जंजिरा किल्ला : एक अजिंक्य जलदुर्ग 2021 | Full Janjira Fort Information In Marathi

Janjira Fort Information In Marathi | जंजिरा किल्ला विषयी माहिती

 

 

मध्ययुगीन काळात किल्ल्यांना खूप महत्त्व होते. ज्या राजाच्या साम्राज्यात भरपूर किल्ले असत त्याचे साम्राज्य बलाढ्य मानले जात असे. कारण बलाढ्य व दुर्गम असे किल्ले हाताशी राहाल्यावर आजूबाजू च्या प्रदेशावर राज्य चालविणे सोयीचे जाईच. त्याशिवाय शत्रूंशी युद्ध करायलाही सोपे जात होते.किल्ल्यांच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शत्रूंचा कसा सामना केला हे आपल्याला माहीत आहेच. आजच्या या लेखात आपण अशाच एका अजिंक्य जलदुर्ग –  मुरुड जंजिरा म्हणजेच janjira fort information in marathi या किल्ल्याची माहिती घेऊ या.

जंजिऱ्याचा इतिहास –

फार पूर्वी राजपुरी जवळ असलेल्या खाडी मध्ये एक बेट होते.तेथील खाडीत आजूबाजूचे कोळी मासेमारी करीत असत. त्यावेळेस समुद्री लुटारुंच्या खूप त्रास असायचा. त्यामुळे या कोळी लोकांनी राजपुरीच्या ठाणेदाराची रीतसर परवानगी घेऊन या बेटाभोवती एक मेढेकोट तयार केला. मोठमोठे लाकडी ओंडके एका पुढे एक जमिनीत रोवून बंदिस्त केलेली जागा म्हणजे मेढेकोट होय. त्यावेळचा या कोळी लोकांचा प्रमुख होता राम पाटील. या बेटाचे महत्त्व या राम पाटीलच्या लक्षात आले. त्याने खुद्द राजपुरीच्या ठाणे दारा लाच बेटावर येण्यास मनाई केली. त्यामुळे या ठाणेदार ने निजामशहाच्या दरबारी याची माहिती कळविली. निजामश हाने पिरमखान या हुशार सरदाराला या प्रकरणी लक्ष घालायला सांगितले. पिरमखान हा मुत्सद्दी होता. त्याने शक्ती ऐवजी युक्तीने काम करायचे ठरविले.

पिरमखानने एका दारूच्या व्यापाऱ्याला राम पाटलाची भेट घेण्यास सांगितले. या भेटीत त्या व्यापाऱ्याने राम पाटील आणि त्याच्या सोबत्यांना उत्कृष्ट प्रतीची दारूच्या बाटल्या भेट म्हणून दिल्या. राम पाटील आणि व्यापारी यांचा स्नेह वाढतच राहिला. असेच एके दिवशी व्यापाऱ्याने राम पाटील ला सांगितले की त्याचे लोकांनी हा मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राम पाटील ने काही विचार न करता मान्य केले. व्यापाऱ्याची लोकं आली. त्या रात्री राम पाटील आणि त्याच्या लोकांनी खूप दारू पिली आणि बेहोश होऊन गेली. झाले पिरमखान याचीच वाट बघत होता. पिरमखानाच्या लोकांनी राम पाटील आणि त्याच्या लोकांना ठार मारले.

See also  Purandar fort information in marathi 2021 | पुरंदर किल्ला माहिती

पिरमखानने अशाप्रकारे त्या मेढेकोटचा ताबा मिळविला. पिरमखानच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी आला अबिसिनियातील हबशी – बुऱ्हानखान. हा जबरदस्त शक्तिशाली आणि कर्तबगार होता. त्याने बादशहाच्या परवानगीने १५६७ ते १५७१ या कालावधीत त्या मेढेकोट चा अभेद्य असा जलदुर्ग बनविला. त्या बुलंद अशा जल दुर्गास त्याने नाव ठेवले ‘ जझिरे मेहरूब ‘ अरबी भाषेत जझिरा म्हणजे बेट आणि मेहरूब म्हणजे चंद्रकोर. पुढे जाझीरा चा अपभ्रंश होत जंजिरा असे नाव त्या जल दूर्गास पडले.
कालांतराने १६१७ सिद्दी अंबर याने बादशहापासून स्वतंत्र जहागिरीची सनद प्राप्त केली. हा सिद्दी अंबरच सिद्दी घराण्याचा मूळ पुरूष आहे.

अजिंक्य जंजिऱ्या् वर झालेले हल्ले –

जंजिऱ्यावर अनेक वेळा हल्ले झाले.पण जंजिरा किल्ला म्हणजेच janjira fort information in marathi हा शेवटपर्यंत अजिंक्यच राहाला. भौगोलिक दृष्ट्या जंजिरा जिंकणे कठीणच होते. जंजिऱ्यावर झालेली आक्रमणे आपण बघू या.

छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले हल्ले :

महाराजांनी जंजिऱ्याकडे आपले लक्ष १६५७ साली वळविले. जुलै १६५७ ला त्यांनी नी काळोख पंत आणि रघुनाथ बल्लाळ सबनीस यांना जंजिऱ्याच्या मोहिमेचा आदेश दिला. मावळ्यांनी दंडा राजपूरी पर्यंत मुलुख जिंकला. पण यावेळी जंजिरा जिंकता आला नाही.
यानंतर महाराजांनी पुन्हा जंजिऱ्या ची मोहीम आखली. त्यांनी पेशवे शामराव नीलकंठ यांना या मोहिमेवर पाठविले. यावेळी सिद्दीने विश्र्वासघाताने पेशव्यांना कैद केले. यानंतर कधी जंजिऱ्याच्या वाटेला जाणार नाही या अटीवर त्यांची सुटका केली.

जंजिरा किल्ला : एक अजिंक्य जलदुर्ग 2021 | Full Janjira Fort Information In Marathi

वरच्या दोन्ही अपयशी मोहिमेनंतर १६६९ ला महाराजांनी पेशवे मोरोपंत पिंगळे यांना जंजिऱ्याच्या मोहिमवर पाठविले. यावेळी पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी जबरदस्त रणनीती आखली होती. तळेग ड, घोसाळगड त्यांनी ताब्यात घेतले. तसेच जंजिऱ्याचा वायव्य दिशेला अवघ्या ३ कि.मी. वरील कांसा बेटावर एक जलदुर्ग उभारला. त्या जल दुर्गाचे नाव ठेवले पद्मदुर्ग. आता सिद्दिची सर्वबाजुंनी नाकेबंदी झाली. समुद्र आणि मावळे यांच्या मध्ये सिद्दी अडकला गेला.त्यावेळी जंजिऱ्या चा सिद्दी फत्तेखान हा प्रमुख होता. फत्तेखानाने बिनशर्त शरणागती पत्करावी असे ठरविले. परंतु सिद्दी संबुळ,सिद्दी कासीम आणि सिद्दी खै र्य त यांनी सिद्दी फत्तेखा नालाच कैद केले. त्यांनी औरंगजेबाचे मांडलिकत्व स्वीकारून मदत मागितली. त्यामुळे ही मोहिम सुध्दा अपयशी झाली.

See also  Panhala fort Information In Marathi 2021 | पन्हाळा किल्ला माहिती

त्यानंतर लगेच १६६९ ला मार्च महिन्यात पद्मदुर्ग किल्ल्यातील सैनिक होळी च्या सणाच्या उत्सवात मग्न होते. त्या वेळी सिद्दीने अचानक हल्ला करून मावळ्यांची कत्तल करून किल्ला ताब्यात घेतला. मावळे ही मारल्या गेले आणि किल्लाही गेला. त्यानंतर १६७५ ला देखील किल्ला हाती येता येता राहिला. मोहिमेची व्यवस्थित अंमलबजावणी झाली असती तर किल्ला नक्कीच ताब्यात आला असता. पण मोरोपंतांनी कोताई केली कार्य राहून गेले.

त्याचे असे झाले, ला य पाटील नावाचा एक बहादुर याने रात्रीच्या अंधारात किल्ल्याच्या तटबंदीला शिड्या लावल्या. परंतु मोरोपंत मावळे घेऊन वेळेवर पोचले नाहीत. पहाट होत आली त्यामुळे लाय शिड्या काढून माघारी परतला. आणि जंजिरा जिंकण्याचा ही संधी गेली. महाराजांना ही बातमी कळली तेव्हा त्यांनी ला य पाटलाचे कौतुक करून त्याला पालखीचा मान देऊ केला. परंतु ला य पाटलाने तो मान नम्रपणे नाकारला. तेव्हा महाराजांनी त्याला एक उत्तम अशी होडी बांधून दिली आणि त्या होडीचे नाव ठेवले ‘ पालखी ‘ त्यानंतर महाराजांनी १६७८ मध्ये दोन वेळा जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला. पण यश आले नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांना जंजिरा म्हणजेच janjira fort information in marathi जिंकता आला नाही. त्यांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी १६८२ मध्ये दादाजी रघुनाथ यांना जंजिरा जिंकण्यासाठी पाठविले. दर्यासारंग दौलतखान आणि दादाजी यांनी महिनाभर शर्थीने प्रयत्न केले. पण सिद्दी हार मानत नव्हता. तेव्हा संभाजी महाराजांनी राज पुरी चा डोंगर फोडून खाडी बुजविण्या चा आदेश दिला.अर्धी खाडी बुजवून ही झाली. खाडी बुजवून झाल्यावर सिद्दी जाईल कोठे? बस जंजिरा ताब्यात येण्याची चिन्हे दिसू लागली. परंतु सिद्दीच्या नशिबाने त्याला पुन्हा एकदा साथ दिली. दस्तुर खुद्द औरंगजेब पूर्ण ताकदीनिशी स्वराज्यावर चालून आला

पुढे पेशवाईत ही जंजिरा जिंकण्यासाठी बऱ्याचदा प्रयत्न झाले. पण यश काही मिळत नव्हते. जंजिरा अखेरपर्यंत अजिंक्य च राहला. शेवटी स्वतंत्र भारतातच अजिंक्य जंजिरा सामील झाला.

