नेताजी सुभाषचंद्र बोस विषयी माहिती 2021 | Full Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi

Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi | नेताजी सुभाषचंद्र बोस

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक महान क्रांतिकारक आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन प्रेरणादायी आहे. भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतुन मुक्त करण्यासाठी देशभक्त आपापल्यापरीने प्रयत्न करीत होते.  नेताजी  सुभाषचंद्र बोस यांनी सुद्धा आपले जीवन भारत मातेला स्वतंत्र बनविण्यासाठी अर्पण केले. आजच्या या लेखात आपण भारत मातेच्या महान सुपुत्राची , नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजेच netaji subhash chandra bose information in marathi यांची माहिती घेऊ या.

प्रारंभिक जीवन :

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलांचे नाव जानकीदास तर आईचे नाव प्रभावती होते. जानकीदास बोस हे व्यवसायाने वकील होते. तसे बोस घराने हे मूळचे बंगालचे होते. परंतु जानकीदास बोस व्यवसायाच्या निमित्ताने कटक येथे स्थायिक झाले. त्याच ठिकाणी सुभाषचंद्र यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ ला झाला. सुभाषचंद्र यांच्या घरचे वातावरण खुप धार्मिक होते.

विद्ध्यार्थी दशेत असतांनाच सुभाषचंद्र यांच्यावर स्वामी रामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रभाव पडला होता. सुभाषचंद्र ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेचे  मुख्याध्यापक बेनी माधवदास यांचा सुद्धा प्रभाव सुभाषचंद्र यांच्यावर पडला होता. गुरुच्या शोधात सुभाषचंद्र  काशी, गया,हरिद्वार ,मथुरा इत्यादी ठिकाणी फिरले . मात्र त्यांना अपेक्षित असलेला गुरु भेटला नाही.  उलट प्रत्येक धार्मिक स्थळी जातपात, अस्पृश्यता हे पाहून त्यांचे मन विषिन्न झाले. परंतु स्वामी विवेकानंद यांच्या ग्रंथांचे वाचन त्यांनी केल्याने त्यांची मूळ धर्मावरिल श्रध्दा कमी झाली नाही.

नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजेच netaji subhash chandra bose information in marathi जेव्हा प्रेसिडेंट कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हाच त्यांच्यातील नेतृत्वगुण समोर आले. प्रेसिडेंट कॉलेज मधील प्रा. ओटेन हा भारतीय विद्ध्यार्थ्याशी उद्धट वागत होता. त्याच्या या  वागणूकीने कॉलेजमधील विद्ध्यार्थ्यानी आंदोलन केले. त्या आंदोलनाचे नेतृत्व सुभाषचंद्र यांनी केले. त्यामुळे सुभाषचंद्र यांना कॉलेज मधून काढून टाकण्यात आले होते.

See also  Taliban And Afaganistan 2021 | तालिबान आणि अफगानिस्तान

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधीजी :

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य लढ्यात जेव्हा उडी घेतली तेव्हा ते महात्मा गांधीजी यांच्या सहवासात होते. म. गांधीजी यांच्या विचारांनीच सुभाषचंद्र स्वतंत्रता आंदोलनात उतरले. ज्यावेळी महात्मा गांधीजी यांनी असहकार आंदोलन सुरु केले त्यावेळी सुभाषचंद्र नुकतेच आय.सी.एस. परीक्षा इंग्लंडमधून उत्तीर्ण होऊन आले होते. गांधीजी यांनी सुरु केलेल्या असहकार आंदोलनाने प्रभावित होऊन सुभाषचंद्र यांनी नोकरीचा राजीनामा दिला. सुभाषचंद्र यांनी म.गांधीजी यांची भेट घेतली आणि स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याची ईच्छा बोलून दाखविली. तेव्हा म. गांधीजी यांनी सुभाषचंद्र यांना कोलकात्याला चित्तरंजन दास यांच्याकडे पाठविले. चित्तरंजन दास हेच सुभाषचंद्र यांचे राजकीय गुरु होते.

