Angkor Wat Temple 2021| जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर – अंगकोर वाट

 Angkor Wat Temple 2021|जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर – अंगकोर वाट

आपली भारतीय संस्कृती ही सर्वात प्राचीन संस्कृती मानली जाते. भारताबाहेरही आपल्या या प्राचीन भारतीय संस्कृतीची साक्ष देणारी मंदिरे आहेत. कंबोडिया या देशात असलेले अंगकोर वाट मंदिर ( Angkor Wat Temple 2021) हे जगातील सर्वात मोठा परिसर असलेले हिंदू मंदिर आहे. आजच्या या लेखात आपण अंगकोर वाट (Angkor Wat) मंदिराबाबत माहिती जाणुन घेऊ या.

Largest Hindu Temple Angkor Wat 2021

  अंगकोर वाट मंदिर कोणी निर्माण केले : Angkor Wat Temple History

कंबोडियामध्ये खुप मोठ्या प्रमाणात हिंदू आहेत. त्यासोबतच बौद्ध स्मारकेही बरीचशी आहेत. अंगकोर वाट मंदिर हे कंबोडियातील अंकोर या शहरात आहे. या शहराचे प्राचीन नाव यशोधरपुर असे होते. अंगकोर वाट मंदिर हे यूनेस्कोच्या जागतिक वारसा ठिकानांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. अंगकोर वाट मंदिर हे प्रामुख्याने विष्णु मंदिर आहे. असे असले तरी येथे ब्रम्ह आणि शिव यांच्याही प्रतिमा आहेत. या मंदिराचे निर्माण कार्य अंगकोरचा राजा सूर्यवर्मन द्वितीय याने बाराव्या शतकात केले. राजा सूर्यवर्मन याने आपल्या मृत्युनंतर आपले स्मारक राहावे म्हणून या मंदिराचे निर्माणकार्य केले असे म्हटले जाते. म्हणून या मंदिराला pyramid temple असेही म्हटले जाते. या मंदिराचे अद्भुत स्थापत्य आणि भव्य शिल्पकला असल्याने त्यास व्रह विष्णुलोक असेही म्हटले जात असे.

अंगकोर वाट मंदिराचा परिसर आणि बांधकाम :

अंगकोर वाट मंदिर हे वास्तविक मंदिरांचा समूह आहे. मंदिराचे बांधकाम हे कमीअधिक उंचीच्या तीन प्रांगनात केलेली आहे. अंगकोर वाट मंदिराच्या चारही बाजूंनी पाण्याची खंदके आहेत. अंगकोर वाट मंदिर हे पश्चिममुखी आहे. या मागे असे कारण सांगितल्या जाते की, वैकुंठाला जाणारा मार्ग हा पश्चिम दिशेकडे आहे. या मंदिराची रचना पुराणात उल्लेख असलेल्या मेरु पर्वताला डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे.

See also  Rameshwaram Temple History In Marathi २०२१ | रामेश्वरम मंदिराचा इतिहास

Largest Hindu Temple Angkor Wat 2021

ज्या परिसरात हे मंदिराचे बांधकाम केले आहे त्याची लांबी – रुंदी 1500 *1300 आहे. मुख्य मंदिराच्या सभोवतीला एकुण पाच गोपुरे आहेत. त्यामधील भिंतीवरील शिल्पकला खुप सुंदर आहे. मेरु पर्वतास जसे वासुकी नागाने विळखा घातलेला होता त्याचे प्रतिक म्हणजे या भिंती होत. गोपुरांच्या वरच्या भागावर ब्रम्हदेवाचे मुख कोरलेले आहे. गोपुरांच्या खालच्या भागात हत्ती कोरलेले असून प्रत्येक हत्तीच्या सोंडेत कमळाचे फूल आहे. हे दृश्य पाहून आपले मन नक्कीच भारावून जाते. या मंदिराच्या भिंतीवर आणि गोपुरांवर देवंताच्या आणि अप्सरांची शिल्पे कोरलेली आहेत. ही गोपुरे हत्ती दरवाजे म्हणूनही ओळखली जातात. कारण त्यामधून हत्ती सहज जाऊ शकतो.

गोपुरांच्या आत आल्यावर दोन लहान आकाराच्या इमारती आहेत. त्या इमारती त्यावेळी पुरोहित, पंडित वापरत असावी. त्या इमारतीमधील भिंतीवर प्राचीन ख्मेर भाषेत रामायणातील श्लोक कोरलेले आहेत. मंदिरांच्या भिंतीवर रामायणातील सीताहरण, अशोक वाटिकेत असलेले हनुमानजी, रावणाच्या दरबारातील अंगद प्रसंग कोरलेले आहेत. श्रीराम आणि रावण तसेच कौरव आणि पांडव यांच्यातील युद्धाचे देखावे कोरलेली आहेत. त्याच बरोबर समुद्र मंथनाचा प्रसंगही  कोरलेला आहे. भगवान विष्णु आणि असुर तसेच श्रीकृष्ण आणि बाणासुर यांचे युद्ध यांचेही देखावे कोरलेले आहेत. परिसरातील एका सज्ज्यात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्याही मुर्त्या आढळतात.

Largest Hindu Temple Angkor Wat 2021

कंबोडिया या देशाने आपल्या राष्ट्रध्वजावर या मंदिराची प्रतिमा ठेवून आपल्या देशातील या प्राचीन वारशाचा उचित सन्मान केलेला आहे.

Angkor Wat Temple Photos :

तुम्हाला आमचा  Angkor Wat Temple 2021 हा लेख कसा वाटला ते जरुर कळवा.

तुम्हाला जर ब्रुहदिश्वर मंदिराबाबत माहिती जाणुन घ्यायचे असेल तर तुम्ही खालील लिंकवरून माहिती घेऊ शकता.

Brihadeeshwar Temple Information In Marathi 2021 | अद्भुत स्थापत्यशास्त्राचा नमुना बृहदिश्र्वर मंदिर तंजावर

तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या वेबसाइटला भेट देऊ शकता.

Spread the love

Leave a Comment