Information About Commonwealth Of Nations 2021 | राष्ट्रकुलबाबत माहिती

Information About Commonwealth Of Nations 2021 | राष्ट्रकुलबाबत माहिती

Information About  Commonwealth Of Nations 2021

एक काळ असा होता की, ब्रिटिशांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नसे. तात्पर्य ब्रिटिश साम्राज्य खूप विशाल होते. कालांतराने ब्रिटिश साम्राज्याचा अस्त होण्यास सुरुवात झाली. ब्रिटिश साम्राज्याचा भाग असलेले जे राष्ट्र कालांतराने स्वतंत्र झाले, त्या राष्ट्रांची एक आंतरराष्ट्रीय संघटना तयार करण्यात आली. त्या आंतरराष्ट्रीय संघटनेलाच राष्ट्रकुल Commonwealth Of Nations असे म्हणतात. आजच्या या लेखात आपण Information About Commonwealth Of Nations 2021 म्हणजेच राष्ट्रकुलबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

राष्ट्रकुलची स्थापना : Establishment Of Commonwealth Nations

राष्ट्र्कुलचे वर्णन ‘Family of Nations’ असे केले जाते. विकास,लोकशाही आणि शांतता हे राष्ट्र्कुलचे ध्येय आहे. या संघटनेचे मूलभूत तत्व स्वयंस्फूर्त सहकार्य हे आहे.

1887 पासुन ब्रिटन आणि ब्रिटिश साम्राज्यात असलेली स्वायत्त राष्ट्रे Conferences मध्ये एकत्र येऊ लागली होती.   कॅनडा, ऑस्ट्रेलिया,न्युझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या राष्ट्रांना 1917 मध्ये ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वायत्त राज्यांचा दर्जा ब्रिटनकडून मिळाला. त्यानंतर 1931 मध्ये ब्रिटनने आपल्या सर्व वसाहतींना क्रमाक्रमाने स्वायत्तता देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये,  ‘स्टॅच्युट ऑफ वेस्टमिन्स्टर’ हा कायदा केला. या कायद्यानुसार Commonwealth Of Nations म्हणजेच राष्ट्रकुल या संघटनेस मान्यता देण्यात आली. 1949 च्या लंडन येथील Commonwealth Of Nations च्या प्रधान मंत्र्यांची बैठक झाली. तेव्हा आधुनिक राष्ट्रकुलाचा जन्म झाला.

राष्ट्रकुलच्या प्रमुखपदी प्रथेनुसार ब्रिटिश राजा किंवा राणी असते. राष्ट्रकुलचे स्वतंत्र सचिवालय लंडनमध्ये स्थापन करण्यात आले आहे. The Commonwealth Secretariat ची स्थापना 1965 ला झाली.

राष्ट्रकुल मुळेच दुसरे महायुध्द संपल्यानंतर आशिया आणि आफ्रिका खंडातील बऱ्याच राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळण्यास काही प्रमाणात का होईना मदत झाली.
राष्ट्रकुलमध्ये जवळपास 54 सभासद राष्ट्रे आहेत.

राष्ट्रकुल आणि भारत : Commonwealth And India

भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही राष्ट्रकुलचा सभासद राहिला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1948 ला जयपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेस च्या अधिवेशनात भारत राष्ट्रकुलमध्ये कायम राहण्याचा निर्णय घेतला.

See also  World's Longest Pedestrian Suspension Sky bridge 721 | 2365 फुट लांबीचा स्काय ब्रिज

भारताने राष्ट्रकुलमध्ये कायम राहण्याचा निर्णय घेतला त्यामागे व्यापक स्वरूपात भारताचे हित साधले जाणार होते. भारत नुकताच स्वतंत्र झाला होता. भारताला युद्ध साहित्य ब्रिटनकडून मिळत होते. भारताने निर्यात केलेल्या मालास ब्रिटिश बाजारपेठेत जकात सवलत मिळत होती. त्याचप्रमाणे नव्याने शत्रू निर्माण झालेला पाकिस्तानच्या विरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर राष्ट्रकुलच्या रूपाने व्यासपीठ मिळणार होते. नुकतेच जग दोन गटात विभागले गेले होते. शीतयुद्धाच्या त्या काळात भारत तटस्थ राहिला होता. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर राष्ट्रकुलच्या माध्यमातून भारत आपले हित साधण्याचा प्रयत्न करणार होता. या सर्व बाबींमुळे भारत राष्ट्रकुल मध्ये कायम राहिला.

राष्ट्रकुलच्या सभासद राष्ट्रांमध्ये Commonwealth Games ही होतात. भारत या राष्ट्रकुल स्पर्धामध्ये सहभागी होत असतो. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची कल्पना रेव्हरंड कूपर यांनी मांडली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी ब्रिटिश साम्राज्यामध्ये ऑलिम्पिकच्या धर्तीवर  ‘ब्रिटिश एम्पायर गेम्स’ होत असत. 1950 पासून या खेळांना commonwealth games म्हणजेच राष्ट्रकुल क्रीडा सामने म्हटल्या जाऊ लागले. 1911 मध्ये पाचवा जॉर्जच्या राज्यारोहण प्रसंगी क्रिस्टल पॅलेस येथे या सामन्यांना सुरुवात झाली.

Information About  Commonwealth Of Nations 2021
1986 च्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतासह एकूण 32 देशांनी बहिष्कार टाकला. यामागे कारण होते ब्रिटनने दक्षिण आफ्रिका संबंधीचे वर्णद्वेषी धोरण.
भारत राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्ती, भारोत्तलन, नेमबाजी या क्षेत्रात चांगली कामगिरी बजाविली आहे. अलीकडे भारतात इतर खेळांकडे ही लक्ष दिल्या जात आहे. त्यामुळे भारताची कामगिरी राष्ट्रकुल स्पर्धेत सुधारत आहे.
आमचा हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा.

तुम्हाला जर 1983 च्या world cup फायनल विषयी वाचायचे असेल तर खालील लिंकवर जाऊन तुम्ही वाचू शकता.

१९८३ चे वर्ल्ड कप फायनल – इंडिया vs वेस्ट इंडिज | 1983 World Cup Final In Marathi

तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या वेबसाइटला ही भेट देऊ शकता.

Spread the love

Leave a Comment