दिनविशेष : माहे डिसेंबर विषयी माहिती 2021 | December Dinvishesh In Marathi

Table of Contents

दिनविशेष : माहे डिसेंबर | december dinvishesh in marathi

दिनविशेष : माहे डिसेंबर विषयी माहिती 2021 | december dinvishesh in marathi

१ डिसेंबर :

एड्स प्रतिबंधक दिन.

इ.स. १८८५ – जेष्ठ साहित्यिक, गांधीवादी, आचार्य काका कालेरकर यांचा जन्म.

इ.स. १९०९ – मराठी कवितेस नवे वळण देणारे कवी बा. सी. मर्ढेकर यांचा जन्म.

इ.स. १९६५- भारताच्या सीमा सुरक्षा दलाची स्थापना.

इ.स. १९८५ – स्वातंत्रसेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी यांच निधन.

इ.स. १९९०  – मुत्सद्दी , राजकारणी विजयलक्ष्मी पंडित यांचे निधन.

२ डिसेंबर :

जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन. 

जागतिक संगणक साक्षरता दिन.

इ.स.  १८८५ – कायदेपंडित तथा समाजसुधारक सर नारायण गणेश चंदावरकर यांचा जन्म.

इ.स. १९०५ – अनंत काणेकर यांचा जन्म.

इ.स. १९४२ अरविंद आश्रमाची पाँडिचेरी येथे स्थापना.

३ डिसेंबर | december dinvishesh in marathi

जागतिक अपंगदिन. 

इ.स.१८८४ – भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेन्द्र प्रसाद श्रीवास्तव यांचा जन्म.

इ.स.१९५१- कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे निधन.

इ.स. १९७१ – भारत-पाकिस्तान यांच्यात तीसरे युद्ध सुरु.

इ.स. १९७९ – हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंदयांचे निधन.

इ.स. २०११ – सदाबहार अभिनेते देव आनंद यांचे लंडन येथे निधन.दिनविशेष : माहे डिसेंबर विषयी माहिती 2021 | december dinvishesh in marathi

४डिसेंबर | december dinvishesh in marathi

भारतीय नौसेना दिवस.

इ.स. १७७१ – द ऑब्जर्व्हर हे जगातील पहिले रविवार वृत्तपत्र प्रकाशित झाले.

इ.स. १८३५ – इंग्लिश लेखक सॅम्युअल बटलर यांचा जन्म.

इ.स. – १८५० विद्युत मोटरचे शोधक विल्यम स्टर्जन यांचे निधन.

इ.स. १८८१ – लॉस एंजेलिस टाइम्स वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला.

इ.स. १९२४ – गेट वे ऑफ इंडिया या वास्तुचे व्हाईसरॉय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन.

इ.स. १९४८ -भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक झाली.

इ.स. १९६७ – थुंबा येथील तळावरून रोहिणी या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी  उड्डाण.

इ.स. १९७१ – ऑपरेशन ट्रायडेंट या नावाखाली भारतीय नौसेनेचा पाकिस्तानच्या कराची शहरावर हल्ला. दोन विनाशिकांसह तीन पाकिस्तानी युद्धनौका बुडाल्या, अनेक उद्ध्वस्त.

इ.स. १९७५ – सूरीनामचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

५ डिसेंबर | december dinvishesh in marathi

जागतिक मृदा दिन. 

इ.स. १९४३ – डॉ. लक्ष्मण देशपांडे प्रख्यात मराठी लेखक दिग्दर्शक व कलाकार यांचा जन्म.

इ.स. १९५० – योगी अरविंद घोष यांचे निधन.

इ.स. १९८९ – फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि. मी. ची गती गाठून विश्वविक्रम रचला.

इ.स. २०१३ दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती,नोबेल पारितोषिक विजेते, भारतरत्न नेल्सन मंडेला यांचे निधन.

इ.स. २०१६ – तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांचे निधन.

६ डिसेंबर :

इ.स. १७६८ – एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

इ.स. १८७७ – द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राच्या प्रकाशानस सुरुवात झाली.

