Sant Namdev information in marathi 2021| संत नामदेव विषयी माहिती

                     Sant Namdev information in marathi | संत नामदेव विषयी माहिती

Sant Namdev information in marathi 2021

महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा आहे. ही भूमी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, विसोबा खेचर, संत नामदेव, संत सावता माळी, जनाबाई, संत गोरा कुंभार, संत एकनाथ अशा अनेक संतांच्या कर्तुत्वाने पावन झाली आहे. महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा बनला तो याच संतांच्या शिकवणुकीने. आजच्या लेखात आपण अशाच एका महान संताबाबत संत नामदेव म्हणजेच Sant Namdev information in marathi 2021  बाबत माहिती घेऊ या.

संत नामदेव यांचा जन्म २६ ऑक्टोबर 1270 मध्ये  नरसी बामनी या गावात कार्तिक शुक्ल एकादशीला झाला. नरसी बामनी हे गाव नेमके कोणते आहे याबाबत संभ्रम आहे. कराडजवळ असलेले नरसिंगपुर हेच नरसी बामनी असावे असे मानतात.  तर काहींच्या मते नरसी बामनी  हे गाव हिंगोली जिल्ह्यात आहे. संत एकनाथ यांनी लिहलेल्या चरित्रात संत नामदेव यांचे बालपण पंढरपुरात गेले असे म्हटले आहे.

संत नामदेव यांचे आई – वडील विठ्ठलभक्त होते. त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेटी तर आईचे नाव गोणाई देवी होते. त्यांच्या पत्नीचे नाव राजाई होते. त्यांना नारायण,महादेव,गोविंद, आणि विठ्ठल ही चार मुले तर लिंबाई ही मुलगी होती. त्यांचे आडनाव  रेळेकर होते.गुरु ग्रंथ साहिब आणि संत कबीर यांच्या  संत नामदेव वचनामध्ये संत नामदेव यांच्या गुरु बाबत माहिती मिळते. विसोबा खेचर हे संत नामदेव यांचे गुरू होते. संत नामदेव यांनी त्यांचे संपूर्ण जीवन विठ्ठलभक्ती आणि मानव कल्याण यामध्ये व्यतीत केले.मूर्तिपूजा, कर्मकांड, जातपात याविषयी त्यांनी आपले स्पष्ट विचार मांडले. त्यामुळे त्यांना संत कबीर यांचे प्रेरणास्थानही मानतात.

Sant Namdev information in marathi 2021
Sant Namdev information in marathi

महाराष्ट्रात संत नामदेव यांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले.त्यांनी उपेक्षित वर्गातील धर्मश्रद्धेला नवी वाट उंची दिली. संत नामदेव हे वारकरी पंथाचे संतकवी होते. भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून त्यांना ओळखले जाते.  संत नामदेव यांचा एक सुंदर अभंग आहे त्यामधील भक्तिभाव त्यांनी किती सहजतेने प्रकट केला आहे याचा प्रत्यय येतो.

See also  बाजीप्रभू देशपांडे यांची पावनखिंडीतील झुंज माहिती 2021 | Baji Prabhu Deshpande Pavankhind Full Information In Hindi

अमृताहुनि गोड नाम तुझे देवा| मन माझे केशव कां वा नेघे || ||१||

सांग पंढरिराया काय करू यासी| कां रूप ध्यानासि न ये तुझे ||२||

कीर्तनी बैसता निद्रे नागविले | मन हे भुलले विषयसुखा ||३||

हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति | न ये माझ्या चित्ती नामा म्हणे ||४||

संत नामदेव यांनी वारकरी संप्रदायाचे सार साध्या, सुलभ भाषेतून सर्वांना दिले. वैदिक तत्त्वज्ञान त्यांनी आपल्या सहज वाणी तुन व्यक्त केले. कीर्तनाचच्या रंगात नाचुन जगामध्ये आत्मज्ञानाचा दीप प्रज्वलित करू. संत नामदेव म्हणतात,

