हे ॲप देईल पाच दिवसांआधी हवामानाचा अंदाज | Meghadut App 2022
आपल्या सर्वांच्या खासकरून शेतकऱ्यांसाठी भारतीय हवामान विभाग (IMD) आणि भारतीय कृषी अनुसंधान संस्थान (ICAR) यांच्या एकत्रित प्रयत्नाने हवामानावर आधारित शेती व्यवस्थापनासाठी ‘मेघदूत’ (Meghadut App 2022) हे मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केले आहे. हे ॲप येणाऱ्या पाच दिवसांच्या हवामानविषयक माहिती देते.
भारतीय शेती पुर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना बऱ्याचदा दुबार पेरणी करावी लागते. तर काही वेळा हाती आलेले पीक पावसामुळे हातचे जाते. हवामानाचा अंदाज घेऊन शेतीची मशागत, शेत पेरणी ते पीक काढणी, मळणी, शेतमाल साठवणूक आणि शेतमालाची बाजारपेठेत व्यवस्थित वाहतूक या सर्व महत्त्वाच्या बाबींचा विचार केला असता मेघदूत ॲप किती आवश्यक आहे.
हे ही वाचा : कोसळणाऱ्या विजांची माहिती अगोदरच माहिती देणारे ॲप : कोसळणाऱ्या विजांपासून अशी घ्या खबरदारी | हे ॲप देईल तुम्हाला वीज पडण्याची पूर्वसूचना
मेघदूत ॲपची वैशिष्टे : Meghadut App 2022
- मेघदूत ॲप पुढील पाच दिवसांच्या हवामानाचा अंदाज तर वर्तवितेच शिवाय मागील पाच दिवसांच्या हवामानाचा आढावाही देते.
- सर्वसामान्य कृषीविषयक सल्ला देते.
- पिकनिहाय सल्ला देते.
- फळे आणि भाजीपाला विषयी मार्गदर्शन करते.
- पशु संवर्धन आणि कुक्कुट पालन विषयी मार्गदर्शन करते.
- माती परीक्षण, जमीन तयारी विषयक सल्ला देते.
- आधुनिक तंत्रज्ञान विषयक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते.
मेघदूत ॲप कसे डाऊनलोड करावे ?
मेघदूत ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. तेथून तुम्ही डाऊनलोड करा. हे ॲप डाऊनलोड केल्यावर त्यामध्ये नावनोंदणी, मोबाईल नंबर, आपली भाषा, लिंग, जिल्हा आणि राज्य ही माहिती तेथे भरावी.
मेघदूत ॲप डाऊनलोड करून शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. स्वतःच्या निर्णय क्षमतेला तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्तम शेती करता येईल यात शंका नाही.
आजच्या आधुनिक काळात बदलत्या तंत्रज्ञानाचा फायदा शेतकरी मित्रांनी घेतला पाहिजे. तंत्रज्ञानाची कास धरून आधुनिक शेती शेतकऱ्यांनी केली पाहिजे. तेव्हाच शेतकरी या महागाईच्या काळात तग धरू शकेल.
शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा लेख नक्कीच उपयोगी पडेल. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.
विविध माहिती जाणून घ्या सविस्तर मराठीमाहिती http://www.marathimahiti.com या वेसाइटला भेट देऊन.
सौजन्य : दै.लोकमत
तुम्ही आमच्या ‘अंतरंग’ आणि ‘इतिहासाची सोनेरी पाने’ या फेसबुक पेजेसला फॉलो करू शकता.
1 thought on “हे ॲप देईल पाच दिवसांआधी हवामानाचा अंदाज | Meghadut App 2022”