Shivaji Maharaj Books In Marathi | शिवराजभूषण आणि शिवाबावनी | Kavi Bhushan
छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण जीवन हे अखिल मानव जातीला प्रेरणादायी आहे. ज्या प्रतिकूल परिस्थितीत शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले त्याला तोड़ नाही. शत्रु आणि स्वकीय यांच्या विरोधास समर्थपणे तोंड देत हिमालयाप्रमाणे अढळ राहिले. आपल्या प्रखर पराक्रमाने आपल्या शत्रूंना यशस्वीपणे तोंड सार्वभौम असे स्वराज्य निर्माण केले. त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग आपल्याला प्रेरणा देतो. एखादया दिपस्तंभाप्रमाणे महाराजांचे संपूर्ण जीवन आहे. त्यांच्या या अद्वितीय पराक्रमाने अनेकांना प्रेरणा मिळाली. कोणी त्यांच्यावर पोवाडे रचले तर कोणी त्यांच्यावर काव्य लिहले. आजच्या या लेखात आपण कवी भूषण यांनी छ. शिवाजी महाराजांवर लिहालेल्या शिवराजभूषण आणि शिवबावनी या ग्रंथाबाबत माहिती जाणून घेऊ या.
कवी भूषण यांचा परिचय –
कवी भूषण ( १६१३ – १७१५ ) यांच्या जीवनाबाबत विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही. जी माहिती उपलब्ध आहे ती संधिग्ध आहे. मात्र प्राप्त माहितीनुसार कवी भूषण यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील कानपूर जिल्ह्यातील त्रिविक्रमपुर ( आताचे तिकमपुर ) याठिकाणी इ.स. १६१३ ला झाला असे मानतात. कवी भूषण यांच्या वडिलांचे नाव रत्नाकर पंडित होते. रत्नाकर पंडित यांची ख्याती एक विद्वान् पंडित म्हणून होती.
भूषण यांना तीन भाऊ होते. कवी भूषण ही त्यांना पदवी मिळालेली होती. त्यांचे वास्तविक नाव पतिराम असावे असे कुंवर महेंद्रपाल म्हणतात. त्यांनी 1930 च्या “विशाल भारत”च्या ऑगस्ट महिन्याच्या अंकामध्ये याचा उल्लेख केला आहे. ‘रीतिकाल’ या प्रकारातील प्रसिध्द कवी म्हणून कवी बिहारी आणि कवी केशव यांच्यासोबतच कवी भूषण यांचे नाव घेतले जाते. रीतिकाल मधील बाकीचे कवी श्रुंगार रस मध्ये आपल्या रचना लिहित होते.
तर कवी भूषण यांनी आपले काव्य वीररस मध्ये लिहून स्वताचे वेगळपण सिद्ध केले. ‘शिवराजभूषण’, ‘शिवबावनी’ आणि ‘छत्रसाल दर्शक’ म्हणजेच Shivaji Maharaj Books In Marathi हे कवी भूषण यांच्या अप्रतिम रचना आहेत याशिवाय भूषणहजारा, भूषणउल्हास आणि दूषणउल्हास ह्या देखील कवी भूषण यांच्या रचना आहे असे म्हणतात. कवी भूषण सुरुवातीला चित्रकूटचा राजा सोलंकी यांच्याकडे होते. जेव्हा शिवाजी महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरली,तेव्हा कवी भूषण दख्खनकडे आले. त्यांनी छ. शिवाजी महाराजांकडे वास्तव्य केले. तसेच कवी भूषण यांनी स्वतःचीच ओळख काव्यातून दिलेली आहे. ते स्वतःचा परिचय असा करून देतात –
