बिरसा मुंडा मेडिकल हब नाशिक | Birasa Munda Medical Hub Nashik 2022

बिरसा मुंडा मेडिकल हब नाशिक | Birasa Munda Medical Hub Nashik 2022

Birasa Munda Medical Hub Nashik 2022

महाराष्ट्रातील नाशिक याठिकाणी आधुनिक सोईसुविधांनी परिपूर्ण असलेले बिरसा मुंडा मेडिकल हबचा (Birasa Munda Medical Hub Nashik 2022) लोकार्पण सोहळा नुकताच 7 ऑगस्ट रोजी पार पडला.

बिरसा मुंडा मेडिकल हबचे खास वैशिष्ट म्हणजे आदिवासी, तळागाळातील दुर्बल आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटक यांच्यासाठी आधुनिक वैद्यकीय सुविधा अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिल्या जातात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या बिरसा मुंडा मेडिकल हब  विविध क्षेत्रातील आदिवासी व्यक्तींनी स्वतःच्या पैशाने निर्माण केले आहे.

हे ही वाचा : दहावी बारावी नंतर पुढे काय करावे ?दहावी, बारावीनंतर पुढे काय करायचे ? courses-after-10th-and-12-th-science-arts-commercs

समाजातील वंचित घटकांना अंशतः मोफत तत्वावर आधुनिक वैद्यकीय सुविधा देण्यासाठी समाजातील लोकांनी एकत्र येऊन हा प्रकल्प उभारला. अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे.

आजही आपल्या देशात जंगल, दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या गरीब आदिवासी बांधवांना पुरेशा आरोग्यविषयक सुविधा मिळत नाहीत. सुविधेअभावी बऱ्याच आदिवासी बांधवांना प्रसंगी आपले प्राण गमवावे लागतात ही खेदाची बाब आहे.

आदिवासी समाजातील शेतकरी, इंजिनियर, डॉक्टर्स, शिक्षक अशा नोकरदार वर्गाने आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन या बिरसा मुंडा मेडिकल हबची स्थापना केली आहे.

सध्या बिरसा मुंडा मेडिकल हबमध्ये 100 बेड्स ची उपलब्धता आहे. या हब मध्ये अत्याधुनिक एक्स रे मशीन, स्पेशल वार्ड, अपघात विभाग, आय सी यू विभाग, रुग्णवाहिका, मेडिकल (फार्मसी) पथोलॉजी लॅब, ब्लड स्टोरेज युनिट असे सुसज्ज विभाग याठिकाणी असणार आहेत.

सहा ऑपरेशन थिएटर सर्व प्रकारच्या सर्जरी करिता सुसज्ज आहेत. प्रयोगशाळेत रक्त आणि लघवीची तपासणी करण्यासाठी  24 तास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लहान मुलांच्या साठी अतिदक्षता विभाग आहे. त्यात 15 एन. आय. सी. यू. बेडस आहेत. आंतर रुग्ण विभाग सेमी स्पेशल आणि स्पेशल रूम्ससह उपलब्ध करून दिल्या आहेत.

See also  शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, हे काम करा लवकर, अन्यथा खात्यात पैसे जमा होणार नाहीत | PM Kisan Yojana 2022

अत्याधुनिक रेडियोलॉजी विभाग, सी टी स्कॅन, डिजिटल एक्स रे आणि सोनोग्राफी तसेच एम आर आय अशा सुविधा 24 तास उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. रुग्णांना 50 टक्के सवलत मध्ये ऑपरेशन सुविधा तसेच तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार होतील.

असा हा बिरसा मुंडा मेडिकल हब निश्चितच भूषणावह आहे. समाजातील लोकांनी एकत्र येऊन समाजासाठी काम करीत आहेत. ही बाब नक्कीच गौरवशाली आहे.

तुम्ही Birasa Munda Medical Hub Nashik 2022 ही माहिती आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.

तुम्ही आमच्या मराठी माहितीhttp://www.marathimahiti.com  या वेबसाईटवर जाऊन विविध प्रकारच्या माहिती जाणून घेऊ शकता.

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स.

 

 

 

 

Spread the love

1 thought on “बिरसा मुंडा मेडिकल हब नाशिक | Birasa Munda Medical Hub Nashik 2022”

Leave a Comment