Children Day Information In Marathi 2021 | बालदिनबाबत माहिती

Children Day Information In Marathi 2021 | बालदिनबाबत माहिती

जगभरात बालदिन (  Children Day Information In Marathi 2021) हा 20 नोव्हेंबरला साजरा केला जातो. परंतु आपल्या भारतात मात्र बालदिन 14 नोव्हेंबरला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. आजच्या या लेखात आपण बालदिन बाबत (Children Day Information In Marathi 2021)  माहिती घेऊ या.

Children Day Information In Marathi 2021

पहिला बालदिन केव्हा साजरा करण्यात आला?

पहिला बालदिन 1953 ला साजरा करण्यात आला. जिनिव्हाच्या आंतरराष्ट्रीय बालकल्याण संघटनेने यासाठी पुढाकार घेतला होता. भारताच्या व्ही.के. कृष्णमेनन यांनीही जागतिक बालदिनाची संकल्पना उचलून धरली.त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेने 1954 मध्ये  बालदिन साजरा केला. त्यावेळी बालदिन ऑक्टोबर महिन्यात साजरा करण्यात येत असे. मात्र 1959 मध्ये पहिल्यांदा 20 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात आला. याला कारण असे की, 20 नोव्हेंबर 1959 रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेने पहिल्यांदा बालहक्काची सनद ( Declaration Of Children’s Rights ) स्वीकारली. पुढे 1989 ला याच दिवशी बाल हक्काच्या मसुद्यावर सह्या केल्या गेल्या. त्यावेळी जगातील एकूण 191 देशांनी याला पाठींबा दिला होता.

भारतात 14 नोव्हेंबर ला बालदिन का साजरा करण्यात येतो?

Children Day Information In Marathi 2021

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मदिनी भारतात बालदिन साजरा करण्यात येतो. पंडित नेहरू यांना लहान मुलांविषयी खूप जिव्हाळा आणि प्रेम होते. ते नेहमी लहान मुलांमध्ये रमत असत. त्यामुळेच त्यांना चाचा नेहरु असेही म्हणतात.

Children Day Information In Marathi 2021

बालदिन का साजरा करण्यात येतो ? बालदिनाचे महत्व –

मुलें म्हणजेच देवा घरची फुलें असे म्हटले जाते. मुलें ही निरागस असतात. त्यांच्या ठायी द्वेषभावना नसते. हीच मुले उद्याची देशाची नागरिक असतात. त्यांचा सर्वागीण विकास होणे गरजेचे असते. मुलांचे बालपण , त्यांचे हक्क यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. लहान मुलांना प्रेम आणि सुरक्षितता मिळाली पाहिजे.

See also  Lokmanya Tilak information in marathi 2021| लोकमान्य टिळक यांच्या विषयी माहिती.

त्यांच्यामध्ये सहिष्णुता , सर्वधर्मसमभाव निर्माण होणे आवश्यक आहे. अशी संस्कारी पिढी निर्माण होणे फार आवश्यक असते. अशा सुजाण नागरिकांमुळेच देशाचा विकास होईल आणि पर्यायाने जगाचा विकास होऊन जगात शांतता निर्माण होईल. त्यामुळेच मुलांचे बालपण सुरक्षित ठेवण्यासाठी बालदिन साजरा करण्यात येतो.

आजही आपण बघतो की ज्या वयात लहान मुले खेळायला पाहिजे , शाळेत जायला पाहिजे त्या वयात त्यांना काम करावे लागते. सरकारने बालमजुरी नष्ट करण्यासाठी कायदा केला. परंतु त्याचा खरोखरच फायदा झाला का याचा विचार करायला हवा. आजही सिग्नलवर बरीच लहान मुलें भिक मागताना दिसतात. सकस आहार तर दूर दोन वेळचे जेवणही नीटपणे भेटत नाही. त्यामुळे कुपोषण वाढत आहे. सरकारी योजना आणि कायदे यांचे योग्यपणे अंमलबजावणी झाली तरच मुलांचा विकास होईल.

काही ठिकाणी मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव केला जातो. मुलींच्या तुलनेत मुलांना अधिक स्वातंत्र्य दिले जाते. त्यांच्याकडे अधिक लक्ष दिले जाते. हेही बालहक्काच्या विरोधात आहे. खऱ्या अर्थाने जर बालदिनाची संकल्पना राबविण्याची असेल तर समाजाची मानसिकता अगोदर बदलण्याची गरज आहे.

जेव्हा लहान मुलें मुक्त आणि सुरक्षित राहतील तेव्हाच बालदिनाची संकल्पना खऱ्या अर्थाने यशस्वी झाली असे आपण म्हणू शकतो.

सुजाण नागरिक म्हणून आपणही बालकांचे हक्क कसे सुरक्षित राहतील याची काळजी घेणे आवश्यक आहे. आजची ही मुलें भारताचे उद्याचे नागरिक आहेत. भारताचे हे भविष्य आज वर्तमानात आपल्या हाती आहे. चला तर मग भारताचे भविष्य उज्ज्वल करू या.

तुम्हाला आमचा Children Day Information In Marathi 2021 हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा.

तुम्हाला जर आंतर राष्ट्रीय रेड क्रॉस बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील लिंकवरून तुम्ही माहिती घेऊ शकता.

World Red Cross Day Information In Marathi 2021 | आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस सोसायटीबद्दल माहिती

तुम्ही आमच्या http://www.marathimarathi.com या वेबसाईटला भेट देऊ शकता.

See also  महात्मा गांधीजींचे प्रेरणादायी जीवन 2021 | Full Mahatma Gandhi Information In Marathi

स्रोत : Google

 

 

 

Spread the love

2 thoughts on “Children Day Information In Marathi 2021 | बालदिनबाबत माहिती”

 1. We always struggled to pack before a trip. What to bring, how many or how much of it, etc…
  So we have created this Foldable Travel Bag. It’s Just So Versatile!

  . Easy to Fold and Unfold
  . Large Storage Space
  . Portable + Waterproof

  60% OFF for the next 24 Hours ONLY + FREE Worldwide Shipping for a LIMITED time!

  Buy now: https://ifashiononline.shop

  All the best,

  Gertrude

  Reply

Leave a Comment