इ.स. १८९७ – परवाना टॅक्सीकॅब सुरु करणारे लंडन हे जगातील पहिले शहर ठरले.

इ.स. १९१७ – फ़िनलैंड रशियापासुन स्वतंत्र झाला.

इ.स. १९९९ – जर्मनीची टेनिसपटु स्टेफी ग्राफ हिला ऑलम्पिक ऑर्डर या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

See also  January Dinvishesh | जानेवारी महिना दिनविशेष २०२२

इ.स. २००० – थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते केंद्र सरकारचा डॉ. बाबासाहेब  आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

इ.स. १८६१ – कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचा जन्म.

इ.स. १८९२- सीमेन्स कंपनीचे संस्थापक वर्नेर व्होंन सीमेंन्स यांचे निधन.

इ.स. १९५६ – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांचे दिल्ली येथे  निधन.

इ.स. १९९० – मलेशिया देशाचे पहिले पंतप्रधान तुक्रू अब्दुल रहमान यांचे निधन.

७ डिसेंबर :

विमानवाहतुक दिन. 

इ.स.१८२५ – बाष्पशक्तीवर चालणारे एंटरप्राइज हे भारतात आलेले पहिले जहाज.

इ.स. १८५६ – पहिला उच्चवर्णीय विवाह कोलकता येथे पार पडला.

इ.स. १९१७ – पहिल्या महायुद्धात अमेरिकेने ऑस्ट्रिया/हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले.

इ.स. १९४१ – दुसरे महायुद्ध – जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला.

इ.स. १९७५ – इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर आक्रमण केले.

इ.स. १९८८ – यासर अराफात यांनी इस्त्राएलला मान्यता दिली.

इ.स. १९९४ – कन्नड़ साहित्यिक  यु.आर. अनंतमूर्ति यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर.

इ.स. १९९५ – फ्रेंच गयानातील  कोऊरु प्रक्षेपण केंद्रावरून  इन्सॅट – २  सी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.

इ.स. १९९८ – ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड.

इ.स. २०१६ – पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे पीके ६६१ विमान कोसळले. ४७ ठार.

८ डिसेंबर :

सार्क दिवस.

इ.स. १७२० – बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे यांचा जन्म.

इ.स.१८७७ – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित नारायण सदाशिव मराठे यांचा जन्म.

इ.स. १८९७ – कवी पंडित बाळकृष्ण शर्मा उर्फ नविन यांचा जन्म.

इ.स. १९३५ – प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचा जन्म.

इ.स. १९७८ – इस्त्राएलच्या पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मायर यांचे निधन.

इ.स. १९८० – जॉन लेननची न्यूयार्कमध्ये हत्या.

इ.स. १९८५ सार्क परिषदेची स्थापना.

९ डिसेंबर :

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी  दिन. 

इ.स. – १९०० अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत भाग घेउन स्वामी विवेकानंद मुंबईत परतले.

इ.स. १९०० – डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धांची सुरुवात झाली.

इ.स. १९४२ द्वारकानाथ कोटणीस यांचे निधन.

इ.स. १९४६ दिल्ली मध्ये घटना परिषदेची पहिली बैठक.

इ.स. १९६९- टांझानिया ( पूर्वीचे टांगानिका) या देशाचा स्वातंत्र दिन.

इ.स. १९९५- बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ.

इ.स. १९९७ ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, पद्मभूषण, साहित्य अकादमी अवार्ड विजेते क. शिवम कारंथ यांचे निधन.

इ.स.  २००३- हिंदी चित्रपट अभिनेते देव आनंद यांना दादासाहेब  फाळके पुरस्कार जाहीर.दिनविशेष : माहे डिसेंबर विषयी माहिती 2021 | december dinvishesh in marathi

१० डिसेंबर :

मानवी हक्क दिन. 

इ.स. १८७० – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांचा जन्म.

