एटीएमचा पासवर्ड विसरला ? बँकेत न जाता असा करा रिसेट | ATM Card Pin Reset 2022

एटीएमचा पासवर्ड विसरला ? बँकेत न जाता असा करा रिसेट | ATM Card Pin Reset 2022

atm-card-pin-reset-2022

ATM Card Pin Reset 2022

आजच्या या आधुनिक काळात आपल्याला अनेक बाबींचे पासवर्ड लक्षात ठेवावे लागतात. जसे Google Account , SBI YONO,  UPI pin, Social Media password , Mobile Password आणि  (ATM Pin atm card pin reset 2022)  इत्यादी.

एटीएम (डेबिट कार्ड) आल्यापासून बँकेत न जाता आपण रुपये काढण्यासाठी एटीएमचा वापर खूप करू लागलो. अशा या असंख्य पासवर्डमध्ये जर आपण एटीएमचा पासवर्ड विसरलो तर ? वारंवार चुकीचा पिन टाकल्यावर कार्ड ब्लॉक होते. कार्ड ब्लॉक झाल्यावर सुरु करण्याकरिता बँकेत जावे लागते. म्हणून एटीएमचा पिन विसरले तर टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. आपण बँकेत न जाताही एटीएमचा पिन रिसेट atm card pin reset 2022 करू शकतो.

एटीएमचा पासवर्ड रिसेट online आणि offline या दोन्ही पद्धतीने आपण रिसेट करू शकतो.बहुतांश लोकांजवळ SBI चे डेबिट कार्ड असते. म्हणून आपण SBI च्या डेबिट कार्डचा पिन विसरल्यानंतर रिसेट कसा करायचा ते बघू या.

हे ही वाचा : व्होटर आयडीला आधार क्रमांक कसा लिंक करावा ?

एटीएममध्ये जाऊन डेबिट कार्डचा पिन रिसेट करणे : atm card pin reset 2022

  • SBI च्या एटीएममध्ये गेल्यावर डेबिट कार्ड एटीएम मशीनमध्ये insert करावे.
  • डेबिट कार्ड insert केल्यावर पाहिजे ती भाषा निवडावी.
  • पुढे 10 ते 99 यामधील कोणतेही दोन अंक box मध्ये टाकावे.
  • त्यानंतर तुम्हाला PIN ENTER करा असे सांगितले जाईल. परंतु पिन विसरल्यामुळे तुम्ही पिन जनरेशनवर (PIN Generation) क्लिक करा.
  • पुढे तुम्हाला तुमचा बँक खाते क्रमांक (Bank Account Number) मागितला जाईल. box मध्ये स्वतःचा 11 अंकी बँक खाते क्रमांक टाका. तुम्ही टाकलेला बँक खाते क्रमांक अचूक असल्यास Press if Correct वर क्लिक करा.
  • पुढे बँक खाते क्रमांकला लिंक असलेला अचूक मोबाइल क्रमांक box मध्ये टाका आणि Press if Correct वर क्लिक करा.
  • तुम्ही टाकलेली सर्व माहिती अचूक असल्यास त्यानंतर confirm वर क्लिक करा आणि माहिती चुकलेली असेल तर cancel वर क्लिक करा.
  • ही प्रोसेस पूर्ण झाली. आता तुम्ही डेबिट कार्ड बाहेर काढू शकता.
  • तुमच्या बँक खात्याला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकवर एक मेसेज येईल. या मेसेजमध्ये एक चार अंकी OTP येईल. हा तुमचा तात्पुरता पिन असेल.
  • त्यानंतर आपले डेबिट कार्ड पुन्हा एटीएम मशीनमध्ये insert करावे आणि भाषा निवडावी. 10 ते 99 यामधील कोणतेही दोन अंक box मध्ये टाकावे.
  • त्यानंतर तुम्हाला PIN ENTER करा असे सांगितले जाईल. तेथे तुम्हाला प्राप्त झालेला चार अंकी OTP टाकावा.
  • चार अंकी OTP टाकल्यावर तुमच्यासमोर स्क्रीनवर खूप सारे ऑप्शन येतील. त्यातील डाव्या बाजूचे PIN Change या ऑप्शनवर क्लिक करावे.
  • त्यानंतर समोर आलेल्या box मध्ये हवा असलेला पिनसाठी चार अंक टाकावे.
  • Transaction Complete असे लिहून आल्यावर प्रोसेस पूर्ण होऊन तुमच्या डेबिट कार्डचा नवी पिन तयार झाला असे समजावे. आपले डेबिट कार्ड काढून घ्यावे.
See also  नवीन मोबाईल घेताय का ? थांबा येतोय जबरदस्त स्मार्टफोन

हे ही वाचा : आधार क्रमांक विसरले तर काय करावे ?

नेटबँकिंगने एटीएमचा पासवर्ड रिसेट करणे : Reset ATM Pin through NetBanking

जवळपास सर्वच बँकांनी नेट बँकिंगची सुविधा दिलेली आहे. तुम्ही ही नेट बँकिंगची सुविधा घेतली असेल तर तुम्ही नेट बँकिंगद्वारे एटीएमचा पिन रिसेट करू शकता. त्याकरिता तुम्हाला खालील स्टेप फॉलो कराव्या लागतील.

  • नेट बँकिंगला लॉग इन करावे.
  • त्यानंतर कार्ड सेक्शनला क्लिक करून Instant PIN Generation येथे क्लिक करावी.
  • त्यनंतर कार्डचा CVV number, Expiry Date  ही माहिती भरावी.
  • तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाइल क्रमांकावर OTP येईल.
  • मग तुम्ही आलेला पिन चेंज करून हवा असलेला पिन तयार करू शकता.

मित्रांनो आमचा atm-card-pin-reset-2022 हा लेख आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करा.

तुम्ही आमच्या मराठीमाहिती या website ला नक्की भेट द्या.

संदर्भ : गुगल

Spread the love