 नेताजी सुभाषचंद्र बोस विषयी माहिती 2021 | Full Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi

१९३९ मध्ये जेव्हा कांग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत सुभाषचंद्र जिंकले आणि गांधीजी यांचे उमेदवार पट्टाभी सीतारामैया यांचा पराभव झाला. गांधीजी यांनी तो वैयक्तिक पराभव मानला. परंतु सुभाषचंद्र यांच्या विजयाने आपण खुश देखिल झालो असे वक्तव्य म.गांधीजी यांनी केले होते. सुभाषचंद्र यांनी यानंतर लगेच कांग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि म. गांधीजी यांच्यात कदाचित वैचारिक मतभेद असतील. परंतु सुभाषचंद्र यांना गांधीजी यांच्याबद्दल खुप आदर होता.  जून १९४४ मध्ये सिंगापूर येथून आकाशवाणी द्वारा एक संदेश देतांना सुभाषचंद्र यांनी म. गांधीजी यांचा उल्लेख सर्वप्रथम ‘राष्ट्रपिता’ असा केला होता.

तसेच अमेरिकन पत्रकार लुई फिशर यांना दिलेल्या मुलाखतीत गांधीजी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख ‘ देशभक्तांचा देशभक्त ‘ असा केला. जेव्हा सुभाषबाबू यांच्या अपघाती मृत्यूची बातमी आली तेव्हा गांधीजी यांनी ध्वज अर्ध्यावर घ्यायला सांगितला.

फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना आणि नजरकैदेतुन सुटका  :

१९३९ मध्ये कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुभाष बाबूंना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर लगेच सुभाष बाबूंनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक च्या सभा घेण्याचा सपाटा लावला . किसान सभा आणि फॉरवर्ड ब्लॉक यांचे संयुक्त अधिवेशन रामगढ येथे मार्च १९४० मध्ये झाले .या पाठोपाठ नागपुरला झालेल्या अधिवेशनात त्यांनी अस्थायी राष्ट्रीय सरकार स्थापन करण्याची मागणी केली. सुभाषबाबुंच्या या आक्रमक पावित्र्याने इंग्रज सरकारने स्थानबध्द केले. सुभाष बाबुंनी उपोषनाची धमकी दिल्यावर इंग्रज सरकारने त्यांना त्यांच्याच घरी नजरकैदेत ठेवले. सुभाषबाबू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचलेच असेल. जशी शिवाजी महाराजांनी आग्र्यातुन औरंगजेबाच्या नजरकैदेतुन सुटका केली तशीच सुटका सुभाषबाबुंनी केली. सुभाषबाबूंनी अध्यात्मवासाच्या बहाण्याने एकांतवास पत्करला आणि एकेदिवशी वेषांतर करून आपल्या राहत्या घरून पोलिसांना चकमा देत इंग्रज सरकारच्या तावडीतुन निसटले.

See also  First Newspaper In India - Bengal Gazette Information 2021| भारतातील पहिले वृत्तपत्र - बंगाल गॅझेट माहिती मराठी

जर्मनीला  प्रयाण आणि हिटलरशी भेट :

सुभाषबाबू भगतराम यांच्यासह पेशावर मार्गे कबुलाला पोचले. त्यानंतर ते जर्मनीला गेले.सुभाषबाबू खरोखरच एक कुशल राजकारणी होते. शत्रुचा शत्रु तो आपला मित्र यानुसार त्यांनी हिटलर आणि मुसोलिनी यांच्यासोबत संबंध वाढविले. सुभाषबाबूंच्या कुशाग्र बुद्धीने हिटलर प्रभावित झाला होता.

सुभाषबाबूंनी जर्मनी येथून आकाशवाणीद्वारे सर्व भारतीय जनतेला संबोधित केले.  तेथील भारतीय सैनिकांना भेटून इंग्रज सरकारविरुद्ध संघटित होण्याचे आवाहन केले.

जपानला प्रयाण आणि आझाद हिंद सेनेची स्थापना :

द्वितीय महायुद्धात जपानने ब्रिटीशांविरुद्ध अशियात आघाडी उघडली तेव्हा सुभाषबाबू जर्मनीहून जपानला गेले. सुभाषबाबू पानबुडीने सुमात्रापर्यंत गेले व नंतर टोकियोला विमानाने पोचले. तेथे गेल्यावर त्यांनी जेष्ठ क्रांतिकारक रासबिहारी बोस यांची भेट घेतली. रासबिहारी बोस यांनी अगोदरच काही हिंदी सैनिकांना संघटित केले होते. सुभाषबाबुंनी जपानच्या मदतीने ऑक्टोबर १९४३ मध्ये या हिंदी सैनिकांच्या सहाय्याने आझाद हिंद सेनेची स्थापना केली. २१ ऑक्टोबर मध्ये १९४३ मध्ये सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना केलि. या सरकार मध्ये शुभाषबाबु स्वत राष्ट्रप्रमुख झाले. त्यांनी सरंक्षण मंत्रिपद स्वताकडे ठेवले. ते आझाद हिंद सेनेचे सरसेनापती बनले. या नव्या आझाद हिंद सरकारला जपान,जर्मनी,इटली या मित्र राष्ट्रांसह एकुण अकरा राष्ट्रांनी मान्यता दिली.

