Table of Contents
Raja Ram Mohan Roy Information In Marathi | राजा राममोहन रॉय यांची माहिती
आपल्या भारत देशात अनेक समाज सुधारक होऊन गेले. त्यांच्या कार्यांनी भारतीय समाजातील अनिष्ट रुढी आणि प्रथा कमी झाल्या. भारतीय समाज मुळातच परंपरावादी आहे. आपल्या देशातील समाज सुधारकांनी आपले सर्व जीवन समाजाच्या उद्धारासाठी वाहिले. या अशाच समाज सुधारकांपैकी राजा राममोहन रॉय (Raja Ram Mohan Roy) हे एक महान समाज सुधारक होते. आजच्या या लेखात आपण त्यांचीच माहिती घेऊ या.
राजा राममोहन रॉय यांचे प्रारंभिक जीवन :
राजा राममोहन रॉय म्हणजेच Raja Ram Mohan Roy Information In Marathi यांना ‘आधुनिक भारताचे जनक ‘ म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म २२ मे १७७२ ला बंगालमधील हुगळी जिल्ह्यात असलेल्या राधानगर या ठिकाणी झाला. त्यांचे पणजोबा श्री. कृष्णचंद्र बनर्जी हे बंगालच्या नवाबाच्या नोकरीस होते. नवाबने त्यांना ” रॉय – रॉय ” ही उपाधी बहाल केली होती. त्यावेळेपासून त्यांच्या पणजोबाने बॅनर्जी या मूळ आडनावा ऐवजी रॉय हीच उपाधी आडनाव वापरण्यास सुरुवात केली.
राजा राममोहन रॉय यांच्या वडिलांचे नाव रामकांतो रॉय तर आईचे नाव तैरिणी देवी होते.
राजा राममोहन रॉय यांनी प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पाटणा येथे अरेबिक आणि पर्शियन भाषांचे शिक्षण घेतले. त्यानंतर बनारस येथे संस्कृत वाड्:मय, कायदा व तत्त्वज्ञान यांचे शिक्षण घेतले. त्याचसोबत वेद आणि उपनिषदे यांचापण अभ्यास केला. तसेच त्यांनी तिबेटमध्ये जाऊन बौद्ध धर्माचा अभ्यास केला.
राजा राममोहन रॉय यांनी ईस्ट इंडिया कंपनी मध्ये नोकरी केली. ते १८०५ ला महसूल अधिकारी जॉन दिगबी यांचे सहाय्यक म्हणून काम केले. नंतर त्यांनी दिवाण म्हणून काम पाहिले.
मोगल सम्राट दुसरा अकबराने त्यांना राजा ही पदवी दिली.
राजा राममोहन रॉय म्हणजेच Raja Ram Mohan Roy Information In Marathi यांचे धार्मिक कार्य :
राजा राममोहन रॉय हे एक परंपरावादी सनातन हिंदु कुटुंबातील होते. त्यांनी जसा वेद आणि उपनिषदे यांचा अभ्यास केला तसाच इस्लाम, ख्रिचन या धर्मातील साहित्यांचा अभ्यास केला. ते एके श्र्वर वादाचे पुरस्कर्ते बनले. हिंदू धर्मात असलेल्या सनातन वादाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला.
हिंदू धर्मात असलेले कर्मकांड,मूर्तिपूजा आणि पुरोहित वर्ग यांच्यावर निर्भिडपणे आपले विचार व्यक्त केले. त्यांनी हिंदू धर्मातील खऱ्या आणि जुन्या धर्मग्रंथा वर विश्वास दाखविला. त्यांच्या या विचारांमुळे त्यांना प्रखर विरोधाचा सामना करावा लागला. त्यांच्या वडिलांसोबत याच विचारांवर मतभेद झाल्यावर त्यांनी घर देखील सोडले.
हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी त्यांनी आत्मीय सभा, उनितरियान समुदाय यासारख्या संस्था सुरू केल्या. पुढे त्यांनी ब्राम्हो समाजाची स्थापना केली.
आत्मीय सभा : ( Atmiy Sabha)
राजा राममोहन रॉय म्हणजेच Raja Ram Mohan Roy Information In Marathi यांनी आपल्या हिंदू धर्मातील मूर्तिपूजा आणि अनिष्ट प्रथा यांचा विरोध केला. मूळ हिंदू धर्मावर मात्र त्यांची श्रद्धा होती. स्त्री – पुरुष समानता ते पुरस्कर्ते होते. त्यांच्या विचारांना पाठिंबा देणारे लोकांना त्यांनी एक त्र आणून आत्मीय सभा स्थापन केली.आत्मीय सभेलाच मित्रांचा समाज ( society of friends) असेही म्हणत.
