तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप्स असतील तर त्वरित डिलिट करा | Autolaycos Malware Attack 2022

तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप्स असतील तर त्वरित डिलिट करा | Autolaycos Malware Attack 2022

Autolaycos Malware Attack 2022

अँड्रॉइड फोन (Autolaycos Malware Attack 2022) आता जवळपास बहुतांश लोकांजवळ आहे. अँड्रॉइड फोनचा उपयोग करणारे गुगल प्ले स्टोअरवरून नेहमीच बरेचसे ॲप्स डाऊनलोड करत असतात. गुगल प्ले स्टोअरवरून रोजच हजारो ॲप्स डाऊनलोड केले जातात.

गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड केले जाणारे सर्वच ॲप्स सुरक्षित असतात असे नाही. बऱ्याच ॲप्समध्ये काही मालवेअर लपलेले असतात. हे मालवेअर आपल्या अँड्रॉइड फोनमधील डेटा चोरून त्याचा कोणत्याही प्रकारे गैरवापर करतात तसेच प्रसंगी आपल्याला गंडाही घालतात.

सध्या  ऑटोलायकोस (Autolaycos) हा मालवेअर गुगल प्ले स्टोअरवर असलेल्या काही ॲप्स मध्ये सापडला आहे. गुगल प्ले स्टोअरवर एकूण आठ ॲप्स मध्ये हा मालवेअर मध्ये सापडला आहे. त्यापैकी सहा ॲप्स वर गुगलने कारवाई केली आहे. परंतु अजूनही दोन ॲप्स मध्ये हा मालवेअर सक्रिय आहे. हे ॲप्स 30 लाखांपेक्षा अधिक वेळा गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड केले गेले आहेत. तेव्हा तुमच्या अँड्रॉइड फोन मध्ये हे ॲप्स असतील तर त्वरित डिलिट करून घेणे गरजेचे आहे.

Autolaycos Malware Attack 2022

हे ही वाचा : गुगलवर कोणत्या बाबी सर्च केल्यास होऊ शकते कारवाई.What You Should Not Search On Google | गुगलवर हे चुकूनही सर्च करू नका, अन्यथा होईल कारावास

हे ॲप्स कोणकोणते आहेत ते जाणून घ्या.Autolaycos Malware Attack 2022

फ्रिग्लो कॅमेरा हा ॲप्स गुगल प्ले स्टोअरवरून 5 हजार वेळा डाऊनलोड केला गेला आहे.

रेझर की – बोर्ड अँड थीम्स हा 50 हजार पेक्षा जास्त वेळा डाऊनलोड केला गेला आहे.

See also  Maharashtra SSC Result 2024 | इयत्ता 10 वी चा निकाल मोबाइलवर कसा बघावा ?

1 लाख पेक्षा जास्त वेळा जिफ ईमोजी की – बोर्ड हा ॲप् डाऊनलोड केला गेला आहे.

वाओ ब्युटी कॅमेरा हा ॲप् देखील 1 लाख पेक्षा जास्त वेळा डाऊनलोड केला गेला आहे.

5 लाख पेक्षा जास्त वेळा केली टेकका फनी कॅमेरा हा ॲप डाऊनलोड केला गेला आहे.

1 हजार पेक्षा जास्त वेळा कोको कॅमेरा वर्जन 1.1 हा ॲप डाऊनलोड केलेला आहे.

तर तब्बल 10 लाख पेक्षा जास्त वेळा व्लॉग स्टार व्हिडिओ एडिटर हा ॲप डाऊनलोड केला गेला आहे.

तसेच क्रिएटिव्ह 3 डी लाँचर हा ॲप 10 लाख पेक्षा जास्त वेळा डाऊनलोड केला गेला आहे.

तब्बल 30 लाख पेक्षा जास्त वेळा वरील ॲप्स डाऊनलोड केल्या गेले आहेत.

वरीलपैकी कोणतेही ॲप्स डाऊनलोड केले असतील तर त्वरित डिलिट करून घ्यावी. अन्यथा तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते.

ऑटोलायकोस मालवेअर कसे नुकसान करतो ?Autolaycos Malware Attack 2022

ऑटोलायकोस हा मालवेअर सुरक्षित लिंकवरून काम करीत आहे. त्यामुळे या मालवेअरकडे सहसा कोणाचे लक्ष वेधले जात नाही.

बऱ्याचदा हा मालवेअर असलेल्या ॲप्सने एसएमएस द्वारे फोन सिस्टिममध्ये प्रवेश केला आहे.

ऑटोलायकोस हा मालवेअर आपल्या नकळत प्रीमियम सेवा पुरवितो. तसेच आपल्या बँक खात्यात असलेले रुपये थेट कापल्या जातात.

कशी काळजी घ्यावी ?

अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांनी आपल्या मोबाईल फोन मधून वरील ॲप्स त्वरित डिलिट करून घ्यावी.

आपल्या मोबाईलमधील बॅकग्राऊंड इंटरनेटचा वापर कसा होत आहे हे नेहमी तपासात जा.

गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड केलेले ॲप्स किती बॅटरी आणि नेट वापरतात हे वेळच्या वेळी तपासा.

गुगल प्ले स्टोअरवर प्ले प्रोटेक्ट मोड ॲक्टिव्ह ठेवा.

आपल्या मोबाईलमध्ये शक्य तेवढे कमी ॲप्स ठेवा.

अँड्रॉइड फोन जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढेच हानिकारक ही आहेत. त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या युगात आपण या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर जपून आणि काळजीपूर्वक केला पाहिजे.

See also  What You Should Not Search On Google | गुगलवर हे चुकूनही सर्च करू नका, अन्यथा होईल कारावास

तुम्हाला आमचा Autolaycos Malware Attack 2022 हा लेख नक्कीच उपयोगी पडेल. आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.

तुम्ही आमच्या मराठीमाहितीhttp://www. marathimahiti.com या वेबसाईट वर जाऊन विविध प्रकारच्या माहिती जाणून घ्या.

संदर्भ : दैनिक लोकमत.

Spread the love

Leave a Comment