Table of Contents
लाल बहादुर शास्त्री यांचे प्रेरणादायी जीवन | Lal Bahadur Shastri Information In Marathi
स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री म्हणजेच Lal Bahadur Shastri Information In Marathi एक उच्च प्रतीचे व्यक्ती होते. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी कधीच नैतिकता सोडली नाही. उच्च पदावर असल्यावरही त्यांनी आपले चरित्र निष्कलंक ठेवले. कधीच त्या पदाचा गैरवापर केला नाही. लाल बहादुर शास्त्री हे एक निस्सीम देशभक्त होते. आजच्या या लेखात आपण भारत मातेच्या या महान सुपुत्राविषयी म्हणजेच Lal Bahadur Shastri Information In Marathi अधिकची माहिती जाणून घेऊ या.
पूर्वायुष्य :
लाल बहादुर शास्पित्तारी यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ ला उत्तर प्रदेश मधील वाराणसी जवळ असलेल्या मुघलसराई येथे झाला. शारदा प्रसाद आणि राम दुलारी यांचे हे संतान. यांचे खरे आडनाव श्रीवास्तव. परंतु काशी विद्यापीठात शास्त्री ही पदवी त्यांना मिळाली. पुढे ही पदवीचं त्यांनी आडनाव म्हणून वापरली. वडिलांच्या मृत्यूनंतर आईने त्यांना आपल्या भावाच्या गावी नेले. तेथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. विद्यार्थी दशेतच ते गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झाले. त्यानंतर ते प्रखर गांधीवादी बनले.
लाला लजपत राय यांचा देखील प्रभाव शास्त्रींजी वर पडला होता. लाला लजपत राय यांनी स्थापन केलेल्या ‘ सर्व्हंट ऑफ द पीपल ‘ या संस्थेचे आजीवन सभासद ,१९२५ – २६ ला बनले. १९२७ मध्ये त्यांचे लग्न लालितादेवी यांच्याशी झाला. लालीतादेवी खूप धार्मिक प्रवृत्ती च्या होत्या. शास्त्री जींनी लग्नात हुंडा म्हणून केवळ एक चरखा आणि हाताने विणलेले कापड एवढेच घेतले. शास्त्री जींना एकूण सहा अपत्ये होती. चार मुले आणि दोन मुली.
स्वातंत्र्य लढ्यातील योगदान :
शास्त्रीजी केवळ सोळा वर्षाचे होते तेव्हा त्यांनी देशासाठी स्वतंत्र लढ्यात झोकून द्यायचे ठरविले. गांधीजींच्या असहकार आंदोलनमुळे ते प्रभावित झाले होते. परंतु घराच्या लोकांच्या हट्टापुढे त्यांचे काही चालले नाही. परंतु मिठाच्या सत्याग्रहा च्या वेळी त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. १९४२ च्या ‘चले जाव ‘ आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. लाल बहादुर शास्त्री म्हणजेच Lal Bahadur Shastri Information In Marathi यांच्या वर पंडित गोविंद वल्लभ पंत, पुरुषोत्तम दास टंडन आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा खूप प्रभाव होता.
राजकीय क्षेत्रातील योगदान :
लाल बहादुर शास्त्री हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विश्वसनीय लोकांपैकी एक होते. काँग्रेस च्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक होते. स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने त्यांना संसदीय मंत्री पदाची जबाबदारी दिली. १९४७ मध्ये उत्तर प्रदेश सरकारमध्ये ते गृहमंत्री तसेच परिवहन मंत्री सुद्धा होते. त्यांनीच सर्वप्रथम भारतात महिला बस वाहकाची नियुक्ती केली होती. जमावाला पांगवण्यासाठी लांठ्या ऐवजी पाण्याचा फवारा मारायचा,असा आदेश त्यांनी गृहमंत्री म्हणून काढला.
१९५१ मध्ये त्यांना अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये महासाचिवपदी नियुक्त करण्यात आले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली बिन खात्याचे मंत्री म्हणून ही त्यांनी काम केले. पंडित नेहरू यांच्या मृत्यूनंतर लाल बहादुर शास्त्री देशाचे दुसरे पंतप्रधान बनले. त्यावेळेस देशाची स्थिती व्यवस्थित नव्हती.