जंजिऱ्यामधील प्रेक्षणीय गोष्टी –

जंजिरा  म्हणजेच janjira fort information in marathi हा जलदुर्ग रायगड जिल्ह्यामधील मुरुड या जवळ आहे. आजूबाजूला अथांग सागर आहे. किल्ल्याचा दरवाजा पूर्वमुखी आहे. या दरवाज्याच्या कमानीवर पांढरा दगड असून त्यावर कोरून अरबी भाषेतील एक शिलालेख आहे.त्यामध्ये असलेल्या योहोर या शब्दावरून ते बांधकाम ई. स. १६९४ मध्ये झाल्या चा अंदाज काढता येतो.कमानीतून आत आल्यावर उजव्या हाताला वाघाचे चित्र दिसते. त्या वाघाने एकूण सहा हत्ती पकडलेले चित्रित केलेले आहे.तर डाव्या हाताला एक सिंहीण व सिंहीणी मागे एक वाघ असे चित्र कोरलेले आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला एक मंदिर सदृश्य बांधकाम दिसते. त्याठिकाणी पूर्वी राम पंचायतन होते असे लोक मानतात. अलीकडे त्याला पंचायतन पीर म्हणतात. कार्तिक पौर्णिमेला तेथे यात्रा भरते.

See also  Purandar fort information in marathi 2021 | पुरंदर किल्ला माहिती

जंजिरा किल्ला : एक अजिंक्य जलदुर्ग 2021 | Full Janjira Fort Information In Marathi

किल्ल्याच्या दक्षिण भागात एक तलाव असून त्या पाण्यावर हिरवागार थर आहे. त्या तला वाशेजारीच एक इमारत आहे. याखेरीज आणखी एक तलाव किल्ल्यावर असून तो वायव्य भागात आहे. यानंतर किल्ल्यामध्ये असलेले महत्त्वपूर्ण बांधकाम म्हणजे सुरुल खानाचा वाडा होय. हा वाडा बालेकिल्ल्यात असून तो ६५ ते ७० मीटर उंच आहे. परंतु आता त्या वाड्याची अवस्था दयनीय झाली आहे. याखेरीज किल्ल्यावर काही इमारतींचे अवशेष, कबरी आणि जुन्या हिंदू शिल्पांचे अवशेष दिसतात.

किल्ल्याच्या तटबंदीवर एकूण १९ बुरुज आहेत. प्रत्येक बुरुजा चा व्यास २५ मीटर असून तो बुरुज १० ते १५ मीटर उंचीचा आहे.शिवाय दोन बुरुजामधील अंतर ३० मीटर पेक्षा जास्त आहे.किल्ल्याच्या प्रवेश द्वारा वरील बुरुजावर तीन मोठ्या तोफा आहेत.ध्वजस्तंभ जवळ असलेली तोफ म्हणजे प्रसिद्ध कलाल बांगडी तोफ होय. या तोफे शेजारील चावरी तर तीन नंबरची तोफ लांडा कासम होय. कलाल बांगडी तोफ पेशव्यांनी सोडून दिल्यावर सिद्दीने ती जंजिऱ्यावर नेली. बाकीच्या बुरुजांवर ही काही तोफा आहेत. किल्ल्यावर सर्व मिळून दीडशे ते दोनशे तोफा आहेत. किल्ल्याच्या पश्चिमेला दर्या दरवाजा आहे. या किल्ल्यावर अलीकडे केलेल्या उत्खननात प्राचीन शिवमंदिर सापडले आहे.त्यामुळे या किल्ल्याचे बांधकाम मध्य युगीन आहे की त्याही अगोदरचे आहे हा प्रश्न पडतो.
जंजिरा किल्ला हा पर्यटकांचे आकर्षण आहे. आपणही जरूर भेट द्यावी.

आपण ह्या पोस्ट मध्ये जंजिरा किल्ला बद्दल माहिती घेतली . तुम्हाला जर SHIVAJI MAHARAJ BOOKS IN MARATHI बद्दल माहिती जाणून घायची असेल तर तुम्ही हि पोस्ट वाचू शकता .

(संदर्भ – श्री. प्र.के.घाणेकर यांचे पुस्तक – साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!)

तुम्हाला Business Ideas In Hindi बद्दल अजून जाणून घ्यायचे असेल तर असली ज्ञान वेबसाईट ला भेट दया .

Spread the love

2 thoughts on “जंजिरा किल्ला : एक अजिंक्य जलदुर्ग 2021 | Full Janjira Fort Information In Marathi”

Leave a Comment