१९८३ चे वर्ल्ड कप फायनल – इंडिया vs वेस्ट इंडिज | 1983 World Cup Final In Marathi

1983 world cup final in marathi | इंडिया vs वेस्ट इंडिज१९८३ चे वर्ल्ड कप फायनल - इंडिया vs वेस्ट इंडिज | 1983 World Cup Final In Marathi

 

भारतात क्रिकेट हा सर्वात प्रिय खेळ आहे. भारताची मॅच म्हटले की हातचे काम सोडून सामना बघणारे लोक आपल्याकडे सापडतात. भारत – पाकिस्तान मॅच म्हटली तर काही सांगावे लागत नाही. असल्या या क्रिकेटवेड्या देशाने एकदिवसीय क्रिकेट मध्ये दोनदा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. कपिल देव च्या नेतृत्वाखाली १९८३ ला तर २०११ ला महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारत वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. आजच्या या लेखात आपण कपिल देवच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या १९८३ च्या प्रुडेंशि यल वर्ल्ड कप  फायनलची म्हणजेच 1983 World Cup Final In Marathi माहिती घेऊ या.

भारताची टीम –

वर्ल्ड कप साठी भारताची टीम पुढीलप्रमाणे होती.
कपिल देव ( कर्णधार ), सुनील गावसकर, मदनलाल, मोहिंदर अमरनाथ (उपकर्णधार), दिलीप वेंगसरकर, कृष्णाम्माचारी श्रीकांत, रवी शास्त्री, संदीप पाटील, रॉजर बिन्नी, कीर्ती आझाद,सैय्यद किरमानी, बलविंदर संधू, यशपाल शर्मा आणि सुनील वाल्सन. ही भारताची टीम  होती.

भारताचा अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास –

भारताला विजेतेपदाचा दावेदार कोणीच मानत नव्हते. क्रिकेटचे चाहते, विश्लेषक, समालोचक आणि सट्टेबाज हे सर्व वेस्ट इंडिजच्या बाजूने बोलत होते. भारत – वेस्ट इंडिज असा अंतिम सामना हा रटाळ होईल. वेस्ट इंडिज आरामशीर तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकेल. अंतिम सामन्यात भारता ऐवजी निदान इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया तरी पाहिजे होता. अशी विधाने सर्वत्र ऐकू येऊ लागली होती. खरोखरच वेस्ट इंडिज च्या तुलनेत भारतीय टीम कमजोर होती. आता आपण भारताचा अंतिम सामन्यात पर्यंतचा प्रवास बघू या.

साखळी फेरीत भारताचा पहिला सामना वेस्ट इंडिज सोबत झाला. ही मॅच ९ जून१९८३ ला झाली.या मॅच मध्ये भारताने वेस्ट इंडिजला चकावत 34 धावांनी हरविले.१९७५ च्या वर्ल्ड कप पासून वेस्ट इंडिजचा वर्ल्ड कप मध्ये एकाही मॅचमध्ये पराभव झाला नव्हता. भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करीत वेस्ट इंडिजसह सर्वांना चकित केले.
भारताचा पुढील सामना होता नवाख्या झिम्बाब्वे यांच्यात. हा सामना ११ जून१९८३ ला झाला. या सामन्यात ५ विकेट आणि १३५ बॉल्स शिल्लक ठेवून झिम्बाब्वेला हरविले.

भारताची गाठ १३ जूनला पुढील मॅचमध्ये पडली ती बलाढ्य ऑस्ट्रेलिया सोबत. ही मॅच ऑस्ट्रेलियाने १६२ धावांनी जिंकली.
पुढील मॅच मध्येही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. १५ जूनला वेस्ट इंडिजने भारताचा पराभव करून मागील मॅच मधील पराभवाचा वचपा काढला.या मॅच मध्ये वेस्ट इंडिजने भारताचा६६ धावांनी पराभव केला.

