Atal Pension Yojana Update 2022 | अटल पेंशन योजनेत झाला मोठा बदल

Atal Pension Yojana Update 2022 | अटल पेंशन योजनेत झाला मोठा बदल

Atal Pension Yojana Update 2022 |
Source : Justdial

1 जून 2015 ला अटल पेंशन योजना (Atal Pension Yojana Update 2022)  भारत सरकारने सुरु केली. या योजनेंतर्गत वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर योजनेचा लाभ घेणाऱ्याला दरमहा 1000 ते 5000 रुपये पेंशन मिळते. आता 1 ऑक्टोबर 2022 पासून या अटल पेंशन योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.

अटल पेंशन योजनेत कोणता मोठा बदल करण्यात आला आहे ?

1 ऑक्टोबर 2022 पासून आयकर भरणारी व्यक्ती अटल पेन्शन योजनेत सहभागी होऊ शकणार नाही. अशी अधिसूचना अर्थ मंत्रालयाने काढली आहे.

अर्थ मंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, जर एखादा व्यक्ती 1 ऑक्टोबर किंवा त्यानंतर अटल पेन्शन योजनेत सहभागी झाला असेल आणि तो पुढे करदाता असल्याचे आढळल्यास त्याचे खाते बंद केल्या जाईल. त्या संबंधित व्यक्तीने जमा केलेली रक्कम त्यास परत केली जाईल.

हे ही वाचा : मतदान कार्ड हे आधार कार्डला कसे लिंक करावे ?

अटल पेन्शन योजना नेमकी काय आहे ? Atal Pension Yojana Update 2022

सेवानिवृत्तीनंतर ज्या व्यक्तींचा निश्चित असा उत्पन्नाचा स्रोत नाही अशा व्यक्तींसाठी अटल पेन्शन योजना केंद्र सरकारने 1 जून 2015 ला सुरू केली आहे.

अटल पेन्शन योजनेत वयाची साठ वर्षे पूर्ण झालेल्या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना दरमहा 1000 ते 5000 रुपये पेन्शन स्वरूपात मिळते.

18 ते 40 वर्षे या वयोगटातील व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येतो. म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वीस वर्षे गुंतवणूक करावी लागते. जर दरमहा एक ते पाच हजार रुपये पेन्शन घ्यायची असेल तर तुम्हाला दरमहा 42 ते 210 रुपये या योजनेत गुंतवावे लागतील.

See also  आधार क्रमांक आठवत नाही ? तर मग मोबाईलवरच असा शोधा तुमचा आधार क्रमांक

समजा एखाद्या व्यक्तीने वयाच्या 40 साव्या वर्षी या योजनेचा लाभ घेण्याचे ठरविले तर त्याला दरमहा 291 ते 1454 रुपये गुंतवावे लागतील. थोडक्यात गुंतवणूकदार जितके जास्त रुपयांची गुंतवणूक करेल तेवढी जास्त रक्कम त्यास पेन्शन स्वरूपात मिळेल.

गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराला समान पेन्शन दिली जाईल असे या योजनेत नमूद केले आहे. जर दोघांचाही मृत्यू झाल्यास साठ वर्षांपर्यंत जमा झालेली रक्कम नॉमिनीला मिळेल.

जर लाभार्थ्यांच्या वयाच्या साठ वर्षांपूर्वीच मृत्यू झाल्यास जोडीदार उर्वरित कालावधीसाठी रक्कम दरमहा भरू शकते.

अटल पेन्शन योजनेत सरकार किमान पेन्शनची हमी देते.

हे पण वाचा :  ATM चा पासवर्ड विसरले ? बँकेत न जाता करा रिसेट

अटल पेन्शन योजनेचे फायदे : Atal Pension Yojana Update 2022

अटल पेन्शन योजनेचे काही फायदे पुढीलप्रमाणे सांगता येतील.

अडीच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांना आयकर कायद्यानुसार आयकर भरण्याची आवश्यकता नाही.

नियमित बचत करण्याची सवय लागून म्हातारपणी खूप मोठा आर्थिक आधार मिळतो.

कलम 80 c दीड लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते.

अटल पेन्शन योजनेचे खाते कोठे उघडाल ?

अटल पेन्शन योजनेचे खाते सुरू करणे सोपे आहे. सर्व राष्ट्रीयीकृत बँकेत ही योजना सुरू आहे. तुम्ही बँकेत जावून आवश्यक ती कागदपत्रे सादर करून या योजनेचे खाते उघडू शकता.

ही माहिती आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.

आमच्या फेसबुक पेज अंतरंग ला जरूर फॉलो करा.

तुम्ही आमच्या मराठी माहिती  या वेबसाईटला पण भेट देऊ शकता.

संदर्भ : दैनिक लोकमत

Spread the love

Leave a Comment