Lokmanya Tilak information in marathi 2021| लोकमान्य टिळक यांच्या विषयी माहिती.

        Lokmanya Tilak information in marathi  2021| लोकमान्य टिळक यांच्या विषयी माहिती.

Lokmanya Tilak information in marath 2021
Lokmanya Tilak information in marathi 2021

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ( जन्म.23 1856 जुलै – मृत्यू 1 ऑगस्ट 1920 ) भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचे नेते होते.त्यांनी ओळख केवळ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक आघाडीचे नेते एवढीच नाही. भगवदगीतेचे आधुनिक भाष्यकार तसेच प्राच्यविद्या पंडित, पत्रकार अशी वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती. आजच्या या लेखात आपण   Lokmanya Tilak information in marathi 2021  म्हणजेच लोकमान्य टिळक यांच्याविषयी माहिती घेऊ या.

पूर्वायुष्य/ बाळ गंगाधर टिळक यांची माहिती – Lokmanya Tilak Biography .

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगाव येथे 23 जुलै 1856 ला झाला. टिळकांच्या आईचे नाव पार्वताबाई होते. त्यांचे मूळ नाव केशव. पुढे मात्र बाळ हेच नाव रूढ झाले.टिळकांना लोकमान्य असे सर्वात अगोदर संबोधले ते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी. टिळकांचे वडील मराठी शाळेत शिक्षक होते. टिळक 1872 साली मॅट्रिक झाले. लोकमान्य टिळकांचा विवाह 1871 साली झाला. त्यांच्या पत्नीचे नाव सत्यभामाबाई यांच्याशी झाला. टिळकांना विश्वनाथ,रामभाऊ व श्रीधर हे तीन मुले आणि तीन मुली होत्या. त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेज (deccan college) मध्ये शिक्षण घेतले. B.A. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी एल. एल. बी. ची पदवी मिळवली.

See also  India and Israel 2021 | भारतआणि इस्राईल यांचे संबंध माहिती

लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर / लोकमान्य टिळक यांचे कार्य – Lokmmanya Tilak information in marathi 2021

लोकमान्य टिळक आणि आगरकर ( gopal ganesh Agarkar) यांनी मिळून अनेक सामाजिक कार्य केले. विष्णु शास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी टिळकांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले.चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून देण्याचे ठरविले होते तेव्हा टिळक आणि आगरकर यांनी ही सरकारी नोकरी सोडून दिली.

1 जानेवारी 1880 साली न्यू इंग्लिश स्कूलची ( New English School) स्थापना त्यांनी केली. टिळक, आगरकर आणि चिपळूणकर यांनी मिळून आर्यभूषण छापखाना काढला. त्यानंतर केसरी( kesari) हे मराठी भाषेतील तर मराठा(Maratha) हे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्रे सुरू केली.अगोदर टिळक हे मराठा वृत्तपत्राचे तर केसरी वृत्तपत्राचे आगरकर हे संपादक होते. केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांद्वारे लोकशिक्षण,राजकीय जागृती आणि ब्रिटिश सरकारच्या अन्यायाचा प्रतिकार करणे सुरू झाले.

1884 मध्ये टिळक आणि आगरकर यांनी केळकर, भांडारकर, तेलंग, दांडेकर, आणि वेडर बर्ग यासारख्या काही व्यक्तींच्या मदतीने डेक्कन एज्युकेशन सोसायटीची (deccan education society)  स्थापना केली. त्यानंतर लगेच 1885 ला या संस्थेच्या द्वारे फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली.

परंतु कालांतराने निर्वाहा पुरते वेतन की सांपत्तिक स्थितीनुसार वेतन यावरून टिळक आणि आगरकर यांच्यात वाद निर्माण झाला. त्याचबरोबर अगोदर राजकीय सुधारणांना प्राधान्य द्यावे की सामाजिक सुधारणांना द्यावे याबाबतही त्यांच्यात मतभेद होते. आगरकर हे सामाजिक सुधारणा अगोदर करावे या विचारांचे होते तर टिळकांच्या मते राजकीय सुधारणा केल्या की राष्ट्राचा विकास होतो जसे  सुई मागे दोरा यानुसार सामाजिक सुधारणा होतीलच.

 लोकमान्य टिळक : भारतीय असंतोषाचे जनक – Lokmanya Tilak known as the father of Indian Dissatisfaction.