इ.स. १८८० – प्राच्यविद्या पंडित श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांचा जन्म.

इ.स. २००१ – हिंदी चित्रपट अभिनेते ‘दादामुनी’ अशोक कुमार यांचे निधन.

इ.स. २००९ – लेखक,कवी, चित्रकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे निधन.

११ डिसेंबर | december dinvishesh in marathi

यूनिसेफ दिन.

इ.स. १८९९ – कादंबरीकार पुरुषोत्तम यशवंत देशपांडे यांचा जन्म.

इ.स. १९२२ – अभिनेते दिलीप कुमार यांचा जन्म.

इ.स.१९२५ – मराठी साहित्यिक राजा मंगळवेढेकर याचा जन्म.

इ.स. १९३१ – आचार्य रजनीश उर्फ ओशो यांचा जन्म.

इ.स.- १९४६ यूनिसेफची  स्थापना.

इ.स. १९६९- भारतीय बुध्दिबळ खेळाडू , ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदचा जन्म.

इ.स. १९९८ – राष्ट्रकवी प्रदीप यांचे निधन.

१२ डिसेंबर | december dinvishesh in marathi

  स्वदेशी दिन.

इ.स. १९६३ – केन्या युनायटेड किंगडम पासून स्वतंत्र झाला.

इ.स.१९४० – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांचा जन्म.

इ.स. १९४९ – भारतीय जनता पार्टीचे नेते मा. गोपीनाथ मुंडे यांचा जन्म.

इ.स. १९९२ – पं. महादेव शात्री जोशी, भारतीय संस्कृतीकोशाचे जनक, यांचा मृत्यु.

इ.स. २०१५-  शरद अनंत जोशी, शेतकरी संघटनेचे नेते, यांचा मृत्यु.

१३ डिसेंबर :

इ.स. १९८६ – प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांचे निधन.

इ.स. १९९४ – वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक तात्यासाहेब कोरे यांचे निधन.

इ.स. १९९१ – मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे २३ वे सरन्यायाधीस म्हणून कार्यभार स्वीकारला.

इ.स. २००१- भारतीय संसदेवर अतिरेक्यांचा हल्ला.

इ.स. २००२ – जेष्ठ चित्रपट निर्माते – दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

See also  January Dinvishesh | जानेवारी महिना दिनविशेष २०२२

इ.स. २००६ – अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चैंपियनशिप टेनिसचे संस्थापक लामर हंट यांचे निधन.

इ.स. २०१६ – अँडी मरे ,अँजेलिकु केरबर यांना आयटीएफ (इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन) ने २०१६ जागतिक विजेते घोषित केले.

१४ डिसेंबर :

उर्जा संरक्षण दिन.   

इ.स. १५०३ – प्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता, गणितज्ञ नोस्त्रडेमस यांचा जन्म.

इ.स. १७९९ – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे निधन.

इ.स. १८१९ – अलाबामा हे अमेरिकेचे २२ वे राज्य बनले.

इ.स. १८९६ – ग्लासगो अंडरग्राउंड रेल्वे सुरु झाली.

इ.स. १९०३ – राईट बंधूंनी किटीहॉक, नॉर्थ कॉरोलिना येथे विमान उड्डाणाचा पहिला प्रयत्न केला.

इ.स. १९२९ – प्रभातचा  गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

इ.स. १९६१ – टांझानियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

इ.स. १९६६ – गीतकार शंकरदास केसरीलाल उर्फ शैलेन्द्र यांचे निधन.

इ.स.१९७७ गीतकार, कवी,लेखक,पटकथाकार,अभिनेते गजानन दिगंबर तथा ग.दि.माडगूळकर यांचे निधन.

इ.स. १९६२ – नासाचे मरिनर २ जगातील पहिले अवकाशयान जे शुक्र ग्रहाच्या जवळून यशस्वीरित्या उडाले.

इ.स. २००६ अटलांटिक रिकार्ड्सचे सहसंस्थापक अल्लम एर्टेगुन यांचे निधन.

