Jaypur Pink City – World Heritage 2019 | गुलाबी शहर जयपुर जागतिक वारसा स्थळ

Jaypur Pink City – World Heritage 2019 | गुलाबी शहर जयपुर जागतिक वारसा स्थळ

Jaypur Pink City - World Heritage 2019
source : www. flickr.com

भारताचे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाणारे जयपूर हे आता जागतिक वारसा स्थळ ( Jaypur Pink City – World Heritage 2019) म्हणूनही ओळखले जाते. भारताच्या या ऐतिहासिक शहराचा दिनांक 6 जुलै 2019 रोजी जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. दि इंटरनॅशनल कौन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स या संस्थेने जयपूर शहराची पाहणी 2018 मध्ये केली होती.

शहर नियोजन,स्थापत्यचा सुरेख संगम आपल्याला जयपूर येथे दिसून येतो. जयपूर हे मध्ययुगीन काळात व्यावसायिक आणि व्यापाराचे एक प्रमुख केंद्र होते. या शहरातील हस्तकलांच्या वैविध्यपूर्ण प्रकारांनी आजही आपले मन मोहित करते. जयपूर शहराने आपली पारंपरिक संस्कृती अजुनही जपून ठेवली आहे.

जयपूर शहराची स्थापना कोणी केली ?

जयपूर शहराची स्थापना राजा सवाई जयसिंग यांनी केली. त्यांनी जयपूर या शहराची स्थापना इ. स.1728 च्या सुमारास वसविले. इ. स. 1700 च्या सुमारास राजा सवाई जयसिंग आमेरच्या गादीवर आला. त्यांच्याच नावावरून या शहराला जयपूर हे नाव पडले. राजा सवाई जयसिंग यांनी आपल्या राज्यात धर्मशाळा,रस्ते,विहिरी बांधल्या. तसेच त्यांनी जयपूर,बनारस दिल्ली आणि उज्जैन येथे वेधशाळा ही उभारल्या.

जयपुर येथील अप्रतिम स्थापत्य कला :

Jaypur Pink City - World Heritage 2019

राजा सवाई जयसिंग यांनी जयपूर शहराची निर्मितीसाठी देशभरातून उत्कृष्ट स्थापत्य तज्ञ आणि शिल्पकार यांना बोलाविले होते. जयपूर शहरा च्या स्थापत्यात वास्तुशास्त्र,खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांचा अनोखा संगम दिसून येतो. जयपूरच्या निर्मितीत रचानाकरांची सौंदर्यदृष्टी दिसून येते. घरे,बाजार, दुकाने आणि मंदिरे यांचा दर्शनी भाग जवळपास एकसारखाच दिसून येते. यांची प्रवेशद्वारे मुख्य रस्त्याच्या बाजूने आहेत.

See also  भीमबेटका गुफा मध्यप्रदेश 2021 | Full Bhimbetka Guha Information In Marathi

शहराची रचना करताना समांतर रस्ते,प्रशस्त चौक मजबूत तटबंदी आणि त्याभोवती आठ वेशी यांचा विचार केला होता. जयपूरच्या निर्मितीत प्राचीन हिंदू,मुघल शैली आणि पाश्चात्य शैली यांचा सुरेख संगम दिसून येतो.

जयपूर येथील इतरही ऐतिहासिक वारसा स्थळे आहेत. पाचमजली चंद्रमहाल,कोरीव कामासाठी प्रसिद्ध असलेला मुबारक महल, त्याचप्रमाणे हवामहाल जो प्रतापसिंहने बांधलेला होता. तसेच जुने चित्रे, लेख आणि शस्त्र – हत्यारे आणि जंतरमंतर ही वेधशाळा येथील प्रमुख आकर्षण आहे.

जयपुर येथील पारंपरिक कला :

दगिण्यावरील मीना काम , हस्तिदंतीवरील कोरीव काम हातमागावर कापड विणणे आणि जडावाचे काम, संगमरवरावरील कोरीव काम इ. कला कौशल्यासाठी जयपूर प्रसिद्ध आहे.

जयपुर येथील इतर आकर्षण :Jaypur Pink City – World Heritage 2019

जयपूर येथे वार्षिक उत्सवादरम्यान पर्यटक येतात. येथे व्हींटेज कार रॅली , एलि फं ट फेस्टिवल , बाणगंगा मेला, गणगौर महोत्सव, तीज होली, चाकसू मेला यासाठी दुरदुरून पर्यटक येतात. जयपूर येथील मिठाई आणि स्ट्रीट फूड मार्केट प्रसिद्ध आहेत.

आमचा  Jaypur Pink City – World Heritage 2019 हा लेख तुम्हाला कसा वाटला ते जरुर कळवा.

तुम्हाला जर भीम बेटका विषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खालील लिंक वर जाऊन माहिती घेऊ शकता.

भीमबेटका गुफा मध्यप्रदेश 2021 | Full Bhimbetka Guha Information In Marathi

तुम्ही आमच्या http://www.newiinfo.com या website ला भेट देऊ शकता.

Spread the love

Leave a Comment