या सलग दोन परभवा मूळे निश्चितच भारताचे मनोबल खचलेले होते. कारण डंकन फ्लेचरच्या नेतृत्वाखालील नवख्या झिम्बाब्वेने भारताची १७/५ अशी केली होती. लंचच्या अगोदरच मॅच संपेल असे सर्वांना वाटले. परंतु भारताचा कॅप्टन कपिल देवने वर्ल्ड रेकॉर्ड करीत ही मॅच जिंकून दिली. या मॅच मध्ये कपिल देवने १७५ धावा काढून भारताचा स्कोअर
२६६ पर्यंत नेला. झिम्बाब्वेला हे आव्हान पेलले नाही. झिम्बाब्वेची टीम २३५ वर ऑल आऊट झाली. दुर्भाग्याची बाब अशी की या मॅच चे व्हिडिओ रेकॉर्डिंग झाले नाही. आज आपण कपिल देवची ही महान खेळी पाहू शकत नाही.

See also  History Of Gateway Of India 2021| गेट वे ऑफ इंडियाचा इतिहास

भारताचा पुढील सामना होता पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया सोबत २० जून ला. या मॅचमध्ये मात्र भारताने ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव करून मागील मॅचमधील पराभवाचा वचपा काढला. भारताने ही मॅच ११८ धावांनी जिंकली आणि सेमीफायनलमध्ये धडाक्यात प्रवेश केला. आता भारताला इंग्लंड सोबत सेमीफायनल मध्ये झुंजायचे होते.

पहिल्या सेमीफायनल मध्ये इंग्लंडने ६० ओव्हर मध्ये २१३ धावा काढल्या. इंग्लंड कडून ग्रमी फ्लॉवर ने सर्वाधिक ३३ धावा काढल्या. तर भारताकडून सर्वात जास्त ३ विकेट कपिल देवने घेतल्या. धावांचा पाठलाग करताना भारताकडून सर्वात जास्त ६१ धावा
यशपाल शर्मा याने काढल्या. संदीप पाटीलने ही ५१ धावांचे योगदान दिले. भारताने ही मॅच ३२ बॉल्स शिल्लक ठेवून जिंकली आणि सर्वांना चकित करीत वर्ल्ड कपच्या फायनल म्हणजेच 1983 World Cup Final In Marathi  मध्ये प्रवेश केला.

वर्ल्ड कप फायनल मॅच – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज | 1983 World Cup Final In Marathi

फायनल मध्ये भारताची टीम एलेवन पुढीलप्रमाणे होती.
कपिल देव,सुनील गावसकर, मदनलाल, मोहिंदर अमरनाथ, कृष्णा म्माचारी श्रीकांत,सय्यद किरमनी,कीर्ती आझाद, संदीप पाटील, बिन्नी आणि बलविंदर संधू.

तर वेस्ट इंडिजची टीम एलेवन पुढीलप्रमाणे होती.
क्लाइव्ह लॉइड ( कॅप्टन), डेस्मंड हेन्स, विव्ह रिचर्ड्स, गार्डन ग्रिनिज, लैरी गोम्स, फौद बाकस, जेफ डूजॉन, मायकल होल्डींग, अँडी रॉबर्ट्स, जोएल गार्नर,मल्कॅम् मार्शल.१९८३ चे वर्ल्ड कप फायनल - इंडिया vs वेस्ट इंडिज | 1983 World Cup Final In Marathi

२५ जून १९८३ इंग्लंडमधील जगप्रसिध्द आणि क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर ही वर्ल्ड कपची फायनल मॅच झाली. वेस्ट इंडिज सलग तिसऱ्यांदा तर भारत पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल खेळणार होते. कोणतीही आशियाई देश पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल मध्ये पोचला होता. प्रश्न एवढाच बाकी होता वेस्ट इंडिज वर्ल्ड कप जिंकण्याची हॅट्रिक करेल की पहिल्यांदाच कोणताही आशियाई देश वर्ल्ड कप जिंकेल.
टॉस हरल्यावर भारताला पहिल्यांदा बॅटिंग करायची होती. वेस्ट इंडिजच्यां टीममध्ये एकापेक्षा एक मातब्बर बॉलर्स होते. टीम इंडियाची अग्नीपरिक्षा होणार होती.

