सावधान ! सिम स्वॅप स्कॅम ठरतोय घातक !! अवघ्या काही मिनिटांत बँक खाते होते रिकामे

सावधान ! सिम स्वॅप स्कॅम ठरतोय घातक !! अवघ्या काही मिनिटांत बँक खाते होते रिकामे

sim-swap-scam 2022

या तंत्रज्ञानाच्या काळात हॅकर्स बँक (sim-swap-scam 2022) खात्यातून रुपये काढण्याचे नवनवीन तंत्रज्ञान वापरत आहेत. आता अलीकडे हॅकर्स बँक खाते लुटण्याकरिता सिम स्वॅप स्कॅम ही पद्धत वापरत आहेत.

हॅकर्स बँक खात्यातून रुपये काढण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या सिम कार्डचे डूप्लिकेट सिम कार्ड बनवितात. त्याद्वारे त्या व्यक्तीचा डेटा चोरून नंतर बँक खात्यातून रुपये काढतात.

सिम स्वॅप स्कॅमद्वारे हॅकर्स कसे बँक खाते रिकामे करतात ? sim-swap-scam 2022

हॅकर्स एखाद्या व्यक्तीच्या सिम कार्डचे डूप्लिकेट सिम कार्ड बनविण्यासाठी साध्या फिशिंग तंत्रज्ञानाचा उपयोग करतात.

फिशिंग तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे हॅकर्स संबंधित व्यक्तीचा मोबाईल फोन नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख इत्यादी माहिती मिळवितात.

हॅकर्स कस्टमर केअर सेंटरला संपर्क साधून तेथून त्याच मोबाईल क्रमांकाचे नवे सिम घेतात. त्यानंतर ह्या नव्या सिम कार्डचा उपयोग करून हे हॅकर्स संबंधित व्यक्तीचे बँक खाते अवघ्या काही मिनिटांत खाली करतात.

अलीकडेच मुंबईतील एका उद्योगपतीला या सिम स्वॅप स्कॅमचा फटका बसला आहे. या उद्योगपतीच्या बँक खात्यातून एका रात्रीतून 1.7 कोटी रुपये विविध खात्यांत हस्तांतरित करण्यात आले आहेत.

संबंधित उद्योगपतीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यावर पोलिसांनी तपास करीत पश्चिम बंगालमधील बारावीत  शिकणाऱ्या एका तरुणास व त्याच्या मित्रांना अटक केली आहे.

हे ही वाचा : मतदान कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक कसे करायचे ?व्होटर कार्डला आधार कार्ड कसे लिंक करायचे ? How To Link Voter ID Card With Aadhar Card 2022

See also  हे ॲप देईल पाच दिवसांआधी हवामानाचा अंदाज | Meghadut App 2022

सिम स्वॅपिंग झाले हे कसे ओळखाल ?sim-swap-scam 2022

सिम कार्डचे कोणी डूप्लिकेट सिम कार्ड बनवीत असेल तेव्हा मोबाईल सिग्नल पकडत आहे की नाही ते पाहणे आवश्यक ठरते.

अशा वेळा मोबाईल मधील सिग्नल येत – जात राहतो. एसएमएस किंवा कॉल केल्या जात नाही. जर असे मोबाईल मध्ये असेल तर सिम स्वॅपिंगची शक्यता असते.

असे झाल्यास काय करायचे ?

जेव्हा तुम्हाला शंका येईल की तुमच्या सिम बाबत सिम स्वॅपिंग होत आहे. तेव्हा ग्राहक सेवा आणि बँक आणि इतर प्राधिकरणाशी संपर्क साधावा.

मोबाईल मधील सिम काम करत नसेल तेव्हा आपल्या नेट बँकिंग चा पासवर्ड चेंज करावा.  बँक खाते होल्ड करून घ्यावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोबाईलमध्ये सिम इंस्टॉल करतांना नेहमी पिन ठेवा.

तुम्हाला आलेले आकर्षक ऑफर्स आणि सवलत तसेच कॅशबॅक बाबतचे मेसेज आणि ईमेल वर कधीही क्लिक करू नका. अशा मेसेज मध्ये स्पेलिंग बाबत चुका असतात. ‘http’ असलेल्या लिंक खात्री नसल्यास उघडू नयेत. आपल्या डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड बाबतची कोणतीही माहिती देऊ नये.

तुमच्या मित्रांनाही सिम स्वॅप स्कॅम (sim-swap-scam 2022) बाबत ही माहिती शेअर करा.

सौजन्य: दैनिक लोकमत.

विविध माहितीसाठी मराठीमहितीhttp://www.marathimahiti.com या वेबसाईटला जरूर भेट द्या.

Spread the love

Leave a Comment