Maharashtra SSC Result 2024 | इयत्ता 10 वी चा निकाल मोबाइलवर कसा बघावा ?

Maharashtra SSC Result 2024 | इयत्ता 10 वी चा निकाल मोबाइलवर कसा बघावा ?

Maharashtra 10th Result 2022
सौजन्य : Pixabay.com

विद्यार्थी मित्रांनो मार्च  2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( इयत्ता 10 वी) परीक्षेच्या  निकालाची (Maharashtra SSC Result 2024) तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघत होता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याकडून मे 2024 च्या शेवटच्या आठवड्यात हा निकाल लागणार असे सांगण्यात आले होते. त्यानुसार मार्च – एप्रिल 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( इयत्ता 10 वी) परीक्षेचा निकाल दिनांक 27 मे 2024 ला लागणार आहे. हा निकाल  27 मे 2024 ला दुपारी ठीक 01.00 घोषित केल्या जाणार आहे.  या ठिकाणी तुम्ही इयत्ता 10 वी चा निकाल बघू शकता.

यावर्षी इयत्ता दहावीची परीक्षा दिनांक 1 मार्च ते दिनांक 26 मार्च 2024 या दरम्यान पार पडली होती.

SSC Maharashtra State Board 2023-24 ला सुमारे 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. आता या विद्यार्थ्यांची आणि पालकांची निकालाची प्रतीक्षा संपलेली आहे. खाली दिलेल्या माहितीवरून तुम्ही 10 वी चा निकाल बघू शकता.

हे ही वाचा : इयत्ता 10 वी आणि 12 वी नंतर काय कराल ?

Maharashtra 10th Result 2022
सौजन्य : flikre.com

महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या अधिकृत website वर निकाल कसा बघावा ? Maharashtra SSC Result 2024

  • विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम www.mahresult.nic.in या अधिकृत असलेल्या website वर जावे.
  • वरील website च्या होमपेज वर 10 वी च्या निकालाच्या लिंक वर क्लिक करावी.
  • स्वतःचा बोर्डाचा रोल नंबर पूर्ण टाकावा.
  • त्यानंतर स्वतःच्या आईचे नाव टाइप करावे.
  • त्यानंतर ‘निकाल पहा‘ या बटनावर क्लिक करावे.
  • त्यानंतर तुम्हाला स्वतःचा बोर्डाचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

विद्यार्थी मित्रांनो मंडळाने जाहीर केलेल्या अधिकृत संकेतस्थळे खालीलप्रमाणे आहेत. त्यावरून तुम्ही वरील स्टेप वापरून आपला निकाल बघू शकता.

See also  What You Should Not Search On Google | गुगलवर हे चुकूनही सर्च करू नका, अन्यथा होईल कारावास

खालील अधिकृत लिंकवरून तुम्ही आपला निकाल बघा.

विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याप्रकारे आपला इयत्ता 10 चा निकाल Maharashtra 10th Result 2024 बघू शकाल. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

तुम्हाला आमचा हा लेख आवडल्यास शेअर करा.

तुम्ही आमच्या मराठीमाहीती या वेबसाईटला भेट देऊ शकता.

Spread the love

Leave a Comment