भारतीय वंशाचे ऋषी सुनक बनले ब्रिटेनचे प्रधानमंत्री | Rishi Sunak : Britain’s New PM 2022

भारतीय वंशाचे ऋषी सुनक बनले ब्रिटेनचे प्रधानमंत्री | Rishi Sunak : Britain’s New PM 2022

भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak : Britain’s New PM 2022) हे आता ब्रिटेनचे पंतप्रधान बनले आहेत. काळाचा महिमा असा कि, ज्या ब्रिटिशांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केले , त्याच ब्रिटेनचा पंतप्रधान आता भारतीय वंशाचे ऋषी सुनक झाले आहेत. आजच्या या लेखात ऋषी सुनक यांच्या बाबत माहिती घेऊ या.

Rishi Sunak : Britain's New PM 2022
source : flickr.com

ऋषी सुनक यांच्याविषयी माहिती  : Information About Rishi Sunak

ऋषी सुनक यांचा जन्म कोठे आणि केव्हा झाला ?

ऋषी सुनक यांचा इंग्लंडमधील साउथ हेंपट येथे 12 मे 1980 ला झाला.त्यांच्या वडिलांचे नाव यशवीर सुनक तर आईचे नाव उषा सुनक आहे. त्यांचे आजोबा रामदास सुनक  मुळचे गुजरांवाला या गावचे.

आता हे गाव पाकिस्तानमध्ये आहे. रामदास सुनक यांनी 1935 ला हे गाव सोडले आणि आफ्रिका खंडातील नैरोबी या ठिकाणी आले. त्यानंतर ते केनिया या ठिकाणी गेले. तेथे रिशी यांच्या वडिलांचा म्हणजे यशवीर सुनक यांचा जन्म झाला. 1960 च्या सुमारास सुनक कुटुंब इंग्लंडमध्ये गेले.

हे ही वाचा : पहिला राणी एलिझाबेथ द्वितीय पुरस्कार कोणाला मिळाला ?

ऋषी सुनक यांचे शिक्षण किती झाले आहे ? Rishi Sunak : Britain’s New PM 2022

ऋषी सुनक यांचे शिक्षण विंचेस्टर कॉलेजमध्ये झाले आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र आणि राजकारण या विषयात पदवी प्राप्त केली. ऋषी सुनक यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग, फिजिक्स यामध्ये पदवी प्राप्त केली. तसे त्यांनी Stanford University मधून एमबीए देखील केलेले आहे.

See also  January Dinvishesh | जानेवारी महिना दिनविशेष २०२२

ऋषी सुनक यांची पत्नी – मुले – सासरे :

ऋषी सुनक यांच्या पत्नीचे नाव अक्षता मूर्ती आहे. शिक्षण घेत असतांना दोघांची भेट झाली होती. प्रसिद्ध उद्योगपती आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती हे ऋषी सुनक यांचे सासरे आहेत.

सुनक आणि अक्षता मूर्ती यांचे लग्न 2009 ला बगलुरू येथे झाले. कृष्णा सुनक आणि अनुष्का सुनक या दोन मुली या दांपत्यास आहेत.

ऋषी सुनक यांचे राजकीय जीवन : Rishi Sunak : Britain’s New PM 2022

2014 मध्ये ऋषी सुनक यांनी राजकारण प्रवेश केला. 2014 ला ते सांसद बनले. 2015 ते 2017 मध्ये त्यांनी ग्रामीण आणि पर्यावरण या क्षेत्रात कार्य केले.

2020 ला ते ब्रिटेनचे अर्थमंत्री बनले. राजकोषाचा प्रभार देखील बोरिस जॉन्सन पंतप्रधान असतांना सांभाळलेला आहे.

बोरिस जॉन्सन यांच्या नंतर ब्रिटेनच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत ऋषी सुनक होते. परंतु लीझ ट्रस यांनी बाजी मारली. तेव्हा ऋषी सुनक पंतप्रधान होता होता राहिले. मात्र लीझ ट्रस यांनी 45 दिवसात पंतप्रधानपदाचा अलीकडेच  ब्रिटेनच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.

त्यानंतर ऋषी सुनक यांनी पेनी मॉर्डेंट यांचा पराभव केला. ऋषी सुनक यांना 185 खासदारांचा तर पेनी मॉर्डेंट यांना केवळ 25 खासदारांचा पाठिंबा मिळाला.

आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या ब्रिटेनला अर्थमंत्री राहिलेले ऋषी सुनक बाहेर काढतील अशी अपेक्षा केली जात आहे.

मित्रांनो आमचा Rishi Sunak : Britain’s New PM 2022 हा लेख कसा वाटले ते जरूर सांगा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.

तुम्ही आमच्या इतिहासाची सोनेरी पाने आणि अंतरंग या फेसबुक पेजेसला फॉलो करू शकता.

मराठी माहिती या वेबसाईटला जरूर भेट द्या.

संदर्भ : गुगल

 

Spread the love

Leave a Comment