Virupaksh Temple Pattadkal Information In Marathi 2021 | विरूपाक्ष मंदिर पट्टदकल माहिती

Virupaksh Temple Pattadkal Information In Marathi 2021 | विरूपाक्ष मंदिर पट्टदकल माहिती

भारत हा मंदिरांचा देश आहे म्हटल्यावर चुकीचे असणार नाही. ही मंदिरे भारताच्या प्राचीन संस्कृतीची साक्ष देत आजही उभी आहेत. भारताच्या वैभवशाली संस्कृतीची ही प्रतिके तत्कालीन कलेचीही साक्ष देतात. आजही ही प्राचीन मंदिरे बघितल्यावर प्राचीन भारतीय स्थापत्यकला किती प्रगत होती याची कल्पना आल्याशिवाय राहत नाही. आजच्या या लेखात आपण अशाच एका प्राचीन भारतीय मंदिराच्या (Virpaksh Temple Pattadkal Information In Marathi 2021 | विरूपाक्ष मंदिर पट्टदकल माहिती) बाबत माहिती बघू या.

Virupaksh Temple Pattadkal Information In Marathi 2021

विरूपाक्ष मंदिराची निर्मिती :

विरूपाक्ष मंदिराची निर्मिती इ.स. 740 च्या सुमारास झाली. या मंदिराचे निर्माणकार्य दूसरा विक्रमादित्य या राजाने केले. दूसरा विक्रमादित्य  हा उत्तर चालुक्यकालीन होता.

दूसरा विक्रमादित्य या राजाने पल्लवांच्या कांची या राजधानीवर स्वारी करुन राजधानी कांची जिंकुन घेतले. पल्लवांची राजधानी कांची येथे असलेले कैलासनाथ मंदिर हे अतिशय वैभवशाली होते. अप्रतिम सुंदरतेचा नमूना असलेला हे मंदिर राजा विक्रमादित्य दूसरा याला फार आवडले.

कैलासनाथ मंदिराने प्रभावित झालेल्या राजा विक्रमादित्याने ज्या कलाकारांनी कैलासनाथ मंदिर बांधले त्यांना घेऊन पट्टदकल येथे घेऊन आला. राजा विक्रमादित्याने अगदी तसेच मंदिर त्यांच्याकडून बांधून घेतले. हेच ते प्रसिद्ध विरूपाक्ष मंदिर होय.

विरूपाक्ष मंदिर पट्टदकल :

विरूपाक्ष मंदिराची निर्मिती ही द्रविड शैलीत झालेली आहे. या मंदिराच्या गर्भगृहावरील अनेक मजल्यांचे बनलेले शिखर आणि त्यावरील स्तूपिका ही अप्रतिम आहेत.

गर्भगृहासमोर असलेला सभामंडप आणि छोटासा द्वारमंडप देखील वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या मंडपांच्या समोर स्वतंत्र असलेला नंदीमंडप आहे. या सर्व मंडपांच्या छताच्या जाडजूड कंगन्या आपले लक्ष वेधून घेतात.

देवालय आणि नंदी मंडपाच्या भिंतीवर प्राचीन हिंदू देवदेवतांची आकर्षक शिल्पे स्वतंत्र तबकात कोरलेली दिसून येतात. त्यावर जाडजूड प्रस्तरपाद आहे. सभामंडपात उजेड यावा म्हणून सभामंडपातील भिंतीत दगडात कोरलेल्या जाळ्या बसविलेल्या आहेत.

See also  The Somnath Temple full information in marathi 2021 | सोमनाथ मंदिर विषयी माहिती

विरुपाक्ष मंदिराच्या प्रत्येक भागाची उभारणी उंच जोत्यावर केलेली आहे. मंदिरातील भिंतीवर सिंह आणि विचित्र असे काल्पनिक प्राणी यांच्या प्रतिमा कोरलेल्या दिसून येतात. प्रस्तरपाद आणि त्यावरील रचनेत अलंकारिकता आहे.

विरूपाक्ष मंदिराशिवाय पट्टदकल येथील 7 व्या शतकाच्या शेवटी बांधलेले द्रविड शैलीतील गळगनाथ मंदिरही अप्रतिम आहे.

अशा प्राचीन मंदिरांना भेटी देऊन आपण आपल्या प्राचीन भारतीय स्थापत्य शैलीचा अनुभव घेऊ शकतो.

आमचा Virupaksh Temple Pattadkal Information In Marathi 2021 हा लेख तुम्हाला कसा वाटला ते जरुर कळवा.

तुम्हाला जर रामेश्वरम मंदिराबाबत माहिती घ्यायची असेल तर तुम्ही पुढील लिंकवरून घेऊ शकता.

Rameshwaram Temple History In Marathi २०२१ | रामेश्वरम मंदिराचा इतिहास

तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या वेबसाइटला भेट देऊ शकता.

Spread the love

2 thoughts on “Virupaksh Temple Pattadkal Information In Marathi 2021 | विरूपाक्ष मंदिर पट्टदकल माहिती”

Leave a Comment