Hampi History 2021| भारताची वैभवशाली नगरी हंपीचा इतिहास

Hampi History 2021| भारताची वैभवशाली नगरी हंपीचा इतिहास

मध्ययुगीन भारतातील विजयनगर या वैभवशाली साम्राज्याची राजधानी असलेली हंपी (Hampi History 2021) आजही आपल्या वैभवाची साक्ष देते. आपली भारतीय संस्कृती किती महान आहे हे आपल्या देशातील या प्राचीन शहरातील वास्तूवरून लक्षात येते. हंपी येथील ऐतिहासिक  ठेवा महत्वाचा आहे. म्हणूनच युनेस्कोने हंपीला जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला आहे. आजच्या लेखात आपण हंपी या भारताच्या ऐतिहासिक वैभवशाली शहराबद्दल माहिती घेऊ या.

Hampi History 2021

Hampi History 2021| हंपीचा इतिहास :

कर्नाटक राज्यातील बेलारी तालुक्यातील होस्पेट पासूनसुमारे 13 किमी लांब असलेले हंपी एकेकाळी वैभवशाली विजयनगर साम्राज्याची राजधानी होती. तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेले हंपी एकेकाळी संपन्न नगर होते.

हंपी ह्या नगरास पंपा क्षेत्र,किष्किंधा क्षेत्र वा भास्कर क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. रामायणातील वानरराज सुग्रीव याची राजधानी येथेच होती असे म्हणतात. तुंगभद्रा नदीचे प्राचीन नाव पंपा होते. त्यावरून हे नाव पडले असे म्हटले जाते. विरुपाक्षपुरा असेही नाव हंपीला आहे.

असे म्हटले जाते कि, हंपी नगर हे सम्राट प्रसेनजीत यांनी केली. परंतु हंपीची भरभराट झाली ती विजयनगर साम्राज्यात. मध्ययुगीन भारतात अत्यंत संपन्न असे विजयनगरचे साम्राज्य होते. दक्षिण भारतात सुमारे इ.स.1336 ते 1565 या दरम्यान वैभवशाली विजयनगरचे साम्राज्य अस्तित्वात होते.

हरिहर आणि बुक्क या दोन महापराक्रमी बंधूंनी विजयनगरचे साम्राज्य स्थापन केले. हरिहर आणि बुक्क यांचे गुरु विद्यारण्यस्वामी असे होते. त्यांच्या नावरून या दोन बंधूंनी विद्यानगर असे नाव दिले होते.कालांतराने विद्यानगरचे विजयनगर असे नाव झाले. परंतु हंपीची भरभराट झाली ती कृष्णदेवराय या राजाच्या कारकिर्दीत. त्यावेळेस जगातील संपन्न शहरांपैकी एक हे हंपी (Hampi History 2021) शहर  विजयनगरची राजधानी होती.

See also  Maharani Tarabai Information In Marathi २०२१ | महाराणी ताराबाई यांच्या बद्दल माहिती

पर्शियन प्रवाशी अब्दुल रझाक याने विजयनगर साम्राज्याला भेट दिली होती. तो आपल्या वर्णनात लिहितो ,” माझ्या डोळ्यांनी हंपी इतके अप्रतिम शहर कुठेही पहिले नाही. किंवा त्याच्या तोडीचे शहर दुसऱ्या कोणत्याही शहराचे नाव ऐकलेले नाही.अनेक टेकड्यांवर वसलेल्या शहराला एकामागे एक अशा सात वर्तुळाकार बांधकाम केलेली मजबूत तटबंदी आहे.समृद्धी एवढी कि, भर बाजारात सोने,चांदी,हिरे – मोती केशर यांचे विक्रीसाठी ढीग लागलेले होते. केवळ देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही व्यापारी तेथे येतात.”

पोर्तुगीज प्रवाशी डॉमीगो प्रेस हा विजयनगरच्या राजधानीला म्हणजे हंपीला आला होता. त्याने आपल्या दैनंदिनीमध्ये लिहिले आहे कि, हंपी हे शहर सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असून जगातील सर्वात संपन्न शहर अशी त्याची ख्याती इराण-इराक पर्यंत आहे.

हे ही वाचा : Rameshwaram Temple History In Marathi २०२१ | रामेश्वरम मंदिराचा इतिहास

हंपी येथील पर्यटन स्थळे :

1) विरुपाक्ष मंदिर हंपी :

हंपी येथे मंदिरांचा समूह आहे. सुमारे 40 ते 50 किमी परिसरात हंपी येथील ऐतिहासिक वास्तू पसरलेल्या आहेत. त्यामधील विरुपाक्ष मंदिर हे भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. हे मंदिर भगवान भोलेनाथ यांना समर्पित आहे. पंपातीर्थ स्वामीस्थळ म्हणूनही हे मंदिर ओळखले जाते.

