January Dinvishesh | जानेवारी महिना दिनविशेष २०२२

January Dinvishesh | जानेवारी दिनविशेष २०२२

१ जानेवारी (january-dinvishesh)

January Dinvishesh

  • १७५६ : डेन्मार्कने निकोबार बेटे ताब्यात घेतली. निकोबार बेटांना न्यू डेन्मार्क असे नाव दिले. (January Dinvishesh)
  • १८०८ : गुलामांच्या आयातीस अमेरिकेत बंदी.
  • १८१८ : भीमा कोरेगाव येथे F.F. Stontan याच्या नेतृत्वाखाली बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या फौजेचा पराभव केला.
  • १८४२ : ज्ञानोदय हे वृत्तपत्र बाबा पद्मनजी यांनी सुरु केले.
  • १८४८ भिडे वाडा पुणे या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरु केली.
  • १८८० : पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना लोकमान्य टिळक, गोपाल गणेश आगरकर ,विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि माधवराव जोशी यांनी केली.
  • १८८३ : नूतन मराठी विद्यालयाची पुणे येथे स्थापना .
  • १८९९ : स्पेनची राजवट क्युबा मधून संपुष्टात आली.
  • १९०० : मित्रमेळा या संघटनेची स्वातंत्रवीर सावरकर यांनी स्थापना केली .
  • १९१९ : याच दिवशी Government of India Act अंमलात आला. भारतात कायदेमंडळे स्थापन करण्यात आली.
  • १९९५ : WTO ची स्थापना करण्यात आली.

हे ही वाचा डिसेंबर दिनविशेष 

२ जानेवारी

  • १७५७ : प्लासीच्या लढाईत बंगालच्या नवाबाचा इंग्रजांनी पराभव करून  कोलकाता काबीज केले.
  • १८८१ : मराठा नियतकालिक लोकमान्य टिळकांनी पुणे येथे सुरु केले.
  • १८८५ : फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे सुरु झाले.
  • १९५१ : ल्युना -१ हे अंतरीक्षयान रशियाने चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित केले.
  • १९५४ : भारतरत्न पुरस्काराची स्थापना राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केली.

३ जानेवारी

  •  १८३१ : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला.
  • १९२५ : बेनिटो मुसोलिनी हा इटलीचा हुकुमशहा बनला.
  • १९४७ : अमेरिकेत प्रथमच संसदेच्या कामकाजाचे टेलीव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.
  • १९५० : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्घाटन केले.
  • १९५२ : भारतात पहिल्यांदा राष्ट्रीय निवडणुका झाल्या.

४ जानेवारी

  • १८४७ : अमेरिकेला सम्युअल कोल्टने रिव्होल्वर पिस्तुल विकले.
  • १८८१ : केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी पुणे येथे सुरु केले.
  • १९२६ : क्रांतीकारकांवरील काकोरी खटल्याच्या सुनावणीस सुरुवात झाली.
  • १९४८ : इंग्लंडच्या गुलामगिरीतून म्यानमार( ब्रम्हदेश ) स्वतंत्र झाला.
  • १९६२ : अमेरिकेत न्यूयार्क येथे पहिली चालकरहित रेल्वे सुरु झाली.

५ जानेवारी

  • १६७१ : मराठी फौजेनी मुघलांकडून साल्हेर जिंकले.
  • १८३२ : बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • जर्मनीत द जर्मन वर्कर्स पार्टीची स्थापना झाली. याच पार्टीचे रुपांतर पुढे नाझी पार्टीत झाले.
  • १९२४ : महाड महानगरपालिकेने चवदार तळे सर्वांसाठी खुले केले.
  • १९४९ : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) पुणे येथे सुरु झाली.
  • १९५७ : विक्रीकर कायदा सुरु करण्यात आला.
See also  दिनविशेष : माहे डिसेंबर विषयी माहिती 2021 | December Dinvishesh In Marathi

६ जानेवारी

  • १६६५ : राजमाता जिजाऊ आणि सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला शिवरायांनी केली.
  • १६७३ : पन्हाळा किल्ला अवघ्या ६० मावळ्यांना सोबत घेऊन कोंडाजी फर्जद यांनी जिंकला.
  • १८३८ : सॅम्युअल मॉर्स यांनी तारायंत्राचा शोध लावला.
  • १९०७ : पहिली मॉटेसरी शाळा मारिया मॉटेसरी यांनी सुरु केली.

