India and Israel 2021 | भारतआणि इस्राईल यांचे संबंध माहिती

इस्राईल हे जगातील एकमेव ज्यू राष्ट्र आहे. इस्राईल हे एक छोटेसे राष्ट्र आहे. पण आज जगातील सामर्थ्यशाली आणि प्रगत राष्ट्रांमध्ये इस्राईलचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. इस्राईल हे राष्ट्र नेहमी चर्चेत राहते ते तेथील कृषीविषयक प्रगत तंत्रज्ञान आणि इस्राईलचा अरब राष्ट्रांसोबत सततचा संघर्ष. १९४८ ला अस्तित्वात आलेल्या या प्रगत राष्ट्रासोबत भारताचे संबंध उत्तरोत्तर घनिष्ठ होत आहेत. आजच्या या लेखात आपण India and Israel 2021 म्हणजेच भारत आणि इस्राईल संबंध माहिती बाबत माहिती जाणून घेवु या.

India and Israel 2021
सौजन्य livemint.com

                India and Israel 2021 | भारत आणि इस्राईल संबंध माहिती

१९४८ ला संयुक्त राष्ट्र संघात जेव्हा इस्राईलला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव सादर झाला तेव्हा भारताने त्याविरुद्ध मतदान केले. परंतु नंतर १७ सप्टेंबर १९५० ला भारताने इस्राईलला अधिकृतपणे मान्यता  दिली. त्यानंतरही बरीच वर्षे भारताचे इस्राईलसोबत राजनैतिक संबंध नव्हते.

 

प्रत्येक देश आपले परराष्ट्रीय धोरण राष्ट्रहित समोर ठेवूनच करीत असतो. दुसऱ्या महायुद्धात खुप विनाश झाला. अनेक प्रगत राष्ट्र या विनाशातुन सावरू शकले नाहीत.

युद्धाचे हे भयंकर परिणाम लक्षात घेऊनच भारत आणि इतर नुकतेच स्वतंत्र झालेले गरीब देश यांनी एकत्र येवून जागतिक महासत्ता आणि त्यांच्या जीवघेण्या स्पर्धा आणि परिणामता होणारे युद्ध यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच अलिप्तता चळवळ उभारल्या गेली. यामध्ये भारत, इजिप्त हे प्रमुख राष्ट्र होती. तत्कालीन आंतरराष्ट्रीय परिस्थिती बघता भारताचा निर्णय योग्य होता. याचे सर्व श्रेय भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना द्यावे लागेल.

भारताचे इस्राईलसोबत अधिकृतपणे राजनैतिक संबंध प्रस्थापित लवकर झाले नाहीत त्यामागे तत्कालीन आंतरराष्ट्रीय परिस्थिती कारणीभूत होती. भारत आणि इजिप्तचे संबंध मित्रत्वाचे होते. अलिप्तता चळवळीत इजिप्त हा भारताचा प्रमुख सहकारी होता. परंतु इस्राईलचे सुरुवातीपासूनच अरब राष्ट्रांसोबत वैर होते. त्यांच्यात नेहमीच युद्ध होत होते. इकडे भारताला अरब राष्ट्रांना दुखवणे परवडणारे नव्हते. कारण भारताला तेलासाठी अरब राष्ट्रांवरच अवलंबून राहावे लागते. दुसरे प्रमुख कारण असे की, सुरुवातीपासुन इस्राईल हा अमेरिकेच्या गोटातील आहे. तर भारताचा कल हा सोव्हिएत यूनियन ( रशिया ) कडे आहे.

See also  लाल बहादुर शास्त्री विषयी माहिती 2021 | Full Lal Bahadur Shastri Information In Marathi

मात्र कालांतराने परिस्थिती बदलत गेली. आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणी कुणाचा दीर्घकाळ शत्रू वा मित्र राहू शकत नाही. परिस्थितीनुरूप राष्ट्राचे परराष्ट्रधोरण बदलत असते. त्यानुसारच एकेकाळी दूर असलेला इस्राईल आज भारताचा मित्र झाला आहे.