ब्राम्हो समाज : ( Bramho Samaj)
राजा राममोहन रॉय खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे जनक होते. ब्राम्हो समाजाची स्थापना करून त्यांनी सामाजिक आणि धार्मिक चळवळ सुरू केली. एका खऱ्या ब्रम्हा ची म्हणजे देवाची उपासना करणाऱ्यांचा समाज म्हणजे ब्राम्हो समाज होय. आपल्या अनुयाांना प्रार्थनेसाठी त्यांनी एक इमारत भाड्याने घेऊन ते प्रार्थना स्थळ म्हणून २० ऑगस्ट १८२८ मध्ये सुरू केले. पुढे २३ जानेवारी १८३० ला रीतसर त्या प्रार्थना स्थळाचे उदघाटन करून त्याला नाव दिले ब्राम्हो सभा. त्यालाच पुढे नाव मिळाले ब्राम्हो समाज. भाद्रोत्सव आणि माघोत्सव असे हे दोन सण ब्राम्हो समाजाचे महत्त्वाचे सण आहेत.
ब्राम्हो समाजाचे अनुयायी दर शनिवारला एक त्र येऊन धार्मिक चर्चा तसेच वेदांतील स्तोत्राचे पठण करीत. ब्राम्हो समाज हा एके श्वर वादी होता. विश्वबंधुत्व यावर विश्वास होता. जात – पात, पंथ,वंश यास थारा दिला जात नव्हता.
राजा राममोहन रॉय यांचे धार्मिक कार्य :
राजा राममोहन रॉय म्हणजेच Raja Ram Mohan Roy Information In Marathi यांनी केलेल्या धार्मिक सुधारणा महत्त्वाच्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत.
१. एकेश्वरवादाचा प्रसार –
राजा राममोहन रॉय यांनी वेद आणि उपनिषदे यांच्याखेरीज इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माचा ही अभ्यास केला होता. त्यामुळे एकेश्र्वरवादाचा त्यांनी पुरस्कार केला. केवळ एकाच देवावर विश्वास आणि श्रध्दा ठेवणे म्हणजे एकेश्र्वरवाद होय. १८०९ मध्ये त्यांनी एकेश्र्वरवाद्यांची देणगी हे पर्शियन भाषेत पुस्तक लिहले.
२. मूर्तिपूजेला विरोध :
राजा राममोहन रॉय यांनी मूर्तिपूजा अमान्य केली. देव निराकार असून मूर्तिपूजा ही खरी भक्ती नाही असा संदेश त्यांनी दिला.
सहिष्णुता,प्रेम,सहानुभूती आणि द्वेषभाव नसणे म्हणजेच खरी पूजा होय असे ते मानीत असत.
३. धार्मिक सहिष्णुता :
राजा राममोहन रॉय सहिष्णु होते. त्यांचा सर्व धर्मावर विश्वास होता. केवळ धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अनिष्ट प्रथांना त्यांचा विरोध होता.
ब्राम्हो समाजामध्ये सर्व लोकांना प्रवेश होता.
राजा राममोहन रॉय यांचे सामाजिक कार्य : Raja Ram Mohan Roy’s Social Work
राजा राममोहन रॉय यांच्या काळात अनेक अनिष्ट रूढी आणि परंपरा यांनी भारतीय समाज ग्रासलेला होता. जातीभेद,सतीप्रथा,बालविवाह, बहुविवाह, विधवा विवाहास मनाई, हुंडा पद्धती अशा अनेक प्रथा त्याकाळी होत्या. त्यांनी आपल्या कार्यातून या प्रथांचा निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला.
१. सतीप्रथेला विरोध :
सती प्रथा ही भारतात प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. महाभारतातील माद्री सती गेल्याचे सांगितले जाते. पतीच्या मृतदेहाच्या दहनाच्या वेळी पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रथेला सती जाणे असे म्हणत.राजा राममोहन रॉय यांचे मोठे भाऊ जगमोहन यांचे १८१८ ला निधन झाले. त्यावेळी त्यांची वहिनी अलकमंजिरी ह्या सती गेल्या. जेव्हा चितेला अग्नी दिला त्यावेळी त्यांच्या वहिनींनी चितेवरून सुटका करण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथे असलेल्या लोकांनी तो प्रयत्न यशस्वी होवू दिला नाही. राजा राममोहन रॉय यांना या घटनेचा खूप मोठा धक्का बसला. यानंतर त्यांनी ही अमानवी प्रथा बंद होईपर्यंत विश्रांती न घेण्याची प्रतिज्ञा केली.
