Puri Jagannath Temple 2021 | रहस्यमयी जगन्नाथ पुरी मंदिर

Puri Jagannath Temple 2021|रहस्यमयी जगन्नाथ पुरी मंदिर

Puri Jagannath Temple २०२१

हिंदू धर्मातील एक महत्वाचे धार्मिक स्थळ म्हणून जगन्नाथ पुरीची ओळख आहे. हिंदू धर्मातील चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी एक ओरिसा येथील जगन्नाथ पुरी आहे. त्यामुळे जगन्नाथ पुरी हे हिंदुसाठी अत्यंत पवित्र असे धार्मिक ठिकाण आहे. पुराणात पृथ्वीवरील वैकुंठ असा जगन्नाथ मंदिराचा उल्लेख केला आहे.  जगन्नाथ पुरी येथील रथयात्रा जगप्रसिद्ध आहे.आजच्या या लेखात आपण Puri Jagannath Temple 2021 म्हणजेच रहस्यमयी जगन्नाथ पुरी मंदिर याबाबत माहिती घेऊ या.

जगन्नाथ पुरी मंदिराचा इतिहास आणि रचना : Puri Jagannath Temple 2021

Puri Jagannath Temple २०२१

हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानल्या गेलेल्या या जगन्नाथ पुरीला पुराणात श्रीक्षेत्र वा पुरुषोत्तम क्षेत्र असेही म्हटल्या गेले आहे. हे मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाचा आकार शंखासारखा आहे म्हणून या ठिकाणाला शंख क्षेत्र असेही म्हटले जाते.

असे मानले जाते की, जगन्नाथ पुरी येथील मंदिर बाराव्या शतकात कलिंगचा राजा चोडगंगा आणि अनंग भीमदेव यांनी बांधले.या मंदिरात भगवान जगन्नाथ म्हणजेच भगवान श्रीकृष्ण त्याचे भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्या लाकडी मुर्त्या आहेत. या मुर्तींना फक्त डोळे,नाक, आणि तोंड एवढेच अवयव आहेत. दर बारा वर्षांनी या मुर्त्या नवीन तयार केल्या जातात.

जगन्नाथ पुरी मंदिर नीलाचल पर्वतावर आहे. या मंदिराच्या द्वारासमोरच काळ्या पाषाणाचा अरुणस्तंभ आहे. हा स्तंभ जवळपास आठ मी. उंच आहे. मंदिराच्या सभोवती सुमारे सहा मी. उंचीची दगडी तटबंदी आहे. पूर्वेकडील तटबंदी १९५ मी. तर दक्षिणेकडील तटबंदी ८० मी. लांब आहे. या तटबंदीच्या आतील भागात आणखी एक तटबंदी आहे आणि त्यानंतर आत मुख्य मंदिर आहे.हे मंदिर एकुण ४००००० चौरस फुट आहे.या मंदिराची उंची २१४ फुट आहे.

See also  The Somnath Temple full information in marathi 2021 | सोमनाथ मंदिर विषयी माहिती

मंदिराच्या आवारात अनेक देवतांची मंदिरे आहेत. त्यामध्ये एक सूर्य मंदिर आणि तेरा शिवालये आहेत. मुख्य मंदिरात चार स्वतंत्र विभाग आहेत. गर्भगृह,त्या व्यतिरिक्त सभामंडप, नृत्यमंडप आणि भोगमंडप आहेत. गर्भगृहावर जवळपास ६१ मी. उंचीचे विमान आहे. त्यावर गरुडध्वज आणि सुदर्शनचक्र आहे. सुंदर अशी कोरीव चित्रे या मंदिरावर आणि विमानावर आहेत. मंदिराला चारही बाजूने प्रवेशद्वारे आहेत. पूर्व दिशेला असलेले प्रवेशद्वाराला सिंहद्वार म्हटले जाते.यालाच महाद्वार असेही म्हटले जाते.