भारताचे इस्राईलसोबत अधिकृतपणे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले ते १९९२ साली तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या काळात. मात्र प्रत्यक्षात पंधरा वर्षे आधीच भारताचे इस्राईलसोबत संबंध गुप्तपणे प्रस्थापित झाले होते.

सौजन्य indianexpress.com

भारत आणि इस्राईल यांचे बदलत्या काळातील संबंध :

इस्राईलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले. त्यांनी जूलै २०१७ ला इस्राईलला भेट दिली होती. त्याभेटी आधी न्यूयार्क येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या वेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांची भेट झाली होती. त्या भेटीनंतर इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनीही जानेवारी २०१८ ला भारताला भेट दिली.

आयसिस या इस्लामिक कट्टरपंथी दहशतवादी संघटनेचा उदय झाल्यानंतर भारत आणि इस्राईल एकमेकांच्या खुप जवळ आले. आपल्या भारतासमोर सुद्धा दहशतवाद ही प्रमुख समस्या आहे. त्यात पाकिस्तान आणि चीन यांच्यासोबत भारताचे युद्धे झालेली आहेत. दोन्ही शत्रु राष्ट्रांच्या सीमेवर नेहमीच नेहमीच तणाव राहतो. चीन भारतीय हद्दीत घूसखोरी करतो तर पाकिस्तानला लागुन असलेल्या सीमेवर नेहमी चकमकी सुरु असतात आणि दहशतवादी सुद्धा घूसखोरी करीत असतात. स्वरक्षणासाठी भारताला आपले लष्करी सामर्थ्य वाढविणे भाग पडले. त्यामुळे भारताला इतर देशांकडून शस्त्रे खरेदी करावी लागतात. अलीकडे भारत इस्राईलकडून खुप मोठ्या प्रमाणात शस्त्रे खरेदी करीत आहे. इस्राईलचा  शस्त्रास्त्र खरेदीत भारत प्रथम क्रमांकाचा ग्राहक आहे. रशियानंतर भारत इस्राईलकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे खरेदी करतो.

शस्त्रास्त्रेशिवाय इस्राईल भारताला कृषी आणि सिंचन क्षेत्रातील अद्यायावत माहिती आणि तंत्रज्ञान देतो. इस्राईल भारताला आरोग्य,जैव-तंत्रज्ञान आणि नॅनो-तंत्रज्ञान या क्षेत्रातील देखील प्रगत तंत्रज्ञान पुरवितो. थोडक्यात दोन्ही देशात राजनैतिक,सांस्कृतिक,आर्थिक आणि सामरिक क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढले आहे.

See also  World Red Cross Day Information In Marathi 2021 | आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस सोसायटीबद्दल माहिती

पूर्वी भारताने आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर संयुक्त राष्ट्र संघात इस्राईल विरोधात बाजु घेतली असेल परंतु आता भारत उघडपणे इस्राईलची बाजु घेतांना दिसत आहे. सध्या दोन्ही देशांमधील बळकट होताना दिसून येते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू या दोन्ही नेत्यांनी एकमेकांविषयी विश्वास दाखवत दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ केले आहेत.

आज आंतरराष्ट्रीय राजकारणात इस्राईल भारताचा प्रमुख मित्र आहे. भारताच्या पाठीशी इस्राईल भक्कमपणे उभा असतो.

आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते जरुर कळवा.

तुम्ही याबद्दलही माहिती खालील लिंक द्वारे घेवु शकता.

छत्रपती शिवाजी महाराजांची सुरतेवरील पहिली स्वारी माहिती 2021 | Shivaji Maharaj Attack On Surat In Marathi

http://www.marathimahiti.com  या वेबसाइट ला ही तुम्ही भेट देवू शकता.

Spread the love

Leave a Comment