त्यानुसार त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना ही प्रथा बंद करण्यासाठी खूप विनवण्या केल्या. परंतु ही धार्मिक बाब असल्याने ब्रिटिश अधिकाऱ्यांनी यात कोणताही हस्तक्षेप केला नाही. तेव्हा राजा राममोहन रॉय यांनी सतीप्रथे ला हिंदू धर्म ग्रंथांची मान्यता नाही हे लॉर्ड विल्यम बेंटिक यांना पटवून द्यावे लागले. राजा राममोहन रॉय यांनी त्यांना हेही पटवून दिले की मृत व्यक्तीच्या मालमत्तेची लालसे साठी त्याच्या पत्नीला जिवंत मारण्यासाठी ही प्रथा आहे. त्यात शेवटी राजा राममोहन रॉय यशस्वी झाले. त्यामुळे १८२९ मध्ये सती बंदी कायदा लागू करण्यात आला.
२. बहु विवाहास विरोध :
राजा राममोहन रॉय यांनी बहु विवाहास विरोध केला.तसेच लग्नाच्या नावाखाली मुलींची विक्री करण्याच्या पद्धतीला ही विरोध केला. त्याकाळी बंगालमध्ये कुलीन वाद प्रथा होती. उच्च जातीतील पुरूष कनिष्ठ जातीतील मुलींशी विवाह करीत. पुरुष पहिल्या पत्नीला सोडून दुसऱ्या अनेक मुलींशी विवाह करीत असत. अशात पहिल्या पत्नीचे परिस्थिती बिकट होत असे. तेव्हा राजा राममोहन रॉय यांनी या प्रथेलाही जोरदार विरोध केला.
३. अनिष्ट सामाजिक रूढींना विरोध :
राजा राममोहन रॉय यांनी जातीभेद, अस्पृश्यता या प्रथांनाही विरोध केला. त्यांनी आंतरजातीय भोजन,विधवा पुनर्विवाह यांना पाठिंबा दिला.
४. शेतकऱ्यांसाठी प्रयत्न :
राजा राममोहन रॉय म्हणजेच Raja Ram Mohan Roy Information In Marathi यांनी शेतकऱ्यांची पण बाजू घेतली. मोठे जमीनदार गरीब शेतकरी आणि कामगार यांची पिळवणूक करीत असत. त्यांनी ब्रिटिश सरकारकडे शेतकऱ्यांच्या कुळांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी कायद्याची मागणी केली.
५. वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य :
वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जातो. आज वृत्तपत्रांना स्वातंत्र्य आहे. परंतु अगोदर वृत्तपत्रे स्वतंत्र नव्हती. राजा राममोहन रॉय यांच्या काळात वृत्तपत्रे फक्त इंग्रजी मध्येच छापली जात असत. रॉय यांनी मिरतुल – अखबर हे पर्शियन भाषेत वृत्तपत्र तर संवाद कौमुदी हे बंगाली भाषेत साप्ताहिक काढले. कोणतीही बातमी प्रकाशित करण्यापूर्वी ब्रिटिश सरकारची परवानगी घ्यावी लागत असे. त्यामुळे राजा राममोहन रॉय यांनी ब्रिटिश सरकारकडे याचिका दाखल केली आणि वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याची मागणी केली. त्यात त्यांनी असे म्हटले की राज्यकर्ते आणि जनता यांनी वृत्तपत्राचा सन्मान करावा. याचा परिणाम असा झाला की सर चार्ल्स मेटकाफ या गव्हर्नर जनरल ने १८३५ मध्ये वृत्तपत्रांवर असलेली बंधने काढून टाकली.
६. न्यायालयीन सुधारणेसाठी मागणी :
ब्रिटिश पार्लमेंट मध्ये मंजूर झालेले कायदे भारतातील जनतेवर लादण्यात येत होते. राजा राममोहन रॉय यांनी या बाबीला विरोध केला. न्यायालयाने केवळ प्रथांना आधार मानून निर्णय देवू नये तर हिंदू धर्म ग्रंथ आणि भारतीय कायदेमंडळाने केलेल्या कायद्याच्या आधारे न्यायदान करावे असे त्यांनी प्रतिपादन केले.
अशा या महान समाज सुधारक राजा राममोहन रॉय यांचा मृत्यू २७ सप्टेंबर १८३३ मध्ये इंग्लंडमधील ब्रिस्टॉल या ठिकाणी आजारपणामुळे झाला. राजा राममोहन रॉय यांनी आपला जन्म भारतीय समाजाच्या सुधारणेसाठी अर्पण केला. खरोखरच ते आधुनिक भारताचे जनक ठरतात.
आपण ह्या पोस्ट मध्ये राजर्षी शाहू महाराज बद्दल माहिती घेतली . तुम्हाला जर Dr Babasaheb Ambedkar Social Work In Marathi बद्दल माहिती जाणून घायची असेल तर तुम्ही हि पोस्ट वाचू शकता .
शेती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शेतकरी.कॉम ला नक्की भेट दया .
2 thoughts on “राजा राममोहन रॉय यांची माहिती 2021 | Full Raja Ram Mohan Roy Information In Marathi”