रिटर्न 31 जुलैच्या आतच भरा, नाहीतर …..

रिटर्न 31 जुलैच्या आतच भरा, नाहीतर …..

Income tax return
Source : pix4free

31 जुलै ही इन्कम टॅक्स रिटर्न ( Income tax return ) भरण्याची अंतिम मुदत आहे. सध्यातरी सरकारच्या वतीने मुदत वाढवून देण्याची कोणतीही माहिती नाही. त्यामुळे करदात्यांना गाफील राहून चालणार नाही. म्हणून करदात्यांना दिलेल्या मुदतीच्या आतच इन्कम टॅक्स रिटर्न भरावे लागणार आहे. अन्यथा करदात्यांच्या अडचणी वाढू शकतात आणि त्यांना फार मोठा आर्थिक भुर्दंड बसू शकतो.

रिटर्न भरतांना या बाबी लक्षात ठेवा.

31 जुलै पूर्वी रिटर्न भरतांना खालील बाबी लक्षात असू द्या.

  • फॉर्म 26 AS
  • AIS (वार्षिक माहिती विधान)
  • फॉर्म 16 (नोकर वर्गांसाठी)
  • बँक खाते विवरण
  • नियम 80 अंतर्गत सूट देण्याचा दावा करणारी कागदपत्रे. उदा. भरलेल्या lic primium ची पावती, देणगी शुल्क, शिक्षण शुल्क होम लोन परतफेड, health policy ची पावती. ईत्यादी.

31 जुलै पूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न न भरल्यास काय नुकसान होऊ शकते ?

जर 31 जुलै पूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न भरले नाही तर खालील प्रकारे करदात्यांना नुकसान होऊ शकते.

एकूण उत्पन्न 5 लाख रुपये पेक्षा जास्त असेल तर कलम 234 (f) अंतर्गत 5 हजार रुपये विलंब शुल्क आकारले जाईल.

वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असल्यास 1 हजार रुपये विलंब आकारले जाईल.

PGBP किंवा कॅपिटल गेन अंतर्गत तोटा असेल तर तो तोटा पुढील वर्षांसाठी पुढे नेण्याची परवानगी दिली जाणार नाही.

दरमहा 1 टक्का व्याज देय करावर आकारले जाईल.

वरील बाबीं लक्षात घेता जे रिटर्न भरावेच लागणार आहे ते 31 जुलै पूर्वीच भरा. यात जर हलगर्जी केली तर करदात्यांना नुकसान सोसावे लागणार आहे.

यावर्षी 31 जुलै ला रविवार आहे. त्याआधी शनिवार आहे. त्यामुळे बँक आणि इतर कार्यालयांना सुटी राहील. म्हणून करदात्यांना आपली कागदपत्रे शुक्रवार पर्यंतच जमा करून लवकरात लवकर इन्कम टॅक्स रिटर्न भरावे लागणार आहे. जर हलगर्जी केली तर करदात्यांना नुकसान सोसावे लागणार आहे.

See also  नवीन मोबाईल घेताय का ? थांबा येतोय जबरदस्त स्मार्टफोन

Income Tax Return बाबतची ही माहिती आपल्या मित्रांना जरूर शेअर करा आणि त्यांचेही नुकसान टाळता येईल.

तुम्ही आमच्या मराठीमाहितीhttp://www.marathimahiti.com या वेबसाईट वर जाऊन विविध प्रकारच्या माहिती जाणून घेऊ शकता.

सौजन्य : दैनिक लोकमत.

Spread the love

Leave a Comment