Ramsej Fort Information In Marathi 2021 | हा किल्ला जिंकायला मुघलांना तब्बल 5 वर्षे लागली

Ramsej Fort Information In Marathi 2021 | हा किल्ला जिंकायला मुघलांना तब्बल 5 वर्षे लागली

Ramsej Fort Information In Marathi 2021

              Ramsej Fort Information In Marathi 2021

छत्रपती संभाजी महाराज ( Ramsej Fort Information In Marathi 2021) यांच्या केवळ 9 वर्षांच्या कार्यकाळात मराठे आणि मुघल यांच्यात अनेक रोमहर्षक लढाया झाल्यात. छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj)यांच्या मृत्यूनंतर मुघल बादशहा औरंगजेब ( aurangjeb ) याने आपले सर्व लक्ष वेधले ते स्वराज्यकडे. आपली अफाट फौज घेऊन हा बादशहा औरंगजेब स्वतः स्वराज्यावर चालून आला. परंतु छत्रपती संभाजी महाराज (sambhaji maharaj history in marathi) यांनी त्याला आपल्या अखेरपर्यंत प्रखर लढा देत आपले नाव इतिहासात अजरामर केले. आजच्या या लेखात आपण बघू या औरंगजेबाच्या सैन्याशी लढा देत तब्बल 5 वर्षे मराठ्यांनी रामसेजचा (Ramsej Fort Information In Marathi 2021) किल्ला कसा लढविला.

Ramsej Fort Information In Marathi 2021

रामसेजचा किल्ला ( ramsej fort ) नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात आहे. दिंडोरीच्या दक्षिण दिशेला चार मैल अंतरावर हा किल्ला आहे.
1682 एप्रिल महिन्यात मध्ये औरंगजेब (aurangjeb) याने हा किल्ला जिंकण्यासाठी शहाबुद्दीन या मुघल सरदाराला नियुक्त केले.मुघलांनी रामसेजचा किल्ला जिंकण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती आपल्याला खाफिखान आणि भीमसेन सक्सेना यांच्या लेखनातून मिळते.भीमसेन सक्सेना आणि खाफिखान रामसेज किल्ल्याला दिलेल्या वेढ्याच्या वेळी तेथे उपस्थित होते.
खाफिखान याने लिहलेल्या वृत्तांतावरून मराठ्यांच्या इतिहासातील एक अभिमानास्पद आणि रोमहर्षक बाब समोर येते.

Ramsej Fort Information In Marathi 2021

शहाबुद्दीन याने 1682 ला रामसेज किल्ल्याला वेढा घातला. किल्ला जिंकण्यासाठी त्याने सुरुंग लावणे, मोर्चे बांधणी, दमदमे तयार करणे असे सर्व प्रयत्न केले. परंतु रामसेजच्या किल्लेदाराच्या पराक्रमाने मुघलांचे सगळे प्रयत्न अपयशी ठरले.
रामसेजच्या किल्ल्यात लोखंडी तोफा त्यावेळी नव्हत्या. परंतु मराठ्यांनी लाकडी तोफा बनवून त्यात कातडे भरून उडवीत होते. मुघलांच्या तुलनेत फार कमी शिबंदी किल्ल्यावर होती. शहाबुद्दीन याने पराक्रमाची शर्थ करूनही यश काही मिळत नव्हते. त्यामुळे मुघल बादशहा औरंगजेब याने खानजहान बहाद्दूर कोकलताश याला रामसेजच्या मोहिमेवर पाठविले. मुघल सैन्याने नव्या दमाने रामसेज वर हल्ले करायला सुरुवात केली. पण मुघलांना किल्ला मात्र जिंकता येत नव्हता.

See also  Vatican City Mahiti 2021| व्हॅटिकन सिटी जगातील सर्वात लहान देश

एके रात्री खानजहान याने किल्ला जिंकण्यासाठी एक योजना आखली. त्यानुसार त्याने आपले बरेचसे सैन्य आणि बाजार बुणगे किल्ल्याच्या एका बाजूने पाठविले. तेथील गडबड आणि जमाव पाहून मराठ्यांचे लक्ष तिकडे केंद्रित व्हावे. आणि याचा फायदा घेऊन किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूने निवडक शुर शिपाई पाठवून किल्ला जिंकून घ्यावा. अशी रणनीती त्याने आखली होती.