देस न देस न ते गुणीजन आवत, ज्याचान त्याही | तिन मे आयो एक कवी, भूषण कहियतू जायी द्विज कन्नोज कुल कश्यापी, रत्नाकर सुत धीर | वसत त्रिविक्रम पुर सदा, तरणी तनुजा तीर || विर बिरबल जहा उपजे, कवी अनुभूप | देव बिहारिश्र्वर जहा, विश्वेश्वर तद्रुप || कुल सुलंक,चीतकुटपती,सहसशिल समुद्र | कवी भूषण पदवी दै,ह्रदयरामसुत रुद्र||
याचा अर्थ पुढील प्रमाणे – विविध देशातून ज्याच्याकडे ( छ. शिवाजी महाराजांकडे ) गुणिजन येतात,त्यांच्यामध्ये भूषण म्हणून एक कवी आला आहे. कानोजी ब्राम्हण,कुल कश्यप आणि रत्नाकर चा मुलगा यमुना तीरी त्रिविक्रम पुरला राहतो. हा कवी वीर बिरबल च्या भूमीतून जिथे बिहारिश्र्वराचे वास्तव्य आहे तेथून आला आहे. कुल सुलंक चीतकुटपती सहसशील समुद्र असणाऱ्या
राजा ह्रदयराम चा मुलगा रुद्र याने भूषण ही पदवी दिली आहे. असे म्हणतात की शिवाजी महाराज आणि कवी भूषण यांची भेट रायगडावर झाली. महाराजांना जेव्हा समजले की भेटायला आलेली व्यक्ती कवी आहे तेव्हा त्यांनी ए खादी कविता म्हणायला सांगितले. त्यावर कवी भूषण ने लगेच आपले प्रसिद्ध झालेले काव्य ऐकविले. ते काव्य होते –
इंद्र जिमि जंभ पर बाडव सुअंभ पर,
रावण सदंभ पर रघुकुलराज है
पवन परिवाहा पर संभु रतिनाह पर
जो सहसबाह पर राम द्विजराज है
दावा दृमदंड पर चिता मृगझुंड पर
भूषण वितुण्ड पर जैसे मृगराज है
तेज तम अंश पर कन्न जिमि कंस पर
जो म्लेंच्छ बंस पर शेर शिवराज है शेर शिवराज है.
कवी भूषण यांनी शिवाजी महाराज यांचे वर्णन आणि महत्व अति सुंदर अशा शब्दात केलेले आहे. कवी भूषण म्हणतात –
राखी हिंदवानी हिंदुवान को तिलक राख्यो
अस्मिति पुरान राखे वेद विधी सुनि मैं.
राखी रजपूती, राजधानी राखी राजन की
धरा में धरम राख्यो राख्यो गुन गुनि में.
भूषन सुकवि जीति हद्द मरहट्टन की
देस देस कीरति बरवानी तव सुनी में.
साहि के सपूत सिवराज ,समशेर तेरी
दिल्ली दल दाबि कै दवाल राखी दुनी में.
वेद राखे विदित पुरान राखे सारयुत
रामनाम राख्यो अति रसना सुधर में .
हिन्दुनकी चोटी रोटी राखी है सिपाहिन की
कांधे मे जनेऊ राख्यो माला राखी गर में.
मीडी राखे मुग़ल मरोरि राखे पातसाह
बैरी पीसि राख्ये बरदान राख्यो करमे.
राजन की हद्दराखि तेग बल सिवराज
देव राखे देवल स्वधर्म राख्यो घरमे.
देवल गिरवाते फिरावते निसान अली
ऐसे डूबे राव राने सबी गये लबकी .
गौरा गनपति आप औरन को देत ताप
आपनी ही बार सब मारि गये दबकी .
पीरा पयंगंबरा दिगंबरा दिखाई देत
सिध्द की सिध्दाई गई रही बात रब की .
कासी हू की कला जाती मथुरा मसीद होती
सिवाजी न होतो तो सुनाती होत सब की .
शिवराजभूषण
शिवराजभूषण म्हणजेच Shivaji Maharaj Books In Marathi हा ग्रंथ ब्रज भाषेत लिहलेला आहे. मान्यता अशी आहे की, कवी भूषण हे पहिले कवी आहेत की त्यांनी वीर रस मध्ये कविताब्रज भाषेत लिहल्या. शिवराजभूषण या काव्यात्मक ग्रंथात कवी भूषण यांनी छ. शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगांचे वर्णन तर केले आहेच शिवाय महाराजांचे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू रेखाटले आहेत.