नाचू कीर्तनाचे रंगी | ज्ञानदीप लावू जगी | सर्व सांडोनी माझाई | वाचे विठ्ठल रखुमाई | परेहुन परते घर | तेथे राहू निरंतर | सर्वांचे जे अधिष्ठान | तेची माझे रूप पूर्ण | अवघी सत्ता आली हाता | नामयाचा खेचर दाता|

संत नामदेव यांनी तत्कालीन समाजामध्ये असलेल्या शैव आणि  वैष्णव या दोन पंथामधील दुही दूर करण्याचा प्रयत्न केला. आपल्या किर्तनातुन सामाजिक ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नामदेव म्हणतात,

केली जैसी भक्ती शैव का वैष्णव | पाहता तो देव दूजा नाही || शिव विष्णु दोघे एकचि अवतार| वैदांनी निर्धार हाच केला || नामा म्हणे येथे दूजा नको भाव | विष्णु तोचि शिव , शिव विष्णु |

संत नामदेव यांचा आणखी एक सुंदर अभंग आहे.

अठ्ठाविस युगे उभा विटेवरी | मुद्रा अगोचरी लावुनियां ||१|| ध्यान विसर्जन केधवा करिसी | नेणवे कोणासी ब्रम्हादिका ||२|| पहातां तुजकडे माझे मीपण उडे | भेदांचे साकडे हारपले ||३|| तुजपाशीं असतां मुकुजे जिवित्त्वा| ठकले तत्त्वता नेणों किती||४|| नामा म्हणे स्वामी कृपादृष्टि पाहें| मन पायीं रहे ऐसें कीजे||५||

संत नामदेव यांनी वारकरी संप्रदायाची पताका महाराष्ट्राबाहेर पंजाब मध्येही नेली.  त्यांनी पंजाबी भाषेतही काव्य रचना केली. संत नामदेव यांच्या रचनांमध्ये भक्तिभाव तर होताच पण त्यासोबतच सरलता पण होती. संत नामदेव यांच्या मृत्यूनंतर तीनशे वर्षांनी श्री गुरु अरजनदेवजींनी ‘ नामदेवजीकी मुखबानी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या  त्यांच्या काव्यरचनांचे संकलन गुरु ग्रंथ साहिब मध्ये केले. श्री गुरु ग्रंथ साहिब मध्ये त्यांचे सुमारे  61 पदे, 3 श्लोक समाविष्ट केले आहेत. त्यासोबतच मुखबानी या ग्रंथात त्यांच्या बऱ्याचशा रचना समाविष्ट केल्या आहेत. पंजाबमध्ये त्यांना ‘नामदेव बाबा’ म्हणून ओळखतात.पंजाबमधील घुमान येथे त्यांचे मंदिर उभारले आहे.

See also  Sambhaji Maharaj history in marathi language 2021 | छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल माहिती

संत नामदेव यांचा मृत्यु पांडुरंगाच्या मंदिराच्या पायरीवर ३ जूलै १३५० ला झाला.

संत नामदेव यांनी आपल्या किर्तानातुन हरिभाक्तिचा प्रचार केला. ते वारकरी संप्रदायाचे एक महान संत होते.  परम विठ्ठलभक्त असलेल्या संत नामदेव यांच्याच अभंगातून त्यांच्या हरिभाक्तिचा प्रत्यय येतो.

“नामदेव कीर्तन करी | पुढे नाचे देव पांडुरंग||”

आजच्या या लेखात आपण संत नामदेव म्हणजेच Sant Namdev information in marathi 2021आमचा हा लेख कसा वाटला ते अवश्य कळवा.

Meenakshi mandir information in marathi 2021 | मीनाक्षी मंदिर माहिती

http://www.marathimahiti.comवेबसाईट ला नक्की भेट दया .

Spread the love

2 thoughts on “Sant Namdev information in marathi 2021| संत नामदेव विषयी माहिती”

Leave a Comment