 Lokmanya Tilak information in marathi 2021
Lokmanya Tilak information in marathi 2021

इंडियन अनरेस्ट या 1915 मध्ये प्रसिद्ध झालेल्या सर व्हॅलेंटाईन चिरोल यांच्या ग्रंथांत टिळकांच्या विरोधात बदनामीकारक मजकूर होता. त्याविरोधात टिळकांनी खटला दाखल केला. पण ते हरले. मात्र त्यांना भारतीय असंतोषाचे जनक (Lokmanya Tilak known as the father of Indian Dissatisfaction) म्हणून ओळख मिळाली.
‘ स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच ‘ असे म्हणत टिळक भारतीय असंतोषाचे जनक ठरले. आपल्या वृत्तपत्राच्या द्वारे त्यांनी भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची भावना प्रबळ तर केलीच शिवाय ब्रिटिश सरकारच्या अन्याया विरूद्ध जाहीरपणे टीका केली. त्यामुळे टिळकांवर राजद्रोहाचा आरोप दोन वेळा करण्यात आला आणि त्यांना तुरुंगवासही झाला.

See also  RAW Intelligence Campaign 1 Information In Marathi | रॉ चा गनिमी कावा

पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातले होते. प्लेग प्रतिबंध करतांना ब्रिटिश सरकारकडून होणाऱ्या अन्यायाने चाफेकर बंधूनी पुण्याचा कमिश्नर रँड याचा 22 जून 1897 ला खून केला. त्यानंतर ब्रिटिश सरकारने पुण्यातील जनतेवर अनन्वित अत्याचार केले. त्यावेळेस टिळकांनी आपल्या वृत्तपत्रात ,’ सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? आणि ‘ राज्य करणे म्हणजे सूड उगविणे नव्हे ‘ असे अग्रलेख लिहले. त्यामुळे टिळकांवर राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आणि त्यांना अठरा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. परंतु त्यांना नंतर 6 सप्टेंबर 1898 ला कारागृहातून मुक्त करण्यात आले.

टिळक कारावास भोगून बाहेर आले पण त्यांनी आपली लेखणी थांबविली नाही. आपल्या लेखनातून ते ब्रिटिश सरकारवर टीका करीतच राहिले. त्यातच 20 जुलै 1905 ला बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन (Lord Curzon) याने जाहीर केली. त्यानंतर संपूर्ण देशात प्रक्षोभ उसळला. ठीक ठिकाणी उग्र आंदोलनं सुरू झाली. टिळकांनी सुद्धा आपल्या केसरी या वृत्तपत्रातून ब्रिटिश सरकार करीत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला. ‘ देशाचे दुर्दैव ‘ ‘ हे उपाय टिकाऊ नाहीत ‘ या अग्रलेखातून त्यांनी ब्रिटिश सरकारवर टीका केली. त्यामुळे टिळकांवर 24 जून 1908 पुन्हा राजद्रोहाचा आरोप करण्यात येऊन खटला दाखल करण्यात आला. यावेळी टिळकांना सहा वर्षे काळया पाण्याची शिक्षा सोबतच 1000 रुपये दंडाची शिक्षा झाली. टिळकांना काळया पाण्याची सजा भोगण्यास मंडालेच्या कारागृहात पाठविले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये जहाल मतवादी आणि मवाळ धोरण असलेले असे दोन गट पडले होते. बाल – पाल – लाल म्हणून इतिहासात प्रसिद्ध असलेले बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपतराय (Lala Lajpat Rai) हे जहाल मतवादी होते. स्वातंत्र्यासाठी अधिक आक्रमकपणे आंदोलने करणे आवश्यक आहे अशा विचाराचे हे नेते होते.

टिळक :  प्राच्यविद्या पंडित / लोकमान्य टिळक यांनी कोणती पुस्तके लिहिली ? Lokmmanya Tilak information in marathi 2021

टिळक हे केवळ पत्रकार आणि स्वातंत्र्य सेनानीच नव्हते तर प्राच्यविद्या पंडितही होते. संस्कृत, गणित आणि खगोलशास्त्र यांचा दांडगा अभ्यास त्यांचा होता. ओरायन आणि अर्क्टिक होम इन द वेदाज या त्यांनी लिहलेल्या ग्रंथावरून आपल्याला अंदाज येतो.
राजद्रोहाचा आरोपाखाली मंडालेच्या कारागृहात असताना त्यांनी गीतारहस्य हा भगवद गीतेवरील समीक्षा असलेला ग्रंथ लिहिला.
1 ऑगस्ट 1920 टिळकांचा मृत्यू झाला आणि भारतीय इतिहासातील टिळक युग संपले.

See also  लाल बहादुर शास्त्री विषयी माहिती 2021 | Full Lal Bahadur Shastri Information In Marathi

आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा.

तुम्ही लाल बहादुर शास्त्री यांच्याबद्दल खालील लिंक द्वारे माहिती घेऊ शकता.

लाल बहादुर शास्त्री विषयी माहिती 2021 | Full Lal Bahadur Shastri Information In Marathi

http://www.marathimahiti.comवेबसाईट ला नक्की भेट दया .

Spread the love

1 thought on “Lokmanya Tilak information in marathi 2021| लोकमान्य टिळक यांच्या विषयी माहिती.”

Leave a Comment