World Red Cross Day Information In Marathi 2021 | आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस सोसायटीबद्दल माहिती

 About Red Cross Information In Marathi 2021 | रेड क्रॉसबद्दल माहिती

 World Red Cross Day Information In Marathi 2021
source redcross.org

 World Red Cross Day Information In Marathi 2021

मनुष्य हा असमाधानी आहे. जे आहे त्यात समाधानी न राहता , अधिक कसे मिळेल याचाच विचारात मनुष्य नेहमी असतो. राजा असो वा रंक त्याला त्याच्याजवळ जे आहे त्यापेक्षा अधिक हवे असते. प्राचीन काळात राजे – महाराजे आपल्या राज्याचा विस्तार व्हावा म्हणून युद्ध करीत. युद्ध होई. कुणी जिंके तर कुणी युद्ध हारत असत. पण दोन्ही कडचे सैनिक मरत असत. हीच परिस्थिती मध्ययुगीन काळातही होती आणि आजच्या काळातही आहे. युद्धानंतर रणभूमीवर प्रेतांचा खच पडलेला असे. ही मृत सैनिकांचे प्रेते तशीच पडून राहत. जंगली श्वापदे , कुत्रे ती प्रेते खावुन टाकत. युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना कुठेतरी पाठवून देत. त्यांच्यावर कुठलाही वैद्यकीय उपचार न झाल्याने ते तडफडून आपले प्राण सोडत. या अशा मृत आणि जखमी सैनिकांसाठी आंतरराष्ट्रीय  रेड क्रॉस सोसायटीची (International Federation Of Red Cross) स्थापना करण्यात आली. आजच्या या लेखात आपण आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस सोसायटीबद्दल ( World Red Cross Day Information In Marathi 2021) माहिती घेऊ या.

रेड क्रॉस सोसायटीची स्थापना केव्हा झाली ? : Istablishment of Red Cross

1859 मध्ये इटली आणि सल्फिरिनो यांच्यात युद्धे झाली. युद्धात मृत झालेल्या आणि जखमी झालेल्या सैनिकांची ही दयनीय स्थिती बघितल्यावर जिनेव्हा हेनरी दुनात ( Henry Dunant) यांचे ह्रदय द्रवले. सत्तालोलुप सत्ताधिकारी यांना याचे काही देणे-घेणे  नाही  हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी दोन्ही पक्षातील जखमी झालेल्या सैनिकांचे प्राण कसे वाचाविता येतील यासाठी विचार केला. त्यातूनच त्यांनी जखमी सैनिकांचे प्राण वाचाविता येतील यासाठी वैद्यकीय सुविधा उभारण्याचे ठरविले. यातूनच रेड क्रॉस ही आंतरराष्ट्रीय सोसायटी स्थापन झाली.

See also  India's First Nuclear Test 1974 Information In Marathi | भारताची अणुचाचणीकडे  यशस्वी वाटचाल

हेनरी यांनी रेड क्रॉस सोसायटीची 1863 मध्ये स्वित्झर्लंड ( Switzerland) येथे केली. मानवतेच्या विशाल दृष्टिकोनातून  त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कारही मिळाले.

 World Red Cross Day केव्हा साजरा करण्यात येतो ?  World Red Cross Day Information In Marathi 2021

world Red Cross Day हेनरी यांच्या जन्मदिनी म्हणजे 8 मे रोजी दरवर्षी  साजरा करण्यात येतो.  रेड क्रॉस सोसायटीच्या स्वयंसेवकांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी संपूर्ण जगात world Red Cross Day साजरा केला जातो.

रेड क्रॉस सोसायटीचे मुख्यालय कोठे आहे ?

रेड क्रॉस सोसायटीचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे आहे.

रेड क्रॉस सोसायटीचे कार्य :  World Red Cross Day Information In Marathi 2021

संपूर्ण मानव जातीची सेवा करणे हे रेड क्रॉस सोसायटीचे प्रमुख कार्य आहे. युद्धामधे जखमी झालेल्या सैनिकांसाठी ही संघटना कार्य तर करतेच. शिवाय जगात कोठेही नैसर्गिक आपत्ती जसे महापुर, भूकंप अशा संकटात रेड क्रॉस सोसायटी मदतीला धावून जाते.

रेड क्रॉस सोसायटीचे सभासद :

 World Red Cross Day Information In Marathi 2021
source: wikimedia.org

सुरुवातीला रेड क्रॉस सोसायटीचे ब्रिटन ,अमेरिका, फ्रान्स ,इटली आणि जपान ही राष्ट्रे सभासद होती. आता रेड क्रॉस सोसायटीचे जवळपास 190 देश सदस्य आहेत. आज जगात विविध देशात रेड क्रॉस सोसायटीच्या शाखा कार्यरत आहेत.

रेड क्रॉस सोसायटी आज संपूर्ण मानव जातीची सेवा करीत आहे.

आमचा World Red Cross Day Information In Marathi 2021 हा लेख तुम्हाला कसा वाटला ते जरुर कळवा.

नेताजी सुभाषचंद्र बोस विषयी माहिती 2021 | Full Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi

तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या website भेट देवू शकता.

 

Spread the love

1 thought on “World Red Cross Day Information In Marathi 2021 | आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस सोसायटीबद्दल माहिती”

Leave a Comment