ITI Admission Process In Marathi 2024 | ITI मध्ये प्रवेश करण्यासाठी अर्जप्रक्रिया सुरु

ITI Admission Process In Marathi 2024 | ITI मध्ये प्रवेश करण्यासाठी अर्जप्रक्रिया सुरु

ITI Admission Process In Marathi 2022

मित्रांनो इयत्ता 10 चा निकाल लागला आहे. सर्वप्रथम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला पुढील शिक्षणासाठी  तुम्ही आयटीआय (ITI) (ITI Admission Process In Marathi 2024) निवडत असाल तर तुम्ही हा लेख जरूर वाचा.

मित्रांनो DVET म्हणजेच व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचनालयातर्फे महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील विविध विविध अभ्यासक्रमातील ऑनलाईन प्रवेशप्रकिया  आज दिनांक 3 जून 2024 पासून सुरु होणार आहे.

जरूर वाचा : 10 वी , 12 वी नंतर काय करावे ?

राज्यातील शासकीय आणि खाजगी आय टी आय मधील प्रवेशप्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबविली जाणार आहे.

व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचनालयाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करणे, अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती  करणे आणि प्रवेश अर्ज शुल्कासह भरणे याकरिता दिनांक 3 जून 2024 पासून सुरुवात होईल. अंतिम तारीख 30 जून 2024 आहे.

दिनांक 14 जून 2024 पासून पहिल्या फेरीसाठी शासकीय आणि खाजगी आय टी आय मध्ये मूळ कागदपत्रे तपासून अर्ज निश्चित करता येईल.

आय टी आय मध्ये प्रवेश करण्याकरिता लागणारी कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • दहावी उत्तीर्णचे प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र ( आवश्यकता असल्यास)
  • जात मान्यतेचे प्रमाणपत्र ( जात मागासवर्ग प्रवर्गातील मान्यतेचे प्रमाणपत्र  उदा. obc, N.T. वगैरे)
  • पालकाचा उत्पन्नाचा दाखला
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (डोमेशियल)
  • 2024 पर्यंत वैद्य असलेले नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  • महाराष्ट्र राज्यात जात मागासवर्गमध्ये  मोडत असल्याबाबतचे प्रमाणपत्र
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सक्षम अधिकार्याचे प्रमाणपत्र
  • उमेदवाराचे पालक महाराष्ट्र सरकार/ केंद्र सरकारचे जसे सरंक्षण क्षेत्रचे कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र
  • अपंगत्व/दिव्यांग बाबतचे सक्षम अधिकार्याचे प्रमाणपत्र ( आवशक्यता असल्यास)
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
  • याशिवाय वाढीव गुण मिळण्यासाठी आवश्यक असलेली प्रमाणपत्रे
See also  महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या पदवीधर उमेदवारांना मिळेल युपीएससी परीक्षेच्या संपूर्ण तयारीचे दिल्ली येथे प्रशिक्षण | UPSC Civil Services Preparation Training For ST Category 2022

वरीलप्रमाणे कागदपत्रे सोबत ठेवावी. तसेच स्वतः अधिकृत website वर जाऊन खात्री करून आवश्यक असलेली कार्यवाही करावी.

तुम्हाला आमचा ITI Admission Process In Marathi 2024 हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा.  काही सुधारणा असल्यास आम्हास कळवाव्या. तुम्हाला हा लेख आवडल्यास नक्की शेअर करा.

तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com  या वेबसाईटला जरू भेट द्या.

संदर्भ : गुगल

Spread the love

Leave a Comment