Table of Contents
History of Shivaji Maharaj 2021| छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षरतेवर शंका घेणारे ग्रँट डफ आणि सर जदुनाथ सरकार यांचा चुकीचा दावा
मराठ्यांच्या इतिहासाचे अभ्यासक ग्रँट डफ आणि सर जदुनाथ सरकार यांनी असा दावा केला आहे की, छत्रपती शिवाजी महाराज ( shivaji maharaj history in marathi) हे निरक्षर होते. परंतु त्यांनी केलेले संशोधन हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे अनेक पुरावे मिळालेले आहेत. आजच्या या लेखात आपण छत्रपती शिवाजी महाराज {History of Shivaji Maharaj 2021 } यांच्या साक्षरतेवर शंका घेणारे ग्रँट डफ आणि सर जदुनाथ सरकार यांचा दावा कसा चुकीचा होता याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
ग्रँट डफ याचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी तर्क : History of Shivaji Maharaj 2021
ग्रँट डफ हा मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यासक होता. तत्कालीन काळात वाचन – लेखन हे फक्त ब्राम्हण आणि प्रभू या समाजातीलच लोकांना येत होते. इतर समाजातील क्वचितच कोणाला लिहता – वाचता येत होते.केवळ तेवढ्यावरच शिवाजी महाराज हे निरक्षर होते असे म्हणणे मूर्खपणाचे ठरते. शिवाजी महाराज खरोखरच निरक्षर होते याचा ठोस पुरावा मात्र ग्रँट डफ याने दिला नाही.
याउलट बहुजन समाजातील काही लोकांना लिहिता – वाचता येत होते याचे पुरावेही सापडले आहेत.
संत तुकाराम महाराज यांचे अभंग लिहून काढणारे त्यांचे शिष्य संताजी जगनाडे हे तेली समाजाचे होते.
खेड कसब्याच्या देशपांडे पणाबाबत एका शिवकालीन कागद उपलब्ध झाला आहे. त्यामध्ये असे नमूद आहे की जैतपली नावाच्या कुणबी समाजातील या व्यक्तीला लिहिता – वाचता येत होते. तात्पर्य बहुजन समाजातील काही लोकांना देखील त्या काळी लिहिता – वाचता येत होते. छत्रपती शिवाजी महाराज हे तर शहाजी राजांसारख्या बलाढ्य आणि तालेवार सरदाराच्या घरी जन्माला आले होते. त्यामुळे ग्रँट डफ याचा दावा स्पष्टपणे चुकीचा ठरतो.
सर जदुनाथ सरकार यांनी केलेला चुकीचा दावा : History of Shivaji Maharaj 2021
सर जदुनाथ सरकार हे देखील मराठ्यांच्या इतिहासाचे एक संशोधक होते. त्यांच्या मते, मध्ययुगीन भारतातील अकबर,हैदर अली आणि महाराजा रणजितसिंह यांच्याप्रमाणे शिवाजी महाराज पण निरक्षर होते.
सर जदुनाथ सरकार असा निकष लावते की, छत्रपती शिवाजी महाराजांना कोणत्याही युरोपियन लोकांनी लिहतांना किंवा वाचतांना पाहिले नाही, असे त्यांनी आपल्या वृत्तांतात नमूद केले नाही. तसेच युरोपियन लोकांनी दिलेला अर्ज शिवाजी महाराजांनी आपल्या अधिकाऱ्याकडे दिला. म्हणून सर जदुनाथ सरकार शिवाजी महाराज हे निरक्षर होते असे म्हणतात. मुळातच शिवाजी महाराज यांना युरोपियन लोक फारच कमी वेळा भेटले. त्या युरोपियन लोकांनी जरी आपल्या वृत्तांतात शिवाजी महाराजांना लिहितांना वा वाचतांना बघितले नसल्याचे नमूद केले असते तरी शिवाजी महाराज हे निरक्षर होते असे म्हणणे चुकीचे ठरते.
एखाद्या व्यक्तीला आपण जर लिहितांना वा वाचतांना बघितले नाही तर ती व्यक्ती निरक्षर आहे असे ठामपणे म्हणू शकत नाही. तत्कालीन रीतिरिवाज होता की आलेली पत्रे दरबारातील कारकून वा एखादा अधिकारी वाचून दाखवीत असे. मुघल दरबार आणि विजापूरच्या दरबारातील प्रथा अशाच होत्या.
सर जदुनाथ सरकार यांचे दुसरे म्हणणे असे होते की, शिवाजी महाराजांचे हस्तलिखित कोणताही कागद सापडला नाही.
