Maharani Tarabai Information In Marathi २०२१ | महाराणी ताराबाई यांच्या बद्दल माहिती

Maharani Tarabai Information In Marathi २०२१|रणरागिनी महाराणी ताराबाई यांच्या बद्दल माहिती

दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी|

ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली|

रामराणी भद्रकाली | रणरंगी क्रुद्ध झाली |

प्रलयाची वेळ आली | मुघल हो सांभाळ ||

असे कवी गोविंद यांनी महाराणी ताराबाई (Maharani Tarabai Information In Marathi २०२१) यांच्या पराक्रमाचे वर्णन केले आहे.

Maharani Tarabai Information In Marathi २०२१
source : en.wikipedia.org

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर युवराज संभाजी राजे हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनले. त्यांनी अतिक्षय प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचे रक्षण करीत स्वराज्यावर चालून आलेल्या औरंगजेबाला तोंड दिले. परंतु  दुर्दैवाने १६८९ मध्ये छत्रपती संभाजी राजे मुघलांकडून पकडल्या गेले. अनन्वित छळ सहन करीत त्यांनी आपला स्वाभिमान जपत हौतात्म्य स्वीकारले परंतु शरण गेले नाहीत.

छत्रपती संभाजी राजे यांच्या निधनानंतर राजाराम हे स्वराज्याचे तिसरे छत्रपती बनले. छत्रपती राजाराम यांनीही मुघलांना यशस्वीपणे तोंड दिले. परंतु त्यांचेही मार्च १७०० मध्ये निधन झाले. त्यामुळे स्वराज्यावर खुप मोठा आघात झाला. मुघलांचा जोर वाढला. बरेच स्वकीय मुघलांना सामील झाले होते. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महाराणी ताराबाई (जन्म – १६७५ मृत्यु १७६१) यांनी स्वराज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळली. औरंगजेब मरण पावला पण त्याला शेवटपर्यंत स्वराज्य जिंकता आले नाही.

महाराणी ताराबाई आणि मुघल संघर्ष :

महाराणी ताराबाई ह्या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव महिते यांची मुलगी होती. त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्या द्वितीय पत्नी होत्या. त्यांचे लग्न छत्रपती राजाराम यांच्यासोबत १६८० ला झाले. छत्रपती राजाराम जिंजीला असतांना रामचंद्रपंत अमात्य यांच्या सहाय्याने स्वराज्याचे रक्षण केले. त्यानंतर त्या जिंजीला गेल्या. तेथे त्यांना ९ जून १६९६ ला पुत्र ( शिवाजी द्वितीय) झाला. छत्रपती राजाराम यांच्या निधनानंतर त्यांनी आपला पुत्र शिवाजी द्वितीय यांना गादीवर बसविले आणि  स्वराज्याची सूत्रे महाराणी ताराबाई यांनी आपल्या हाती घेतली. त्यांनी खंबीरपणे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुघलांवर पलटवार करण्यास सुरुवात केली. महाराणी ताराबाई यांनी संताजी घोरपडे , धनाजी जाधव अशा रणधुरंदर योद्ध्यांना हाताशी धरून औरंगजेबाशी यशस्वीपणे लढा दिला.

See also  Vatican City Mahiti 2021| व्हॅटिकन सिटी जगातील सर्वात लहान देश

औरंगजेब मराठ्यांचे हिंदवी स्वराज्य नष्ट करण्याच्या उद्देशाने दख्खनमध्ये चालून आला होता. तो स्वत: मरण पावला परंतु त्याला हिंदवी स्वराज्य नष्ट करता आले नाही. अगोदर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यानंतर छत्रपती राजाराम यांनी औरंगजेबाला टक्कर दिली. या दोन्ही छत्रपतिंच्या मृत्यनंतर औरंगजेबाला वाटले की स्वराज्य आता त्याच्या मुठीत आले. परंतु महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. छत्रपती राजाराम यांच्या मृत्युनंतर जवळपास सात वर्षे महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाशी संघर्ष केला आणि स्वराज्याचे रक्षण करून मराठा साम्राज्याचा पाया घातला.

महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू : maharani-tarabai-information-in-marathi-२०२१

छत्रपती शाहू आणि  महाराणी ताराबाई यांच्यात वारसा हक्कावरून गृहकलहास सुरुवात झाली. औरंगजेबाच्या मृत्युनंतर मुघलांनी स्वराज्यात वारसा हक्काबाबत वाद व्हावे म्हणुन कैदेत असलेल्या शाहुंना मुक्त केले. मुघलांचा डाव यशस्वी झाला. महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू यांच्या वाद सुरु झाला.

१२ ऑक्टोबर १७०७ मध्ये छत्रपती शाहू आणि महाराणी ताराबाई यांच्या सैन्यात खेड येथे युद्ध झाले. त्या युद्धात महाराणी ताराबाई यांचा पराभव झाला. त्यानंतर त्या दोघात प्रसिद्ध वारणेचा तह झाला. छत्रपती शाहुंनी महाराणी ताराबाई यांच्या कोल्हापुरच्या गादीस मान्यता दिली. तर महाराणी ताराबाई यांनी छत्रपती शाहू यांच्या सातारा येथील गादीस संमती दिली. अशाप्रकारे मराठ्यांची दोन राज्ये निर्माण झाली.

महाराणी ताराबाई यांनी आपल्या कारकिर्दीत औरंगजेब सारख्या शत्रूला स्वराज्य जिंकु दिले नाही. यातच त्यांची महानता सिद्ध होते. त्यांनी ज्या खंबीरतेने स्वराज्याचे शत्रुपासून रक्षण केले त्याला इतिहासात तोड नाही.

आमचा हा लेख कसा वाटला ते जरुर कळवा.

तुम्हाला जर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वाचायचे असेल तर तुम्हे पुढील लिंकवरून वाचू शकता.

Sambhaji Maharaj history in marathi language 2021 | छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल माहिती

तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या वेबसाइटला भेट देऊ शकता.

 

See also  Salherchi Ladhai Information In Marathi 1672 | साल्हेरची लढाई - मराठ्यांचा मुघलांवर जबरदस्त विजय

 

 

Spread the love

Leave a Comment