१५ डिसेंबर :

इ.स. १७४९ – छत्रपती शाहूजी महाराज यांचे निधन.

इ.स. १८०३ – नागपूरकर भोसले यांनी ओरिसाचा ताबा ईस्ट इंडिया कंपनीकड़े दिला.

इ.स. १८३२ – फ्रेंच वास्तुरचनाकार, आयफेल टॉवरचे निर्माता  आणि अभियंता गुस्ताव अलेक्झांद्रे आयफेल यांचा जन्म.

इ.स. १९४१ – जपानी सैन्याने हाँगकाँगमध्ये प्रवेश केला.

इ.स. १९६० – नेपाळचे राजा महेंद्र यांनी देशाचे संविधान, संसद आणि मंत्रीमंडळ बरखास्त करून थेट शासन लादले.

इ.स. १९७० – व्हेनेरा- ७ हे रशियन अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले.

इ.स. १९७१ – बांग्लादेश पाकिस्तान पासुन स्वतंत्र झाला.

इ.स. १९७६ – सामोआचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

इ.स. १९९१ – चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक जाहीर झाले.

इ.स. १९९८ – बँकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमध्ये  सलग तीसरे सुवर्णपदक मिळाले.

१६ डिसेंबर :

राष्ट्रीय पत्रकार दिन. 

इ.स. १७७० – कर्णबधिर संगीतकार लुडविग व्हान बीथाव्हेन यांचा जन्म.

इ.स. १८५४ – भारतातील पहिल्या इंजिनीअरींग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली.

इ.स. १९०३ – मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.

इ.स. १९४६ -थायलंडचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

इ.स. १९७१ – भारतासमोर पाकिस्तानने शरणागती पत्करली.

इ.स. १९८५  – कल्पकम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रातील प्रायोगिक फस्ट ब्रीडर रिअॅक्टर राष्ट्राला समर्पित.

इ.स. १९९१ – सोविएत  यूनियन मधून बाहेर पडून कझाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र झाले.

१७ डिसेंबर :

इ.स. १३९८ – तैमुर लंगने दिल्लीजवळ सुलतान नसीरुद्दीन मेहमूदच्या सैन्याचा पराभव केला.

इ.स.१७१८  ग्रेट ब्रिटनने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.

इ.स. १७७७ – फ्रांसने अमेरिका या राष्ट्राला मान्यता दिली.

इ.स. १९२७ – हिन्दुस्थान रिपब्लिक असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने नियोजित तारखेच्या दोन दिवस आधी फाशी दिली .

इ.स. १९२८ – भगतसिंग, सुखदेव,राजगुरु यांनी ब्रिटिश पोलिसअधिकारी जेम्स सॅडर्स याची लाहोर येथे हत्या केली.

इ.स. १९६१ – गोवा पोर्तुगालपासुन मुक्त झाले.

१८डिसेंबर :

आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन. 

अल्पसंख्याक हक्क दिन.       

इ.स. १९३५ – श्रीलंकेत लंका सम समाज पार्टीची स्थापना केली.

इ.स. १९५८ – जगातील पहिले संचार उपग्रह प्रोजेक्ट स्कोर प्रक्षेपित करण्यात आले.

इ.स. १९७८ – डॉमिनिक राष्ट्राचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

इ.स. १९९५ – टांझानियाचे माजी अध्यक्ष जुलिअस न्येरेरे यांना अहिंसक मार्गाने सामाजिक,आर्थिक व राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल पहिला आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार जाहीर.

इ.स. १९८९ – एस. मुखर्जीयांनी भारताचे २० वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारला.

इ.स. २००६ – संयुक्त अरब अमीरातीमध्ये प्रथमच निवडणुका घेण्यात आल्या.

इ.स. २०११ – चेक रिपब्लिकचे पहिले अध्यक्ष वाक्लावहेवल यांचे निधन.

१९डिसेंबर :

इ.स. १९२७ – राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अशफाक़ उल्ला खां या क्रांतिकारकाना ब्रिटिश सरकारने फाशी दिली.