विस्तीर्ण आयताकृती परिसरात असलेले हे मंदिर प्राचीन वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.या मंदिरात असलेली गोपूर उंच असून त्यावरील नक्षीकाम अप्रतिम आहे.मंदिराच्या पूर्वेकडील गोपूर हे सुमारे 105 फुट उंच आहे. या मंदिराच्या भिंतीवर देवी देवतांच्या मुर्त्या साकारण्यात आल्या आहेत. श्रीराम, श्रीकृष्ण, भगवान विष्णू आणि भोलेनाथ यांच्या विविध अवतारांच्या कथा येथे कोरलेल्या आहेत.

हंपी (Hampi History 2021) येथे दरवर्षी डिसेंबर महिन्यात विरुपाक्ष आणि पम्पा यांचा लग्नाचा समारोह आयोजित केला जातो.तसेच विरुपाक्ष देवाचा वार्षिक रथोत्सव फेब्रुवारी महिन्यात साजरा करण्यात येत असतो.

हे ही वाचा बृहदिश्वर मंदिर

2)विठ्ठल मंदिर हंपी:

Hampi History 2021

या मंदिरालाच विजया विठ्ठल मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हंपी येथे असलेल्या सर्व ऐतिहासिक वास्तूत विजया विठ्ठल मंदिर सर्वांग सुंदर आहे. या मंदिरात असलेल्या ५६ दगडी स्तंभावर जर हाताने थाप मारली तर सुमधुर ध्वनी निर्माण होतो. या स्तंभाच्या आत काही धातू असून त्याद्वारे संगीतमय ध्वनी निर्माण होतो असे इंग्रजांना वाटले. त्यामुळे त्यांनी दोन स्तंभ पाडले. परंतु स्तंभाच्या आत असे काही आढळले नाही. हे दोन तोडलेले स्तंभ आजही तेथे आढळतात. विजया विठ्ठल मंदिराच्या बाहेर एक दगडी रथ आहे. या रथाचे चित्र पन्नास रुपयांच्या नोटेवर आहे.

See also  Sant Namdev information in marathi 2021| संत नामदेव विषयी माहिती

3)हजाराराम मंदिर हंपी :

Hampi History 2021

भगवान विष्णूला समर्पित असलेले हे मंदिर हंपीमधील एक प्रमुख मंदिर आहे. असे मानले जाते कि, या मंदिराची निर्मिती सम्राट कृष्णदेवराय यांनी केली. विजयनगरच्या राजांसाठी केवळ हे मंदिर होते. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे दगडात झाले होते. मंदिरातील भिंती आणि खांब यावरील नक्षीकाम अप्रतिम होते. रामायणातील विविध प्रसंग येथील भिंतीवर साकारलेली होती.

4) हत्तीखाना :

विजयनगराचे साम्राज्य त्याकाळी एक प्रबळ साम्राज्य म्हणून ओळखले जाई. हंपी येथे असलेला हत्तीखाना याचे प्रतिक आहे. लष्करातील हत्तींसाठी हंपी येथे एक सुसज्ज वास्तू आहे. हि वास्तू देखील सुशोभित केलेली होती.

5) राणीचे स्नानगृह हंपी : Hampi History 2021

हंपी येथील राजघराण्यातील स्त्रियांसाठी असलेले हे स्नानगृह आयताकृती आहे. एक विहीर असून त्यात उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. नैसर्गिक उतार वापरून या विहिरीपर्यंत पाणी आणण्यात आले आहे.

6) कमल महाल हंपी :

Hampi History 2021

कमल महाल हे हजाराराम मंदिरापासून जवळच आहे. या महालाचा आकार हा कमळाच्या फुलासारखा आहे. हा महाल दोन मजली असून त्याचे बांधकाम चुना आणि वीट यामध्ये केलेले आहे. या महालाच्या बांधकामाची शैली हि इंडो- अरेबिक आहे. या महालास चित्रांगणी महाल असेही म्हणतात. हा महाल राजपरिवारातील स्त्रियांच्या विश्रांतीसाठी बांधण्यात आला होता.

हे ही वाचा : सोमनाथ मंदिराबाबत माहिती 

7) लक्ष्मी नृसिंह मंदिर हंपी :

Hampi History 2021

लक्ष्मी नृसिंह मंदिर सम्राट कृष्णदेवराय यांच्या काळात बांधण्यात आले होते. हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे. या मंदिरातील लक्ष्मी नृसिंहची मूर्ती सुमारे 6.7 मीटर उंच आहे. विरुपाक्ष मंदिरापासून हे मंदिर जवळच आहे.