भारत नुकताच चीन सोबतच्या युद्धात हरला होता. पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या होत्या. भांडवलवादी अमेरिका आणि साम्यवादी रशिया यांच्या नेतृत्वाखाली जग दोन गटात विभागले होतेच. अशावेळेस तिसऱ्या जगातील आपले अस्तित्व जोपासत च रशिया सोबत शास्त्री जींनी चांगले संबंध दृढ केले होते. १९६५ मध्ये जेव्हा पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले तेव्हा शास्त्री जींनी त्या संकटाचा सामना यशस्वीपणे केला. पाकिस्तानला वाटले असेल शास्त्रीजी कमजोर असतील आणि आपल्याला निर्णायक विजय मिळेल. परंतु पाकिस्तान चा भ्रम लवकरच तुटला. शास्त्री जींनी आपल्या कुशल नेतृत्वाखाली पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला.
एकदा शास्त्रीजी च म्हणाले होते की ,”कदाचित माझी उंची कमी असल्यामुळे तसेच नम्र असल्यामुळे मी कणखर होवू शकत नाही. मी जरी शारीरिकदृष्ट्या धडधाकट नसलो तरी मला वाटते की मी आतून एवढा कमकुवतही नाही.” खरोखरच शास्त्रीजी कमकुवत नव्हते. देशात दुष्काळ पडलेला होता. देशातील भांडवलवादी विचारसरणी डोके वर काढू पाहत होती. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे संकट त्यांनी खूप कणखरपणे सांभाळले. ‘जय जवान जय किसान’ हा नारा देवून त्यांनी देशवासीयांना नवी ऊर्जा दिली.
उच्च चरित्राचे व्यक्ती :
साध्या राहणी मानाचे ज्वलंत उदाहरण म्हणजे लाल बहादुर शास्त्री! पंतप्रधानपदी विराजमान असल्यावर ही त्यांचे पाय जमिनीवरच होते. शास्त्री जी खरोखरच निस्सीम गांधीवादी होते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे त्यांच्या जीवनाचे तत्व होते. स्वतःच्या आचरणातून त्यांनी हे सिद्ध केले आहे. त्यांचा संपूर्ण आयुष्यात त्यांनी कधीही तत्वे सोडली नाहीत. त्यांच्या चारित्र्यावर एक ही डाग नाही. त्यांच्या सारखा कोणता चारित्र्याशिल राजकारणी झाला नाही आणि होणारही नाही. त्यांच्या जीवनातून आपल्याला निश्चितच शिकण्यासारखे आहे. या ठिकाणी आपण त्यांच्या जीवनातील काही प्रेरक प्रसंग पाहू या.
नक्कीच या प्रसंगातून आपल्याला कळेल की शास्त्रीजी किती महान होते. बालपणीच वडिलांचे निधन झालं. त्यामुळे परिस्थिती बेताचीच होती. घर आणि शाळा यामध्ये नदी होती. शाळेत जाण्यासाठी होडीतून जावे लागे. त्यासाठी जाण्यायेण्याचा खर्च लागे. परिस्थिती नाजूक आई आणि नातेवाईक यांच्यावर बोजा नको म्हणून शास्त्रीजी नदी पोहून जात. आजची मुले आपण बघतो की आई-वडिलांचा पैसा कसा उधळतात ते.
जेव्हा नेहरूंच्या मंत्रिमंडळात शास्त्रीजी रेल्वे मंत्री होते तेव्हा तामिळनाडूत रेल्वे अपघात झाला होता. त्या अपघातात १४२ जणांचा मृत्यू झाला होता. नैतिक मूल्ये पाळणाऱ्या शास्त्री जींनी स्वतःला दोषी मानून रेलेमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. अशी नैतिकता आता कोठे आहे?