वरील विधानावरूनही हे म्हणणे चूक ठरेल की शिवाजी महाराजांना लिहिता येत नव्हते. कारण राज्यकर्ते आपली पत्रे त्यांच्या कारकूनाकडून लिहून घेत असत. क्वचित प्रसंगीच ते पत्रे लिहित असत. कारकुंनानी लिहिलेले पत्रावर सही करण्याची पद्धत त्याकाळी नव्हती. पत्रांच्या शेवटी काही मजकूर स्वतःच्या हाताने लिहिण्याची प्रथा होती. त्यामुळे पत्राच्या शेवटचा मजकूरातील अक्षर हे वरील अक्षरांपेक्षा वेगळे असणे स्वाभाविक आहे. म्हणून अशी शिवकालीन पत्रांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.
छत्रपती शिवाजी महाराजांची बरीचशी पत्रे काळाच्या ओघात नष्ट झाली. आता जवळपास दोनशेच्या थोडी वर शिवाजी महाराजांची पत्रे मिळाली आहेत. त्यातील ही सुमारे शंभर ते सव्वाशे च्या आसपास पत्रे अस्सल आहेत, तर बाकीची नकलांच्या स्वरूपात आहेत.ज्या पत्रांवर शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर असण्याची शक्यता आहे अशी आठ ते दहा पत्रे असू शकतात. परंतु अशी पत्रे आढळली नाहीत. बऱ्याचदा पत्रांवर शिक्केच मारली जात असत.
इतिहासात असे अनेक प्रसिद्ध व्यक्ती होऊन गेल्या, की त्यांचे हस्ताक्षर मिळालेले नाही. यामध्ये शिवराज्याभिषेक करणारे गागाभट्ट तसेच प्रसिद्ध कवी वामन पंडित, करणकौस्तुभ हा ग्रंथ लिहिणारे कृष्ण ज्योतिषी यांची पण हस्ताक्षर सापडले नाही. निजामशाही तील सर्वच बादशहा, निजामशाहीचा वजीर मलिक अंबर, अली आदिलशहा, सिकंदर आदिलशहा, अब्दुल्ला कुतुबशहा, अबुल हसन कुतुबशहा यांचे पण हस्ताक्षर मिळालेले नाही. ही सर्व व्यक्ती निरक्षर होती असे कोणीच म्हटले नाही.
शिवाजी महाराज निरक्षर नव्हते याचे आणखी सबळ पुरावे बघू या. History of Shivaji Maharaj 2021
कवी जयराम पिंड्ये हा शहाजी राजांच्या दरबारात होता. त्याने राधामाधवविलास या ग्रंथात शहाजी राजांच्या बद्दल माहिती सांगितली आहे. त्यानुसार शहाजी राजे आणि त्यांची मुले संभाजी राजे ( शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ) आणि एकोजी राजे यांना संस्कृतचे ज्ञान होते असे सांगितले आहे. त्यामुळे शहाजी राजे केवळ शिवाजी महाराजांनाच निरक्षर ठेवतील हे शक्य नाही.
शिवाजी महाराजांनी सोन गड येथे कैद करून ठेवलेल्या हेन्री रेव्हींगटन आणि इतर इंग्रजांनी सुरतला पाठविलेल्या 10 जून 1661 च्या पत्रात असे लिहिले आहे की पत्र खुद्द शिवाजी महाराजांच्या हातातच द्यावे, आम्हाला शंका वाटते की त्यांचे कारभारी स्वतःच्या हवे तसे वाचून दाखवतील.
तात्पर्य शिवाजी महाराजांनी स्वतः पत्र वाचावे असे त्या इंग्रजांना वाटत होते. म्हणजे इंग्रजांना याची पूर्णपणे कल्पना होती की शिवाजी महाराजांना वाचता येते.
त्याचप्रमाणे राजापूरची वखारीची लुटीची नुकसान भरपाई मागण्यासाठी आलेल्या इंग्रजांच्या वकिलाला म्हणजे नारायण शेणवी याला लुटीच्या जन्नसांची नोंद असलेली वही स्वत: शिवाजी महाराज दाखवित होते. म्हणजे शिवाजी महाराज त्या वहीतील लिहलेल्या नोंदी शेणवीच्या निदर्शनात आणून देत होते. यावरून महाराजांना वाचता लिहता येत होते हे सहजच लक्षात येते.
आमचा History of Shivaji Maharaj 2021 हा लेख तुम्हाला कसा वाटला ते जरुर कळवा.
तुम्हाला जर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत माहिती घ्यायची असेल तर खालील लिंकद्वारे तुम्ही माहिती घेऊ शकता.
Sambhaji Maharaj history in marathi language 2021 | छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल माहिती
तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या वेबसाइट ला भेट देऊ शकता.
स्त्रोत : श्री. मेहंदळे यांचे श्री राजा शिवछत्रपती खंड 2