आझाद हिंद सेनेची भारताकडे कूच :

‘चलो दिल्ली’ असा नारा देत सुभाषबाबू आपल्या आझाद हिंद सेनेसोबत भारताकडे निघाले. आपल्या आकर्षक नेतृत्वाने सुभाषबाबुंनी आपल्या सैनिकांना प्रभावित केले. ‘तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूंगा’ , ‘जय हिंद’ असे नारे यांनी दिले. आझाद हिंद सेनेचे मनोबल उंचावले.

 नेताजी सुभाषचंद्र बोस विषयी माहिती 2021 | Full Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi

आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार ही बेटे इंग्रजांच्या ताब्यातून स्वंतंत्र केली. सुभाषबाबू यांनी या बेटांचे नामकरण अनुक्रमे शहीद आणि स्वराज असे केले. आझाद हिंद सेनेने इंफाळवरही हल्ला केला. पण नैसर्गिक आपत्तीने तेथून आझाद हिंद सेनेला माघार घ्यावी लागली.

See also  Marathi Writers Information In Marathi 2021 | मराठी साहित्यिक विषयी माहिती

जपानचा पराभव :

द्वितीय महायुद्ध  अंतिम टप्प्यात आले होते. जर्मनी आणि इटली या राष्ट्रांनी शरणागती पत्करली . त्यातच अमेरिकेने जपानच्या नागासाकी आणि हिरोशिमा या ठिकाणी अणुबॉम्ब टाकले. मानवी इतिहासात प्रथमच अणुबॉम्बचा प्रयोग केला. जपानने लगेच शरणागती पत्करली. जपानचा पराभव झाल्याने सुभाषबाबू यांचा खुप मोठा आधार गेला. पण सुभाषबाबू मूलतःच खंबीर होते. त्यांनी अजिबात हिम्मत हारली नाही.

सुभाषबाबुंचा रहस्यमयी मृत्यु :

जपान युध्दात हरला. त्यानंतर सुभाषबाबू यांनी रशियाला जाण्याचा निर्णय घेतला. कारण रशिया हा साम्यवादी देश होता. अमेरिका, इंग्लॅण्ड , फ्रान्स हे भांडवलवादी देश होते. साहजिकच रशिया आपल्याला मदत करू शकेल असा विचार सुभाष बाबूंनी केला असेल. म्हणून सुभाषबाबूंनी रशिया कडे जाण्याचा निर्णय घेतला. जपानच्या मदतीने सुभाषबाबू विमानाने निघाले. मात्र ,मार्गातच तैवान मधील तैपे विमानतळ नजिक त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातातच त्यांचे निधन झाले असे मानले गेले.  परंतु  बरेच लोक असे  मानतात की सुभाषबाबू यांचा मृत्यु त्या विमान अपघातात झाला नाही. कित्येक लोकांनी असाही दावा केला की ते स्वता सुभाषबाबूंना भेटले. द्वितीय महायुद्धातील युद्धबंदी कायद्याने कदाचित आपल्याला इंग्लैंडकडे सोपविले जाईल,म्हणून सुभाषबाबू सामोरे आले नाही.

हे सर्व तर्क आहेत. भारत सरकारने एक समिती गठित केली होती. त्या समितीनेही सुभाषबाबुंचा मृत्यु त्या विमान अपघातातच झाला असा निष्कर्ष काढला.

सुभाषबाबू म्हणजेच netaji subhash chandra bose information in marathi एक महान देशभक्त होते. भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी केलेला त्याग, परिश्रम याला तोड़ नाही. जय हिंद.

आपण ह्या पोस्ट मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस बद्दल माहिती घेतली . तुम्हाला जर 1983 world cup final in marathi बद्दल माहिती जाणून घायची असेल तर तुम्ही हि पोस्ट वाचू शकता .

तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या वेबसाईटला भेट देऊ शकता.

 

Spread the love

2 thoughts on “नेताजी सुभाषचंद्र बोस विषयी माहिती 2021 | Full Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi”

Leave a Comment