महाराजांचा पराक्रम,धैर्य,स्वाभिमान दानशुरता, आणि गड्किल्ले आणि सैन्य यांचे अत्यंत सुंदर अशा भाषेत वर्णन केले आहे. महाराजांवर जितके ग्रंथ,बखरी आहेत त्यामधील सर्वात विश्वसनीय ग्रंथांपैकी एक ‘शिवराजभूषण’ हा काव्य ग्रंथ आहे.
शिवराजभुषण म्हणजेच Shivaji Maharaj Books In Marathi या महान ग्रंथात एकूण ३८५ छंद आहेत. या ग्रंथांमध्ये लक्षण दोहा छंद आणि उदाहरण सवैया छंदामध्ये आहेत. यामध्ये १०५ अलंकराच्या व्याख्या उदाहरणासह दिल्या आहेत. त्यामध्ये ९९ अर्थालंकार’४ शब्दालंकार ,१चित्रालंकारआणि एक संकर अलंकार आहेत. हा ग्रंथ अलंकार शास्त्रावरील एक उत्कृष्ट असा ग्रंथ आहे.
एका छंदामध्ये कवी भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचे अति सुंदर वर्णन १४ गुण विशेषांनी केलेले आहे. ते असे –
सुंदरता, गुरुता, प्रभुता,भनि भूषन होत है आदर जामें
सज्जनता औ,दयालुता,दीनता,कोमलता झलकै परजा में
दान कृपानहु को करिबो अभय दीनन को बर जामें
सहस सों रनटेक, विवेक, इतेगुन एक सिवा सरजा में
कवी भूषण यांनी आपल्या ग्रंथात शिवाजी महाराज यांच्यासाठी जवळपास ५२ गुण विशेषणे वापरली आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत.
सरजा,सवाई,खुमान,शूर,शूर-शिरोमणी,सुरदानी सिरताज,भौंसिलाभुवाल,शेर,सिंह, गरीबनिवाज, प्रतापी,छत्रधारी, नरेंद्र,दक्षिणके नाथ, गाजी,गढ़पति,सेनाके आधार, हिंदुत्वके स्तम्भ,महादानी, महाराजमणि, हिंदुपति,पातसाह, महाबाहु, गढ़पाल, बली,महाबली, नरेश, वीर,सुभट,श्रीमन्ममहाराजाधिराज, राजाओंके राजा,शाहोंके सिरताज, पुतवीर,भूप,रणसिंह,महावीर राना, मर्दाना, संसारकेसूर्य,वीरसरताज ,नृप, सहृदय, ज्ञानवान, स्वजाति, स्वदेश, स्वधर्म -रक्षक ,साहसी,बादुर, मरहट्टपति,प्रतापी, असे काही विशेषणे वापरली आहेत.
शिवबावनी
शिवबावनी या ग्रंथात सुद्धा कवी भूषण शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे सुंदर असे वर्णन करतात. शिवबावनी या काव्य ग्रंथात एकुण ५२ छंद आहेत. हा ग्रंथ सुद्धा वीररस मध्ये लिहलेला आहे. या ग्रंथात एके ठिकाणी कवी म्हणतात –
प्रेतिनी पिशाच निशाचर निसाचरिहू,
मिलि मिली आपुस में गावत बधाई है.
भैरों भूत प्रेत भूरि भूधर भयंकर से ,
जुत्थ जुथ्त जोगिनी जमात जुरिआई है.
किलकी किलकी कै कुतूहल करति काली,
डिम डिम डमरू दिगम्बर बजाई है .
सिवा पूछें सिव सौ समाज आजू कहा जली ,
काहू पै सिवा नरेस भृकुटी चढाई है .
शिवाजी महाराजांचे सैन्य, युद्ध प्रसंग यांचे सुंदर वर्णन कवी भूषण यांच्या ग्रंथात केलेले आहे.
हा लेख तुम्हाला कसा वाटला ते जरुर कळवा.
आपण ह्या पोस्ट मध्ये शिवराजभूषण आणि शिवाबावनी बद्दल माहिती घेतली . तुम्हाला जर JANJIRA FORT INFORMATION IN MARATHI बद्दल माहिती जाणून घायची असेल तर तुम्ही हि पोस्ट वाचू शकता .
अद्भुत करणाऱ्या गोष्टी मराठीत वाचण्यासाठी अद्भुत मराठी ला भेट दया .