परंतु रामसेजचा किल्लेदार अत्यंत जागृत होता. त्याने रामसेजच्या इतर बाजूंची सुरक्षा काही कमी पडू दिली नाही. त्याने मुघलांनी जास्त सैन्य पाठविलेल्या बाजूने आपली तुकडी तर पाठविलीच शिवाय अत्यंत कडवे मराठे मुघलांच्या तुकडीच्या पाळतीवर ठेवले. नियोजित वेळी मुघल तुकडी किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूने वर येत होती. मराठ्यांनी मुघलांच्या ह्या तुकडीचा समाचार घेत खानजहानचा बेत सपसेल अयशस्वी केला.

औरंगजेबाचे नावाजलेले सरदार रामसेजच्या वेढ्यामध्ये गुंतलेले होते. शहाबुद्दीन खान आणि खानजहान बहाद्दूर यांच्याव्यतिरिक्त कासिमखान, मुहंमद खलील, शुभकरण बुंदेले इत्यादी पराक्रमी सरदार हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न करत होते. पण मुघलांना यश मात्र येत नव्हते.

खानजहान याने तर कमालच केली. रामसेजच्या विजयासाठी त्याने जादू – टोण्याचा अवलंब केला. शंभर तोळे वजनाच्या सोन्याच्या नाग बनवून भूतांना वश करून किल्ला जिंकून देण्याचा दावा करणाऱ्या मंत्रिकाला त्याने पाठविले. मात्र किल्ल्यावरून आलेल्या गोफणीच्या दगडाने खानजहानचा हा प्रयत्न देखील अयशस्वी झाला.

रामसेजच्या किल्ल्याला जवळच्याच त्रिंबक गडावरून मदत होत होती. केशव त्रिमल हा किल्लेदार त्रिंबक गडावरून रामसेज किल्ल्याला दारूगोळा आणि इतर साहित्य पुरवीत होता.
छत्रपती संभाजी महाराज देखील रामसेजच्या किल्ल्याला मदत जमेल तशी मदत करतच होते. त्यांनी रुपाजी भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांची तुकडी रामसेजच्या मदतीसाठी पाठविली होती.
मराठ्यांच्या आणि मुघलांच्या अनेक चकमकी रामसेजच्या परिसरात झाल्या. मात्र मुघलांना रामसेजच्या किल्ल्याला मात्र जिंकता आले नाही.

रामसेजच्या किल्ल्याला 1682 पासून मुघलांनी वेढा दिला होता. परंतु त्यांना 1684 पर्यंतही किल्ला जिंकता आला नव्हता. मुघलांना हा किल्ला शेवटपर्यंत जिंकताच आला नाही. 1687 ला मुघलांनी रामसेजच्या नव्याने आलेल्या किल्लेदारास आमिष दाखवून हा किल्ला मिळविला.

See also  संत सावता माळी | sant savata mali information in marathi 2021

दरम्यानच्या काळात छत्रपती संभाजी महाराजांनी रामसेजच्या किल्लेदाराने मुघलांचा यशस्वीपणे प्रतिकार करून किल्ला राखला म्हणून यथोचित सन्मान केला आणि त्यास दुसऱ्या महत्त्वाच्या किल्ल्याची किल्लेदारी दिली. दुर्दैवाने या किल्लेदाराच्या नाव इतिहासाला माहीत नाही. नव्याने आलेल्या किल्लेदाराने मात्र फितुरी करून हा किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला अशी माहिती ईश्र्वरदास नागर याच्या लेखनातून मिळते.

तात्पर्य छत्रपती संभाजी महाराज ( chhatrapati sambhaji maharaj) आणि मुघल (mughal) यांच्यात त्याकाळात बरेच रोमहर्षक लढाया झाल्या. औरंगजेब सर्व सामर्थ्यानिशी स्वराज्यावर चालून आला आणि प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती संभाजी महाराज त्याला प्रतिकार करीत होते.

आमचा Ramsej Fort Information In Marathi 2021 हा लेख तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा.                            जय भवानी.

लाल महालावर छापा टाकून शाइस्तेखानास कशी अद्दल घडविली याबाबत तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून जाणून घेऊ शकता.

शिवाजी महाराजांचा शाईस्तेखानावरील हल्ला Full माहिती 2021 | Shaista Khan And Shivaji Maharaj

तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या website ला देखील भेट देऊ शकता.

Spread the love

1 thought on “Ramsej Fort Information In Marathi 2021 | हा किल्ला जिंकायला मुघलांना तब्बल 5 वर्षे लागली”

Leave a Comment