January Dinvishesh

७ जानेवारी

  • १६१० : गॅलिलिओ (Galileo) याने1953 दुर्बीणच्या साहाय्याने इयो,युरोपा,ग्यानिमिडी आणि कॅलिस्टो या गुरु ग्रहाच्या चार उपग्रहांचा शोध लावला.
  •  १७८९ : अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन निवडून आले.
  • १९२७ : न्यूयार्क ते लंडन दूरध्वनीसेवा सुरु झाली.
  • १९३५ :   Indian National Science Academy (INSA) चे उद्घाटन झाले.

८ जानेवारी (january-dinvishesh)

  • १९४७ : राजस्थान विद्यापिठाची स्थापना झाली.
  • १९६३ : मोनालिसा या जगप्रसिद्ध कलाकृतीचे अमेरिकेतील  National Gallery Of Art, Washington येथे पहिल्यांदाच प्रदर्शन करण्यात आले.
  • १९९९ : च्या एन.टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी लता मंगेशकर यांची निवड करण्यात आली.
  • २००१ : भारत आणि व्हिएतनाम यांच्यातसांस्कृतिक,पर्यटन आणि अणुउर्जा याबाबत करार झाला.

९ जानेवारी

  • १७६० : बरारीघाटचे युद्ध अहमद शाह याने मराठ्यांचा पराभव केला.
  • १७८८ : अमेरिकेचे पाचवे राज्य म्हणून कनेक्टिकट हे राज्य बनले.
  • १८८० : क्रांतिकारक बळवंत वासुदेव फडके यांना तेहरान जहाजाने एडन येथे नेण्यात आले.
  • १९१५ : महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात आले.

१० जानेवारी

  • १६६६ : छत्रपती शिवाजी महाराज सुरतेची लुट घेऊन राजगडकडे निघाले.
  • १७३० : पुण्यात शनिवार वाड्याचे बांधकाम सुरु झाले.
  • १८७० : मुंबईतील चर्चगेट रेल्वेस्थानक सुरु करण्यात आले.
  • १९२० : व्हर्सायचा तह अंमलात आल्याने पहिले महायुद्ध संपले.
  • १९६६ : भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.

११ जानेवारी (January Dinvishesh)

  •  १७८७ : विल्यम हर्शेल याने युरेनसच्या टीटानिया आणि ओबेरॉन या चंद्राचा शोध लावला.
  • १९२२ : मधुमेहावर उपचारासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.
  • १९७२ : पूर्व पाकिस्तानचे बांग्लादेश असे नामकरण करण्यात आले.
  • २००० : छत्तीसगड हायकोर्टाची स्थापना करण्यात आली.

१२ जानेवारी

  • १५९८ : राजमाता जिजाऊ यांचा जन्म.
  • १७०५ : मराठा साम्राज्याची राजधानी सातारा झाली.
  • १८६३ : स्वामी विवेकानंद यांचा जन्म.
  • १९३१ : महाराष्ट्रातील सोलापूर येथील क्रांतिकारक मल्लाप्पा धनशेट्टी, किसन सारडा, आणि कुरबान हुसेन यांना फाशी देण्यात आली.
  • १९३६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केली.
  • २००५ : राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना करण्यात आली.

१३ जानेवारी

  • १९५३ : मार्शल टिटो युगोस्ल्व्हियाचे अध्यक्ष झाले.
  • १९५७ : हिराकुंड या धरणाचे उद्घाटन झाले.
  • १९९६ : पुणे – मुंबई शताब्दी रेल्वे सुरु झाली.
  • २००७ : भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणून के.जी. बालकृष्णन यांनी पदभार स्वीकारला.
See also  दिनविशेष : माहे डिसेंबर विषयी माहिती 2021 | December Dinvishesh In Marathi

१४ जानेवारी

  • १७६१ : पानिपतची तिसरी लढाई. मराठ्यांचा पराभव.
  • १९२३ : विदर्भ साहित्य संघाची स्थापना करण्यात आली.
  • १९४८ : मराठी वृत्तपत्र लोकसत्ता सुरु झाले.
  • १९९४ : मराठवाडा विद्यापीठाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामकरण झाले.
  • १९९८ : विख्यात गायिका एम.एस.सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला.

