छत्रपती संभाजी महाराज आणि शहजादा अकबर | chhatrapati Sambhaji maharaj and Akbar 2021

छत्रपती संभाजी महाराज आणि शहजादा अकबर | chhatrapati Sambhaji maharaj and Akbar 2021

 chhatrapati Sambhaji Maharaj and akbar 2021
Sambhaji Maharaj history in marathi  2021

छञपती संभाजी महाराज ( Sambhaji Maharaj History In Marathi) यांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही कालावधीतच मुघल बादशहा औरंगजेब याचा पुत्र शहजादा अकबर याने आपल्या वडिलांच्या विरोधात बंड पुकारले. हा बंडखोर शहजादा chhatrapati Sambhaji maharaj and Akbar 2021

शहजादा अकबर याचे बंड :

मुघल बादशहा औरंगजेब याने शहजादा अकबर याला 4 मार्च 1680 ला राजस्थानमधील बंड मोडून काढण्यासाठी शहजादा शाहआलम आणि शहजादा आजमशहा यांच्यासोबत पाठविले. त्यात शहजादा अकबर याला चितोडची बाजू सांभाळायला दिली. परंतु अकबराला यात अपयश आले. यातूनच बादशहा औरंगजेब आणि शहजादा अकबर यांच्यात वाद निर्माण झाले. बादशाह औरंगजेब याने रागावल्याने अकबर याने राजपूत राजांशी गुप्त बोलणी सुरू केली.

दुर्गादास राठोड आणि राजा रामसिंग यांच्या मदतीने अकबराने बादशहा औरंगजेब याच्या विरोधात बंड पुकारले. 11 जानेवारी 1681 ला स्वतःस बादशहा घोषीत केले. औरंगजेब याला हे समजताच त्याने अकबराशी पत्रव्यवहार करून त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण अकबराने बादशहा औरंगजेब याचे काही ऐकले नाही. तेव्हा औरंगजेब याने कुटनितीचा वापर करून राजपूत राजें आणि अकबर यांच्यात फूट पाडली. त्यामुळे अकबर पेचात सापडला. त्याला केवळ दुर्गादास राठोड याची साथ होती. त्याच्याच सल्ल्याने अकबर छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे आला.

छत्रपती संभाजी महाराज आणि शहजादा अकबर यांची भेट : chhatrapati Sambhaji maharaj and Akbar 2021

राजपूत राजांशी युती तुटल्याने औरंगजेबाचा प्रबळ शत्रू असलेले छत्रपती संभाजी महाराज हेच आशेचे किरण अकबर आणि दुर्गादास राठोड यांना वाटले. अकबराने संभाजी महाराजांना आपण आश्रयास येत असल्याबद्दल ची दोन पत्रे पाठविली. संभाजी महाराजांनी अकबराच्या दोन्ही पत्रांची उत्तरे दिली नाहीत. परंतु अकबराला संभाजी महाराजांना भेटण्याची खूप घाई होती. कारण औरंगजेबाने अकबराला पकडण्यासाठी आपले सैन्य पाठविले होते. त्यामुळे अकबराने संभाजी महाराजांच्या पत्रांची वाट न बघता आपला प्रवास करत राहिला.

See also  माधवराव पेशवा विषयी माहिती 2021 | Full Madhavrao Peshwa History In Marathi

अकबर जेव्हा स्वराज्यात दाखल झाला तेव्हा संभाजी महाराजांनी आपले काही लोक पाठवून त्याची व्यवस्था पाली जवळील सुधागड येथे केली. त्यानंतर 1681 च्या जून महिन्यात संभाजी महाराजांनी हिरोजी फर्जंद याला अकबराची भेट घेण्यास पाठविले. स्वतः मात्र त्याची भेट घेतली नाही.

कारण औरंगजेबाने अकबरामार्फत कुटील डाव पण रचला असल्याची शंका संभाजी महाराजांना होती. राजे सावध होते. एका ऐकी शत्रूच्या मुलावर विश्वास ठेवणे कठीण होते आणि ते योग्यही होते. परिस्थितीच अशी होती की कोणावर विश्वास ठेवावा? संभाजी महाराजांच्या विरोधात अंतर्गत कट कारस्थान रचले जात होते. त्यातच भर अशी पडली की संभाजी महाराजांच्या वर विषप्रयोगचा कट केला गेला. त्यानंतर लगेच गडावरील अण्णाजी दत्तो, हिरोजी फर्जंद, सोमाजी दत्तो आणि इतर काही मंडळीनी अकबराशी संधान बांधून संभाजी महाराजांच्या विरोधात मदत करण्यासाठी अकबराला पत्र पाठवले.