See also  World Red Cross Day Information In Marathi 2021 | आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस सोसायटीबद्दल माहिती

ओपनिंग ला श्रीकांत आणि सुनील गावसकर उतरले. हा पूर्ण वर्ल्ड कप गावसकर साठी फारसा चांगला गेला नाही. गावसकरने फक्त दोन रन काढले. त्यानंतर आलेल्या मोहिंदर अमरनाथ सोबत श्रीकांतने भारताचा स्कोअर ५० च्या पुढे नेला. परंतु मार्शल ने लगेच श्रीकांतला lbw केले.अमरनाथ ने आऊट होण्यापूर्वी २६ रन काढले.
अमरनाथ आऊट झाल्यावर आलेल्या यशपाल शर्माला केवळ ११ रन काढता आले. त्यानंतर आलेल्या संदीप पाटील ने वेगवान खेळी करीत २९ बॉलामध्ये २७ रन काढले. गार्नर च्यासा बोलींगवर गोम्स ने त्याची कॅच पकडली. कपिल देव यावेळी चांगली खेळी करू शकला नाही. ८ बॉल्स मध्ये वेगवान १५ रन काढून कपिल देव आऊट झाला.

कपिल देव नंतर आलेल्या कीर्ती आझाद ने भोपळाही फोडला नाही. त्याला आल्या पावलीच परत जावे लागले. रॉजर बिन्नी सुध्दा २ रन काढून माघारी परतला. मदनलाल ने मात्र संदीप पाटीलला साथ देत टीम इंडियाचा स्कोअर १५३ पर्यंत नेला. परंतु संदीप पाटील गार्नर च्या बोलिंग वर गोम्स कडे कॅच देऊन माघारी परतला. संदीप पाटील ने आऊट होण्यापूर्वी २७ धावांचे योगदान दिले. मदनलाल ने १७ तर सय्यद किरमानी ने १४ रन काढले. बलविंदर संधू ने अखेरपर्यंत नॉट आऊट राहत ११ रन चे योगदान दिले. भारताने एकूण ५४.४ ओव्हर मध्ये सर्वबाद १८३ रन काढले.

आता वेस्ट इंडीजला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी ६० ओव्हर मध्ये १८४ रन काढणे आवश्यक होते.
वेस्ट इंडिज साठी १८४ चे टार्गेट काहीच कठीण नव्हते. एकापेक्षा एक आक्रमक हिटर या टीम मध्ये होते. पण कोणाला माहीत होते की कपिल देव ची टीम इतिहास घडवेल म्हणून !

गार्डन ग्रिनिज आणि डेस्मंड हेन्स ओपनिंग ला उतरले. वेस्ट इंडिज चे ५ रन झाले आणि गार्डन ग्रिनिजला संधूने बोल्ड केले.वेस्ट इंडिज चा महान बॅट्समॅन वीव्ह रिचर्ड्स आता बॅटिंग ला आला. हेन्स सोबत रिचर्ड्स ने टीम ची टोटल ५० पर्यंत नेली. ही जोडी आता आरामात वेस्ट इंडिज ला वर्ल्ड कप जिंकून देईल असे वाटायला लागले. नेमके त्याच वेळी कपिलने मदनलाल ला बोलिंग ला आणले. पण मदनलाल ने हेन्सला आऊट केले. रॉजर बिन्नी ने हेन्स ची कॅच पकडली. हेन्स ने १३ रन काढले. त्यानंतर लगेच मदनलालच्या एका बॉलवर रिचर्ड्स ने शॉट मारला.