१५ जानेवारी

  •   १८६१ :  सुरक्षित उद्वाहक ( lift) बाबतचे एलिसा जी. ओटिस यांना जगातील पहिले पेटंट प्राप्त झाले.
  • १९४९ : ब्रिटिशांकडून जनरल करिआप्पा यांनी भारतीय सेनेची सूत्रे स्वीकारली.
  • १९९६ : व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव बदलवून छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे करण्यात आले.
  • २००१ : विकिपीडिया इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाले.

१६ जानेवारी

  • १६६० : छत्रपती शिवाजी महाराज यांनी रुस्तुम झमान आणि फाजलखान यांचा पराभव केला.
  • १६६६ : शिवाजी महाराज यांचा पन्हाळा किल्ल्यावर केलेला हल्ला अयशस्वी.
  • १६८१ : छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला.
  • १९२० : राष्ट्रसंघाची पहिली बैठक पार पडली.
  • १९४१ : नेताजी सुभाषचंद्र बोस नजरकैदेतून भारताबाहेर निसटले.
  • १९९८ : उर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना साहित्याचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला.

१७ जानेवारी

  • १७७३ : कॅप्टन जेम्स कुक यांनी अंटार्क्टिका वृत्त पार केले.
  • १९४१ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जर्मनीला प्रयाण.
  • १९४५ : दुसऱ्या महायुद्धात राष्याने पोलंडमधील वार्सा शहर उद्ध्वस्त केले.
  • १९४६ : संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची पहिली बैठक पार पडली.

१८ जानेवारी

  • १७७८ : कॅप्टन जेम्स कुक हे हवाई बेटांवर जाणारे पहिले युरोपीय ठरले.
  • १९७४ : इस्राइल आणि इजिप्त यांच्यात शांतता करार झाला.
  • १९९८ : भारताचे २८ वे सरन्यायाधीश म्हणून मदनमोहन पुंछी यांनी पदभार ग्रहण केला.
  • प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर.

१९ जानेवारी

  •  १८३९ : ब्रिटीश ईस्ट इंडियाकंपनीने एडन ताब्यात घेतले.
  • १९०३ : अटलांटिक महासागरापार पहिला बिनतारी संदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांनी ब्रिटनचे राजे एडवर्ड ( सातवे ) यांना पाठविला.
  • १९४२ : दुसऱ्या महायुद्धात जपानने म्यानमारवर हल्ला केला.
  • १९४९ : इस्राइलला क्युबाने राजनैतिक मान्यता दिली.
  • २००६ : न्यू होरायझन हे नासाचे अंतराळयान प्लुटोकडे प्रक्षेपित झाले.

२० जानेवारी (January Dinvishesh)

  • १८४१ : ब्रिटनने हॉंगकॉंगचा ताबा घेतला.
  • १९३७ : अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून फ्रँकलिन डीलानो रुझवेल्ट यांनी शपथ घेतली. तेव्हापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष २० जानेवारीलाच शपथ घेतात.
  • १९५७ : आशियातील पहिली अणुभट्टी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते देशाला समर्पित करून Atomic Energy Establishment ची स्थापना.
  •  १९६३ : चीन आणि नेपाळ यांच्यात सीमारेषेबाबत करार झाला.
  • १९९९ : गिरीश कर्नाड यांना साहित्याचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
  • २००९ : अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.

२१ जानेवारी

  • १७६१ : थोरले माधवराव पेशवे यांनी पेशवा म्हणून राज्यकारभार सुरु केला.
  • १८४६ : डेली न्यूज वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित.
  • १९७२ मणिपूर आणि मेघालय या राज्यांना स्वतंत्र घटकराज्याचा दर्जा प्राप्त झाला.
See also  दिनविशेष : माहे डिसेंबर विषयी माहिती 2021 | December Dinvishesh In Marathi

२२ जानेवारी

  •  १९०१ : सातवा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा बनला.
  • १९२४ : ब्रिटनमध्ये मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.
  • १९४७ : भारतीय संविधानाच्या रुपरेषेविषयी ठराव घटना समितीत मंजूर झाला.
  • १९६३ : अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालयाची स्थापना डेहराडून येथे झाली.
  • २००१ : INS ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात दाखल झाली.
  • २०१५ : पंतप्रधान मोदी यांनी हरियाणातील पानिपत येथे बेटी बचाओ , बेटी पढाओ या योजनेची स्थापना केली.

