Brihadeeshwar Temple Information In Marathi 2021 | अद्भुत स्थापत्यशास्त्राचा नमुना बृहदिश्र्वर मंदिर तंजावर

Brihadeeshwar Temple Information In Marathi 2021| अद्भुत स्थापत्यशास्त्राचा नमुना बृहदिश्र्वर मंदिर तंजावर

Brihadeeshwar Temple Information In Marathi 2021

(Brihadeeshwar Temple Information In Marathi 2021| अद्भुत स्थापत्यशास्त्राचा नमुना बृहदिश्र्वर मंदिर तंजावर) प्राचीन भारतीय स्थापत्यकला खरोखरच अद्भुत होती. याची साक्ष देणारी मंदिरे आजही आजही उभी आहेत. ही मंदिरे,शिल्पे यावरून आपली संस्कृती,आपली स्थापत्यकला किती प्रगत होती याची कल्पना येते. आजच्या या लेखात आपण आपल्या भारतीय स्थापत्यकलेचा अद्भुत आविष्कार असलेले एक मंदिर की ज्याची निर्मिती पाया न खोदता केली त्या बृहदिश्र्वर मंदिराबाबत (Brihadeeshwar Temple Information In Marathi 2021| अद्भुत स्थापत्यशास्त्राचा नमुना बृहदिश्र्वर मंदिर तंजावर) माहिती जाणून घेऊ या.

मंदिराचे निर्माण कार्य :

हे मंदिर तामिळनाडूतील तंजावर येथे आहे. कावेरी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर आजही मोठ्या दिमाखात उभे आहे. स्थानिक भाषेत या मंदिराला पेरूवुटैयार कोविल असेही म्हटले जाते.

बृहदेश्र्वर मंदिराचे निर्माण कार्य इ.स. 1003 ते 1010 या काळात चोल साम्राज्यातील प्रथम राजराज या राजाच्या हस्ते झाले. याच राजाच्या नावावरून या मंदिराला राजराजेश्वर मंदिर असेही नाव पडले आहे.

बृहदेश्र्वर मंदिराचे स्थापत्य – द्रविडी स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना : Brihadeeshwar Temple Information In Marathi 2021

Brihadeeshwar Temple Information In Marathi 2021

बृहदेश्र्वर मंदिराचे बांधकाम द्रविडी स्थापत्य कलेनुसार झाले आहे. भगवान शिवचे असलेले हे मंदिर एकेकाळी जगातील सर्वात उंच वास्तू होते. या मंदिरात एकूण तेरा मजले आहेत. मंदिराची उंची सुमारे  66 मीटर (216 फूट) आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी 130000 टन ग्रॅनाईट दगड लागले. संपूर्ण ग्रॅनाईट ने बनविलेले हे जगातील एकमेव मंदिर आहे. या मंदिराच्या जवळपास  साठ किलोमीटर पर्यंत कोणताही पहाड वा डोंगर नाही. असे म्हटले जाते की, तीन हजार हत्तीवरून हे दगड आणले गेले.

या मंदिराची पूर्व – पश्चिम लांबी 240.90 मीटर आहे. तर उत्तर – दक्षिण रुंदी 122 मीटर आहे. मंदिराच्या पूर्व दिशेला एक गोपुर आहे आणि इतर तीन दिशांना तीन प्रवेशद्वार आहेत.

See also  Pashupatinath temple information in marathi 2021| पशुपतीनाथ मंदिर नेपाळबद्दल संपूर्ण माहिती

सिमेंट – चुना असे जोडणारे कोणतेही पदार्थ न वापरता या बांधकाम पूर्ण केले गेले.  दगडांना locking system ने जोडले आहे. ही बाब अत्यंत अचंबित करणारी आहे. पाया खोदलेला नसल्याने या मंदिराला तरंगते मंदिर असेही म्हटले जाते. आश्चर्य असे की 2004 च्या त्सुनामीचा तडाखा या मंदिराचे काहीच नुकसान करू शकले नाही.

मंदिराचा घुमट हा एकाच विशालकाय दगडापासून बनविला असून त्याचे वजन अंदाजे 80 टन आहे. हा घुमट अष्टकोनी आहे. अचंबित करणारी बाब म्हणजे या घुमटाची सावली जमिनीवर पडत नाही.या घुमटाचा घेर हा 8.8 मीटर आहे. ज्या काळात क्रेन सारखी साधने नसतांना एवढा विशालकाय दगड इतक्या उंचीवर स्थापन करून अप्रतिम कोरीव काम कसे केले असेल ते एक कोडेच आहे. शिवाय मंदिरातील शिवलिंग सुद्धा विशाल आहे. हे शिवलिंग 8.7 मीटर उंच आहे. त्यावरूनच बृहदेश्र्वर हे नाव या मंदिराला मिळाले आहे. त्याचप्रमाणे मंदिरातील नंदीची मूर्ती सुद्धा खूप मोठी आहे. एकाच दगडात कोरलेल्या या नंदीच्या मूर्तीची उंची 13 फूट आहे. या मंदिराच्या भिंतीवर असलेले लेख संस्कृत आणि तमिळ भाषेत असून ते अजूनही स्पष्टपणे ओळखू येतात. आपल्या अद्भुत स्थापत्यशास्त्रामुळे युनेस्कोने 1987 साली या मंदिराची जागतिक वारशा स्थळांच्या यादीत नोंद केली आहे.

तुम्हाला या मंदिराला भेट देऊन नक्कीच आवडेल.

आमचा Brihadeeshwar Temple Information In Marathi 2021|हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा.

तुम्हाला जर जगन्नाथ पुरी मंदिरबाबत माहिती घ्यायची असेल तर खालील लिंकवरून तुम्ही माहिती घेऊ शकता.

Puri Jagannath Temple 2021 | रहस्यमयी जगन्नाथ पुरी मंदिर

आमच्या http://www.marathimahiti.com या वेबाईटवर ही तुम्ही जाऊ शकता.

 

 

Spread the love

2 thoughts on “Brihadeeshwar Temple Information In Marathi 2021 | अद्भुत स्थापत्यशास्त्राचा नमुना बृहदिश्र्वर मंदिर तंजावर”

Leave a Comment