.

नेहमी सकारात्मक रहा आनंदी रहा. मग जीवन सुंदर होऊन जाईल.

मित्रांनो आमचा हा लेख आवडला तर नक्की शेअर करा.

तुम्ही आमच्या या फेसबुक पेज इतिहासाची सोनेरी पाने आणि अंतरंग यांना जरूर फॉलो करा.

विविध माहितीसाठी मराठी माहितीhttp://www.marathimahiti.com या वेबसाईटला जरूर भेट द्या.

स्त्रोत : गुगल

Spread the love

Leave a Comment