पंतप्रधान पदी विराजमान असताना त्यांनी वैयक्तिक कामासाठी कधीच सरकारी गाडी वापरली नाही. एकदा त्यांच्या मुलाने सरकारी गाडी वापरली तेव्हा शास्त्री जींनी किलोमीटर च्या हिशोबाने रुपये सरकार च्या तिजोरीत जमा केले. आता तर आपण बघतच आहोत! सरकार तर्फे शास्त्री जीं ना कुलर मिळाला होता. परंतु नको त्या सवयी लागतील म्हणून त्यांनी तो कुलर परत पाठविला ! असेच एक दा शास्त्री जिंना एका व्यापाऱ्याने महागडी साडी त्यांच्या पत्निकरिता भेट दिली. परंतु शास्त्रीजी यांनी ती भेट नम्रपणे नाकारली. त्यांनी अतिक्षय गरिबीत दिवस काढले होते. मोठ्या पदावर गेल्यावरही त्यांनी कधी जुने दिवस विसरले नाहीत. त्यांच्या पत्नी करिता त्यांनी कधीही महागडी साडी घेऊन दिली नाही. स्वतः देखील ते तसेच वागले. जुन्या कपड्यांचे ते रुमाल बनवून वापरायचे.
१९६५ मध्ये जेव्हा भारतात दुष्काळ पडला होता. देशात अन्न धान्याचा तुटवडा पडला होता. तेव्हा शास्त्रीजी यांनी देशाला उपवास करण्याचे आवाहन केले. याची सुरुवात स्वतःपासून , स्वतःच्या कुटुंबापासून केली!
शास्त्रीजी यांचा लहान मुलगा हरी याचे काही व्यापाऱ्यां सोबत घनिष्ठ संबंध होते. आपल्या वडिलांच्या नावाचा उपयोग करून त्याने व्यापाऱ्यांनची कामे केली. ही बातमी शास्त्रीजी यांच्या कानावर पडताच त्यांनी स्वतःच्या मुलाला घरातून हाकलून दिले. शास्त्रीजी यांच्या साधेपणाच आणखी एक उदाहरण आहे.
जेव्हा शास्त्रीजी अलिप्तता वादी चळवळी च्या अधिवेशनासाठी इजिप्तची राजधानी कैरो येथे गेले त्यावेळेस ची गोष्ट आहे. शास्त्रीजी यांचा मुक्काम हिल्टन या प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलात होता. त्यावेळेस शास्त्रीजी हॉटेल मधून जेवण मागवत नव्हते. त्या दौऱ्यात त्यांनी स्वतः सोबत स्टोव्ह नेला होता. स्वतः ते जेवण बनवायचे.
शास्त्रीजी जीवनभर साधेपणाने राहिले. ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला होता त्यावेळेस त्यांच्या बँक अकाऊंट मध्ये काहीच रक्कम शेष नव्हती.
शास्त्रीजींचा रहस्यमय मृत्यू :
अनेकांच्या मते शास्त्रीजी यांचा नैसर्गिक मृत्यू झाला नाही. भारत – पाक युद्धात पाकिस्तानचा जबरदस्त पराभव झाला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हस्तक्षेपामुळे युद्ध थांबले. १० जानेवारी १९६६ रोजी तत्कालीन सोव्हिएत युनियन , आताच्या उझबेकिस्तान ची राजधानी आसलेल्या ताश्कंद येथे पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अयुब खान यांच्यासोबत शांतता करारावर सह्या केल्या. आंतरराष्ट्रिय दबावाखाली शास्त्रीजी यांनी करारावर स्वाक्षरी केली. दुसऱ्या दिवशी ११ जानेवारी ला त्यांचा रहस्यमयी मृत्यू झाला. शास्त्रीजी यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला असे सांगण्यात आले. तर काही लोक असे म्हणतात की त्यांना अन्नातून विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला. विशेष बाब म्हणजे शास्त्रीजी यांच्या पार्थिवाचे पोस्ट मोर्टम देखील झाले नव्हते.
भारताने युद्ध जिंकले मात्र आपला अनमोल पंतप्रधान गमावला. शास्त्रीजी दीपस्तंभ ठरले. त्यांचे जीवन आपल्याला प्रेरणादायी असेच आहे. भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. अशा या भारतरत्न लाल बहादुर शास्त्री म्हणजेच Lal Bahadur Shastri Information In Marathi यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..
आपण ह्या पोस्ट मध्ये लाल बहादुर शास्त्री बद्दल माहिती घेतली . तुम्हाला जर Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi बद्दल माहिती जाणून घायची असेल तर तुम्ही हि पोस्ट वाचू शकता .
शेती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शेतकरी.कॉम ला नक्की भेट दया .
3 thoughts on “लाल बहादुर शास्त्री विषयी माहिती 2021 | Full Lal Bahadur Shastri Information In Marathi”