सावधान ! 5 G सीमकार्ड अपग्रेडच्या नावाखाली होऊ शकते नुकसान ! ! | 5 G Simcard Upgrade 2022

सावधान ! 5 G सीमकार्ड अपग्रेडच्या नावाखाली होऊ शकते नुकसान ! ! | 5 G Simcard Upgread 2022

अलीकडेच देशातील मोठ्या शहरांमध्ये 5 G सेवा सुरू करण्यात आली आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये 4 G चे सीमकार्ड आहे. 5 G (5 G Simcard Upgrade 2022) बाबत प्रत्येकजण उत्सुक आहे. ग्राहकांच्या याच उत्सुकतेचा फायदा घेऊन स्कॅमर्स ग्राहकांना सीमकार्ड बदलून देण्याच्या नावाखाली त्यांची बँक खाते रिकामे करू शकतात.

5 G Simcard Upgrade 2022
source : maxpixel.net

स्कॅमर्स 5 G सेवा अपग्रेड करण्याच्या नावाखाली कसे फसवणूक करु शकतात ? 5 G Simcard Upgrade 2022

5 G सेवेचा लाभ घेण्यासाठी मोबाइल कंपन्यांचे ग्राहक प्रतिनिधी बनून ग्राहकांना फोन करू शकतात. ग्राहकांची वैयक्तिक माहिती मिळवितात. तसेच सीमकार्ड अपग्रेडच्या नावाखाली ग्राहंकाकडून online रुपये मागून बँक खात्यातून परस्पर रुपये ट्रान्स्फर करू शकतात. या करिता स्कॅमर्स एसएमएस, whats app मेसेज किंवा ई-मेल पाठवून लिंक पाठविली जाते. यातून ग्राहकांच्या बँक खात्यातून रक्कम काढली जाते.

हे ही वाचा : बँकेत न जाता ATM चा पासवर्ड कसा चेंज करायचा ?

अशी घ्या सावधानी-

सर्वात महत्वाची बाब लक्षात घ्या कि, 5 G ची सेवा प्राप्त करण्यासाठी ग्राहकांना आपले सीमकार्ड बदलण्याची आवश्यकता नाही. 5 G ची सेवा घेण्यासाठी 5 G technology चा handset घ्यावा लागे. 

दुसरी महत्वाची ही बाब लक्षात घ्या कि, 4 G सपोर्ट असलेल्या मोबाइलमध्ये software द्वारे 5 G सेवा प्राप्त करता येत नाही.

जोपर्यंत आपल्या शहरात 5 G सेवा सुरु होत नाही तो पर्यंत कुणीही ती सेवा देऊ शकत नाही. ही बाब लक्षात असू द्या.

आपली कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती online देऊ नका. फोनवर आलेला OTP  कोणालाही सांगू नका. कोणत्याही अनोळखी लिंकला क्लिक करू नका.

मित्रांनो तुम्हाला आम्ही दिलेली 5 G Simcard Upgrade 2022 ही  माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.

तुम्ही आमच्या अंतरंग आणि इतिहासाची सोनेरी पाने या फेसबुक पेजेस ला फॉलो करू शकता.

मराठी माहिती या वेबसाईटला भेट देऊन विविध प्रकारची माहिती तुम्ही घेऊ शकता.

See also  आपल्या घरूनच उघडा पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते

संदर्भ : दैनिक लोकमत.

Spread the love

Leave a Comment