हा उंच गेलेला शॉट कपिल देव ने काही यार्ड मागे जात पकडला. सर्व स्टेडियम अचंबित झाले. विव्ह रिचर्ड्स आऊट. वेस्ट इंडिज ५७/३. वेस्ट इंडिजला हा झटका बसते ना बसते तोच मदनलालने गोम्सला गावसकर च्या हाती कॅच द्यायला भाग पाडले. आता वेस्ट इंडिज ६६/४.
आणि लगेच वेस्ट इंडिज ६६/५. वेस्ट इंडिज चा कॅप्टन सर क्लाइव्ह लॉइड आऊट झाला. बिन्नीच्या बोलिंग वर कपिल देव ने लॉईड ची कॅच घेतली. स्टेडियम मध्ये सर्व वेस्ट इंडिज चे समर्थक चिंतातुर झाले. आणि टीम इंडियाच्या समर्थकांनी स्टेडियम डोक्यावर घेतले. भारताने अर्धी टीम माघारी धाडली होती.

See also  महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा इतिहास 2021 | Maharashtra Rajyachi Nirmiti Full Information In Marathi

त्यानंतर वेस्ट इंडिज चा स्कोअर १० ने वाढला आणि बॅक्चस संधू च्या बोलिंग वर किरमानी कडे कॅच देऊन आऊट झाला. त्यानंतर मात्र ड्यूजॉन आणि मार्शल यांनी टीम इंडियाची चिंता वाढविली. या दोघांनी वेस्ट इंडिज ची पडझड थांबविली. भारताचा मारा समर्थपणे रोखण्याचा प्रयत्न केला. वेस्ट इंडिज मॅच जिंकू शकले असे वाटायला लागले. परंतु वेस्ट इंडिजचा स्कोअर ११९ असताना अमरनाथने ड्यूजॉन क्लीन बोल्ड केले आणि टीम इंडियाची मॅच मध्ये वापसी झाली. टीम च्या स्कोअर मध्ये ५ रन ची भर टाकत मार्शल ही आऊट झाला. त्याला अमरनाथ ने गावसकर च्या हाती कॅच द्यायला भाग पाडले. आता वेस्ट इंडिज चा स्कोअर होता १२४/ ८. टीम इंडियाचा पहिला वर्ल्ड कप फक्त २ विकेट दूर होता.तेवढ्यातच इंडियन कॅप्टन कपिल देवने

सर अँडी रॉबर्ट्सला आऊट केले. वेस्ट इंडिज
१२६/९. शेवटची विकेट बाकी होती. होल्डींग आणि गार्नर खेळत होते. या दोघांनी वेस्ट इंडिज चा स्कोअर १४० पर्यंत नेला आणि अमरनाथ ने होल्डींग ला आऊट केले. वेस्ट इंडिज ऑल आऊट. दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिज १४० वर ऑल आऊट झाला. टीम इंडिया पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियन झाली. इतिहास घडला. ज्या टीमला कोणीच गृहीत धरले नव्हते ती टीम वर्ल्ड चॅम्पियन झाली.
मोहिंदर अमरनाथ या मॅच मध्ये ‘ man of the match ‘ झाला. लॉर्ड्स वर कपिल देव ने मोठ्या अभिमानाने वर्ल्ड कप उचलला. येथून टीम इंडियाचा दबदबा निर्माण झाला.

आपण ह्या पोस्ट मध्ये १९८३ चे वर्ल्ड कप फायनल बद्दल माहिती घेतली . तुम्हाला जर Mahatma Gandhi Information In Marathi बद्दल माहिती जाणून घायची असेल तर तुम्ही हि पोस्ट वाचू शकता .

आरोग्या बद्दल मराठीत अजून जाणून घेण्यासाठी योगा टिप्स वेबसाईट ला भेट दया .

Spread the love

2 thoughts on “१९८३ चे वर्ल्ड कप फायनल – इंडिया vs वेस्ट इंडिज | 1983 World Cup Final In Marathi”

Leave a Comment