हे पण वाचा Angkor Wat Temple 2021| जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर – अंगकोर वाट

8) हंपी बाजार :

विरुपाक्ष मंदिराजवळच बाजार भरतो. या ठिकाणी फार गर्दी असते. कलाकुसरीच्या वस्तू येथे खूप मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. त्यामुळे हा बाजार पर्यटकांनी गजबजलेला असतो.

See also  Vatican City Mahiti 2021| व्हॅटिकन सिटी जगातील सर्वात लहान देश

9) महानवमी डिब्बा हंपी :

विजयनगरचे सम्राट कृष्णदेवराय यांनी उदयगिरी ( ओरिसा ) जिंकला तेव्हा त्यांनी जी वास्तू विजयाचे प्रतिक म्हणून बांधले ती म्हणजे महानवमी डिब्बा बांधला.

महानवमी डिब्बा त्याकाळी सैन्यसंचालन ,लष्करी कवायत बघण्यासाठी केल्या जात होता. ही वास्तू आयताकार असून बाहेरील भिंतीवर हत्ती,घोडे यांचे नक्षीकाम केलेले होते.

हे ही वाचा : पशुपतीनाथ मंदिर संपूर्ण माहिती 

10) अंजनेय टेकडी हंपी :

हंपी जवळच तुंगभद्रेच्या पैलतीरी ही टेकडी आहे. त्या टेकडीवरच हनुमानजी यांचा जन्म झाला होता असे म्हटले जाते. त्यामुळेच त्या टेकडीचे नाव अंजनेय टेकडी असे पडले.

अंजनेय टेकडीवर हनुमानजीचे मंदिर असून तेथून हंपीचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळते.

11) मतंग टेकडी हंपी :

हंपी हे ठिकाण प्राचीन आहे. या ठिकाणाचा संबंध रामायणाशी जोडला जातो. रामायणातील मतंग ऋषी ज्या टेकडीवर तपश्चर्या करीत होते ती टेकडी हंपीच्या मध्यवर्ती भागात आहे. उंच असलेल्या या टेकडीवरून संपूर्ण हंपीचे नयनरम्य दृश्य दिसते. या टेकडीवर वीरभद्राचे मंदिर आहे. या टेकडीवर ट्रेकिंग पण केल्या जाते.

12) अच्युतराय मंदिर हंपी :

Hampi History 2021

मतंग टेकडी आणि गंधमदन टेकडी यामध्ये हे मंदिर वसलेले आहे. अच्युतराय मंदिर सुमारे इ.स. 1534 ला बांधले गेले. हे मंदिर भगवान विष्णूचा अवतार मानल्या गेलेले तीरुवेंगलानाथ यांना समर्पित केले आहे.हे मंदिर अत्यंत भव्य आणि आकर्षक आहे.

13) पुरातत्त्वीय वास्तूसंग्रहालय हंपी :

हंपी हे एक महत्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे. हंपीच्या ऐतिहासिक वारश्याची साक्ष देणाऱ्या अनेक वस्तू येथे असलेल्या वस्तुसंग्रहालयात बघायला मिळतात. हे पुरातत्त्वीय वस्तुसंग्रहालय हंपीपासून जवळच असलेल्या कमलापुरा येथे आहे.

ज्यावेळी हंपी येथे उत्खनन झाले तेव्हा त्याठिकाणी सापडलेल्या वस्तू जसे मुर्त्या,भांडी, अलंकार आणि शस्त्रे या वस्तुसंग्रहालयात आहेत. त्याचप्रमाणे विजयनगरच्या साम्राज्याची चित्रांच्या रूपाने माहिती या संग्रहालयात मिळते.

14) यानागुंडी हंपी :

विजयनगरचि हंपीच्या पूर्वीची राजधानी यानागुंडा ही होती. तुंगभद्रेच्या पैलतीरी असलेली यानागुंडा येथे विजयनगरच्या साम्राज्याच्या वैभवाचे अवशेष दिसतात.

यानागुंडा जवळच पंपा सरोवर,गगन महाल,प्राचीन दगडी पूल  आणि अंजनेयाद्री मंदिर ही बघण्यासारखी स्थळे आहेत.

हंपी या ठिकाणी आपल्या गतकालीन वैभवाचा खूप मोठा ठेवा आहे. अशा ऐतिहासिक वारशाचे आपण जतन केले पाहिजे.

आमचा हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा आणि आवडल्यास आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.

तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या वेबसाईटला जरूर भेट द्या.

स्त्रोत : गुगल

Spread the love

Leave a Comment