इ.स. १९३४ – भारताच्या १२ व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा जन्म.

इ.स. १९४१ -अडॉल्फ हिटलर हा जर्मन सैन्याचा सरसेनापती बनला.

इ.स. १९६१ – पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेलेदमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.

See also  January Dinvishesh | जानेवारी महिना दिनविशेष २०२२

इ.स. १९६३ – झांजिबार ग्रेट ब्रिटनपासुन स्वतंत्र झाला. सुलतान जमशीदबिनअब्दूल्लाह याची सत्ता प्रस्थापित झाली.

इ.स. २००२ – व्ही. एन. खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारला.

२० डिसेंबर :

मानवी ऐक्यभाव दिन.

इ.स. १९४५ – मुंबई – बंगळुरु प्रवाशी विमानसेवा सुरु झाली.

इ.स. १९७१ – झुल्फिकारअली भुट्टो पाकिस्तानचे चौथे राष्ट्रध्यक्ष बनले.

इ.स. १९९४ – मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा ‘जवाहरलाल नेहरू पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

इ.स. १९९९ – पोर्तुगाल ने ‘मकाऊ’ बेट चीनला परत दिले.

इ.स. २०१० – जेष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकरयांना ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ जाहीर.

२१ डिसेंबर :

इ.स. १९०९ – अनंत कान्होरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन याचा वध केला.

इ.स. १९१३ – ऑर्थर वेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे न्यूयार्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले.

इ.स. १९५०  – ड्रीमवर्क्स अॅनिमेशनचे सहसंस्थापक जेफरी कॅझेनबर्ग यांचा जन्म.

इ.स. १९८६ – भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणून रघुनंदन स्वरुप पाठक यांनी कार्यभार स्वीकारला.

२२ डिसेंबर :

राष्ट्रीय गणित दिवस.

सूर्याच्या उत्तरयाणास प्रारंभ.   

उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात लहान दिवस.

इ.स. १६६६ – शिखांचे १० वे गुरु – गुरु गोविंद सिंग यांचा जन्म.

इ.स. १८५१ – जगातील पहिली मालगाड़ी रुरकी येथे सुरु झाली.

इ.स. सामुराई इटो हिरोबुमी जपानचे पहिले पंतप्रधान झाले.

इ.स.१८८७- थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म.

२३ डिसेंबर :

भारतीय किसान दिन. 

इ.स. १९४० – वालचंद  हिराचंद यांनी बंगळुरु येथे हिन्दुस्थान एयरक्राफ्ट हा भारतातील पहिला विमान निर्मितीचा कारखाना सुरु केला.

इ.स. १९५४ – बिजन कुमार मुखरेजा यांनी भारताचे ४थे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.

इ.स. २००१ – बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. (उंची१०४ फुट).

इ.स. २०१३ – एके ४७ रायफलचे निर्माते मिखाइल कलाशनिको यांचे निधन.

२४ डिसेंबर :

राष्ट्रीय ग्राहक दिन.

इ.स. १७७७ – कॅप्टन जेम्स कूक यांनी प्रशांत महासागरातील किरितिमती बेटांचा शोध लावला.

इ.स. १९२४ – अल्बानिया या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळाले.

इ.स. १९४३ दुसरे महायुद्ध – जनरल आयसेनहॉवर हे दोस्त राष्ट्रांच्या फौजांचे सरसेनापती बनले.

इ.स. १९५१ – लिबिया हा देश इटलीकडून स्वतंत्र झाला.

 

२५ डिसेंबर :

ख्रिसमस डे – येशू ख्रिस्ताचा जन्म. 

इ.स. १९२४ भारताचे १० वे पंतप्रधान मा. अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म.

इ.स. १९७६ – ‘आय.एन.एस. विजयदुर्ग ‘ ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील.

इ.स. १९९० – वर्ल्ड वाइड वेब (www) पहिली चाचणी यशस्वी.