अकबराने दुर्गादास राठोडच्या सल्ल्यानुसार ते पत्र संभाजी महाराजांना दिले. त्यामुळे संभाजी महाराजांनी अपराध्यांना कडक शिक्षा सुनावली. आणि त्यांचा अकबरावर विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी 13 नोव्हेंबर 1681 ला सुधागड येथे अकबराची भेट घेतली.

छत्रपती संभाजी महाराज आणि शहजादा अकबर वितृष्ट :

जेव्हा अकबर मराठी मुलुखात आला तेव्हा संभाजी महाराजांनी त्याची यथायोग्य व्यवस्था केली होती. त्याच्या सुरक्षेची तसेच खर्चाची व्यवस्था केली होती. त्याला भेटीदाखल एक पोवळ्याची माळ आणि काही किंमती वस्तू दिल्या होत्या. मात्र अकबराने त्या वस्तू एका गायिकेला दिल्या. ही बाब संभाजी महाराजांना माहित पडल्यावर त्यांनी अकबराला जाब विचारला. त्यावर अकबराने, ” आम्ही शहजादे आहो, मनात येईल ते करू ” असे उद्धट उत्तर दिले. त्यावर संभाजी महाराजांनी त्याची सुरक्षा काढून घेतली तसेच त्याला दिल्या जाणाऱ्या खर्चाची व्यवस्था बंद केली. परंतु अकबरावर लक्ष मात्र ठेवून होते. अकबराला उत्तरेत पाठविण्याचा प्रयत्न राजे करीत होते.

अकबर काही काळ पोर्तुगिजांच्या मुलुखात गोव्यात होता. तेथून त्याने मक्केला जाण्याचा प्रयत्न केला. इराणच्या शाहसोबत त्याने संपर्क साधला होता. शेवटी 1687 मध्ये त्याने दोन जहाजे विकत घेऊन राजापूर येथून तो इराण ला गेला. तिकडेच तो 1704 ला मरण पावला.

See also  History of Shivaji Maharaj 2021 | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षरतेवर शंका घेणारे ग्रँट डफ आणि सर जदुनाथ सरकार यांचा चुकीचा दावा

chhatrapati Sambhaji maharaj and Akbar

छत्रपती संभाजी महाराज आणि शहजादा अकबर यांच्या भेटीचे महत्त्व :

छत्रपती संभाजी महाराज यांनी अकबराचा पूर्ण फायदा घेतला नाही असे काही इतिहासकार म्हणतात. पण त्यात सत्यता नाही. स्वतः अकबर कर्तृत्ववान नव्हता. त्याचे सोबत काही जास्त सैन्य आणि खजिनाही नव्हता. त्याला मुघळाशाहीतील सरदारांचा पाठिंबाही नव्हता. ज्या राजपूत राजांशी त्याचे संबंध होते तेही दुरावले. केवळ दुर्गादास राठोड हा त्याच्या सोबत होता.

तरीदेखील संभाजी महाराजांनी राजा रामसिंग याच्याशी पत्रव्यवहार करून तेथे बंड करून अकबराला बादशहा बनविण्याचे म्हटले होते. पण राजा रामसिंग याने पुढाकार घेतला नाही.

अकबराच्या रूपाने स्वराज्यावर मात्र संकट आले. अकबराला पकडण्यासाठी आणि संभाजी महाराजांसोबत त्याची युती होऊ नये म्हणुन औरंगजेब दक्षिणेत आला. त्याने राजस्थानातील युद्ध आटोपशिर घेतले, तह केला आणि सर्व सामर्थ्यानिशी स्वराज्यावर चालून आला. त्याचे फार मोठे परिणाम भोगावे लागले. अन्यथा इतिहास फार वेगळा असता.

तुम्हाला आमचा chhatrapati Sambhaji maharaj and Akbar 2021 हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा.

तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या वेबसाईट ला ही भेट देऊ शकता.

तुम्हाला जर बाजीप्रभू देशपांडे यांचा पावनखिंडीतील पराक्रम याबाबत माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील लिंकवर क्लिक करून वाचा.

बाजीप्रभू देशपांडे यांची पावनखिंडीतील झुंज माहिती 2021 | Baji Prabhu Deshpande Pavankhind Full Information In Hindi

Spread the love

2 thoughts on “छत्रपती संभाजी महाराज आणि शहजादा अकबर | chhatrapati Sambhaji maharaj and Akbar 2021”

Leave a Comment