२३ जानेवारी

  • १५६५ : विजयनगर साम्राज्य संपुष्टात आले.
  • १७०८ : छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला.
  • १९९७ : अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री Madlen Allbright या बनल्या.

२४ जानेवारी (January Dinvishesh)

  • १८५७ : दक्षिण आशियातील पहिले विद्यापीठ कोलकाता येथे स्थापन झाले.
  • १८६२ : रुमानियाची राजधानी बुखारेस्त करण्यात आली.
  • १९६६ : इंदिरा गांधी यांनी भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून शपध घेतली.
  • १९६६ : डॉ. होमी जहागीर भाभा यांचा विमान अपघातात मृत्यू झाला.

२५ जानेवारी

  •  १७५५ : मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.
  • १८८१ : थॉमस अल्वा एडिसन आणि ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.
  • १९१९ : पहिले महायुद्ध संपल्यावर राष्ट्रसंघाची स्थापना झाली.
  • १९८२ : आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्न प्रदान.
  • २००१ : लता मंगेशकर आणि बिस्मिल्ला खान यांना भारतरत्न प्रदान.

२६ जानेवारी

  • १८३७ : मिशिगन हे अमेरिकेचे २६ वे राज्य बनले.
  • १९०५ : कलिनन हा हिरा दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया जवळच्या खाणीत सापडला.
  • १९३० : भारतीय राष्ट्रीय काँग्रेंसने पूर्ण स्वराज्य दिन म्हणून जाहीर केले.
  • १९४९ : भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला.
  • १९५० : भारत देश प्रजासत्ताक झाला. देशाचे पहिले राष्ट्रपतीपदी डॉ. राजेंद्र प्रसाद विराजमान.
  • १९६५ : हिंदी भाषेला शासकीय भाषा म्हणून मान्यता.

२७ जानेवारी

  • १८८८ वाशिंग्टन  डी.सी. या ठिकाणी National Geographic Society ची स्थापना झाली.
  • १९२६ : जॉन लोगीबेअर्ड यांनी पहिल्यांदाच टेलिव्हिजनचे प्रात्यक्षिक दाखविले.
  • १९६७ : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची याच दिवशी स्थापना झाली. आताचे नाव बालभारती आहे.
  • १९७३ : अमेरिका – व्हिएतनाम युद्ध संपुष्टात आले. पेरीस येथे करार झाला.

२८ जानेवारी

  • १९४२ : दुसऱ्या महायुद्धात जपानने शांघायचा ताबा घेतला.
  • १९६१ : एच.एम.टी. या घड्याळ बनविणाऱ्या कंपनीचा भारतातील पहिला कारखाना बंगलोर येथे सुरु झाला.
  • १९७७ : भारताचे 15 वे सरन्यायाधीश म्हणून मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी पदभार स्वीकारला.
  • १९८६ : Challenger या अवकाशयानाचा उड्डाणानंतर ७४ सेकंदाने स्फोट झाला.

२९ जानेवारी

  • १७८० : जेम्स हिकी यांनी कोलकाता येथे General Advertiser हे साप्ताहिक सुरु केले.
  • १८६१ : कॅन्सास हे अमेरिकेचे ३४ राज्य बनले.
  • १९८९ : हंगेरीने दक्षिण कोरियासोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.

३० जानेवारी

  • १९३३ : हिटलर याचा जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी सोहळा झाला.
  • १९४८ : महात्मा गांधी यांचा नथुराम गोडसेनी खून केला.
  •  १९९४ पीटर लेंको सर्वात लहान वयाचा बुद्धिबळपटू Grandmaster बनला.
  • १९९९ : पंडित रविशंकर यांना भारतरत्न जाहीर झाला.

३१ जानेवारी

  • १९११ : स्वातंत्रवीर सावरकर यांना दुसऱ्या जन्मपेठेची शिक्षा सुनावल्या गेली.
  • १९२० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षीकाची सुरुवात झाली.
  • १९४९ मुंबई राज्यात बडोदा आणि कोल्हापूर ही संस्थाने विलीन झाली.
  • १९५० : देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी संसदेसमोर पहिले भाषण दिले.
  • १९९२ : राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली.

 

आमचा हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा आणि नक्की शेअर करा.

तुम्ही आमच्या या http://www.marathimahiti.com website ला भेट देऊ शकता.

Spread the love

Leave a Comment