जगन्नाथ पुरी रथयात्रा :Puri Jagannath Temple 2021

Puri Jagannath Temple २०२१

जगन्नाथाची रथयात्रा ही जगप्रसिध्दआहे.  ही रथयात्रा आषाढ शु. दितीयेला सुरु होते.भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा या तिघांच्याही रथांची यात्रा निघते. लाखोंच्या संख्येने भाविक दरवर्षी या यात्रेकरिता या ठिकाणी येतात. भाविकांची अशी श्रध्दा आहे की या रथाखाली सापडून मृत्यु आल्यास मोक्ष प्राप्त होतो. परंपरेनुसार कोणत्याही कारणाने जर एखाद्या वर्षी रथयात्रा स्थगित झाली तर पुढील बारा वर्षे रथयात्रा करता येत शकत नाही

भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत वापरले जाणारे रथ भव्य आहेत. हे रथ संपूर्ण लाकडी आहेत. या रथांमध्ये कोणताही धातु वापरल्या जात नाही. जेव्हा रथयात्रा निघते तेव्हा बलराम हे वडिल बंधू असल्याने त्यांचा रथ सर्वात समोर असतो. या रथाला तालध्वज असे नाव आहे. हा रथ ४५ फुट उंच असतो. त्यानंतर सुभद्रेचा रथ असतो. त्याला पद्मरथ किंवा दर्पदलन म्हटले जाते. हा रथ ४३ फुट उंच असतो. नंतर सर्वात शेवटी भगवान जगन्नाथाचा रथ असतो. या रथाला नंदीघोष  किंवा गरुड ध्वज म्हणतात. हा रथ ४५ फुट उंच असून त्याला १६ चाके असतात.

जगन्नाथ पुरी मंदिरातील रहस्य : Puri Jagannath Temple 2021

सुदर्शन चक्र हे मंदिराच्या शिखरावर असून ते अष्टधातूचे बनविले आहे. या सुदर्शन चक्राला नील चक्र असेही म्हणतात. शहरातील कोणत्याही कोपऱ्यातून ते सरळच दिसते.

भाविकांसाठी प्रसाद तयार करण्यासाठी एकावर एक अशी सात भांडी ठेवली जातात. यातील सर्वात वरच्या भांड्यात प्रसादाचे अन्न शिजविल्या जाते. ही भांडी मातीची असतात.

See also  Konark Surya Mandir information in marathi 2021 | कोणार्क सूर्य मंदिर मराठी माहिती

जगनाथ पुरीचे मंदिर समुद्र किनारी आहे. समुद्र किनाऱ्यावरच्या लाटांचा आवाज मंदिरात अजिबात ऐकू येत नाही. मंदिराच्या सिंह द्वारातुन प्रवेश केल्यावर समुद्राच्या लाटांचा आवाज बंद होतो.

सहसा कोणत्याही मंदिराच्या कळसावर पक्षी बसलेले दिसून येतात. परंतु या मंदिराच्या कळसावरून पक्षी उडत नाही. किंवा पक्षी कळसावर बसत नाहीत.

जगनाथ पुरीच्या मंदिरावरील ध्वज नेहमी हवेच्या विरुध्द दिशेला फडकतो. रोज नविन ध्वज लावल्या जातो.

सर्वसामान्यपणे दिवसा वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात आणि रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. नेमके याच्या उलटे जगन्नाथ पुरी येथे होते.

मंदिराच्या शिखराची सावली दिवसाच्या कोणत्याही वेळेला पडत नाही.

ज्या दिवशी मंदिरातील भगवान जगन्नाथाची मूर्ती बदलली जाते त्या दिवशी संपूर्ण शहरातील वीज बंद केली जाते. जे पुजारी मूर्ती बदलतात त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते. त्याच प्रमाणे हाताला सुध्दा कापड गुंडाळलेले असते.

जगन्नाथ पुरी जवळच मार्कंडेय सरोवर,कृष्णवट,बलराम समुद्र आणि इन्द्रद्युम्न कुंड हे इतर तीर्थ स्थळे आहेत.

जगन्नाथ पुरीला भेट देऊन आपण एक अलौकिक आनंद प्राप्त करू शकतो.

तुम्हाला आमचा हा लेख कसा वाटला ते जरुर कळवा.

तूम्हाला जर मीनाक्षी मंदिराबाबत माहिती घ्यायची असेल तर तुम्ही खालील लिंकद्वारे घेऊ शकता.

Meenakshi mandir information in marathi 2021 | मीनाक्षी मंदिर माहिती

तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com ला पण भेट देऊ शकता.

 

 

 

 

Spread the love

1 thought on “Puri Jagannath Temple 2021 | रहस्यमयी जगन्नाथ पुरी मंदिर”

Leave a Comment