इ.स. १९९१ – मिखाइल गोर्बाचेव्ह यानि सोविएत संघराज्याच्या अध्यक्षपदाचा  राजीनामा दिला.

२६ डिसेंबर :

इ.स. १८९८ – मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम  हे मुलद्रव्य वेगळे केले.

इ.स.  १९७६ – कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ ची स्थापना.

इ.स. १९८२ – टाइम मासिकातर्फे दिला जाणारा ‘ मॅन ऑफ द इयर’ पुरस्कार प्रथमच पर्सनल कंप्यूटर (PC) या एका अमानवी वस्तुला देण्यात आला.

इ.स. १९९७ – विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फाउन्डेशन पुरस्कार.

२७ डिसेंबर :

इ.स. १८९८- भारताचे पहिले कृषिमंत्री – डॉ. पंजाबराव देशमुख  यांचा जन्म.

इ.स. १९११ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात ‘ जन गण मन’ हे रविंद्रनाथ  टागोर यांनी रचलेले व संगीतबध्द केलेले गीत प्रथमच म्हटले गेले.

इ.स. १९४५ – २९ देशानी केलेल्या करारानुसार जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेंनिधी यांची स्थापना करण्यात आली.

इ.स. १९४९ – इंडोनेशियाला हॉलंडकडून स्वातंत्र मिळाले.

 २८ डिसेंबर :

इ.स. १६१२ – गॅलिलिओ याने नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला.

इ.स. १८३६ – स्पेनने मेक्सिकोच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

इ.स. १८४६ – आयोवा हे अमेरिकेचे २९ वे राज्य बनले.

इ.स. १८८५ – मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना.

इ.स. १९३७ – उद्योगपती रतन टाटा यांचा जन्म.

 २९ डिसेंबर :

इ.स.१८४४- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमकेशचंद्र बॅनर्जी यांचा जन्म.

इ.स. १९२१ – फेडरल रिपब्लिक ऑफ युगोस्लाव्हियाचे पहिले अध्यक्ष डोब्रिका कोसिक यांचा जन्म.

इ.स. १९३० – सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिध्दांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टिकोन मांडला.

इ.स. १९५९ – पोर्तुगालमधील लिस्बन येथे भुयारी रेल्वेची  सुरुवात झाली.

३० डिसेंबर :

इ.स.१९०२ – घटना समितीचे सदस्य, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ,भाषाशास्त्रज्ञ डॉ.रघू वीरा यांचा जन्म.

इ.स. १९०६ – ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाक्का येथे स्थापना.

इ.स. १९२४ – एडविन हबलने आकाशगंगाखेरीज इतर दीर्घिकांही अस्तित्वात असल्याचे जाहीर केले.

इ.स. १९४३ – सुभासचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला.

३१ डिसेंबर :

इ.स. १६०० – ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना.

इ.स. १८०२ – इंग्रज व बाजीराव दूसरा यांच्यात वसईचा तह.

इ.स.१८७९ – एडीसनने मेन्लोपार्क , न्यू जर्सी  येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखविले.

इ.स. १९४४ – दुसरे महायुद्ध – हंगेरीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

इ.स. १९९९ – पनामा कालव्यावर पनामा देशाचे पूर्ण नियंत्रण आले.

आपण ह्या पोस्ट मध्ये माहे डिसेंबर विषयी बद्दल माहिती घेतली . तुम्हाला जर JANJIRA FORT INFORMATION IN MARATHI बद्दल माहिती जाणून घायची असेल तर तुम्ही हि पोस्ट वाचू शकता .

तुम्हाला Blogging In Marathi बद्दल अजून जाणून घ्यायचे असेल तर मराठी जीवन वेबसाईट ला भेट दया .

Spread the love

8 thoughts on “दिनविशेष : माहे डिसेंबर विषयी माहिती 2021 | December Dinvishesh In Marathi”

  1. या माहितीत ६ डिसेंबर च्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाची माहिती नाही टाकली. माहिती बदल करावा.

    Reply

Leave a Comment