First Newspaper In India – Bengal Gazette Information 2021| भारतातील पहिले वृत्तपत्र – बंगाल गॅझेट माहिती मराठी

First Newspaper In India – Bengal Gazette Information 2021 | भारतातील पहिले वृत्तपत्र – बंगाल गॅझेट माहिती मराठी

आपल्या भारतात वृत्तपत्राला सुरुवात अठराव्या शतकातच झाली. मात्र प्रकाशित झालेले हे वृत्तपत्र भारतीय व्यक्तीने केले नाही  किंवा भारतीय भाषेत झाले नाही. भारतात प्रकाशित झालेले पहिले वृत्तपत्र हे इंग्रजी भाषेतील बंगाल गॅझेट आहे. आजच्या या लेखात आपण First Newspaper In India – Bengal Gazette Information 2021 म्हणजेच भारतातील पहिले वृत्तपत्र – बंगाल गॅझेट माहिती मराठी याबाबत माहिती घेवु या.

First Newspaper In India - Bengal Gazette Information 2021
First Newspaper In India – Bengal Gazette Information 2021

१७५७ मधील प्लासीच्या लढाईनंतर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता बंगालमध्ये बळकट झाली. याच ईस्ट इंडिया कंपनीतील एक कर्मचारी जेम्स आगस्टस हिक्की याने कोलकाता येथे बंगाल गॅझेट हे वृत्तपत्र १७८० साली सुरु केले. बंगाल गॅझेट हे एक साप्ताहिक होते. येथून भारतात वृत्तपत्राची सुरुवात झाली. हिक्की गॅझेट म्हणुनही बंगाल गॅझेट First Newspaper In India  – Bengal Gazette Information 2021 हे ओळखल्या जात होते.

हिक्की गॅझेटच्या प्रवेशांकमध्ये जेम्स आगस्टस हिक्की याने स्वताला ऑनरेबल कंपनीचा मुद्रक म्हणून घोषित केले होते.  बंगाल गॅझेट सुरु करण्यामागील कारण स्वता हिक्कीने सांगितले होते. हिक्कीने स्पष्ट केले होते की, ईस्ट इंडिया कंपनीमधील अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचार आणि लुट याला वाचा फोडण्यासाठी पत्रकारितेचे कार्य सुरु केले.

बंगाल गॅझेटच्या पहिल्या अंकात जेम्स आगस्टस हिक्की याने बंगाल गॅझेट हे साप्ताहिक सुरु करण्यामागील उद्देश सांगितला होता. त्या अंकात हिक्की म्हणतो, ” A weekly political and commercial paper, open to all parties but influenced by none.” म्हणजे बंगाल गॅझेट साप्ताहिक सुरु करण्यामागील उद्देश हा राजनितिक आणि व्यावसायिक होता, हे स्पष्ट होते.

संपादकाच्या नवे स्तंभ लेखन सुरु करणे याची सुरुवात बंगाल गॅझेट पासूनच झाली. या स्तंभ लेखनातून जनतेच्या भावना व्यक्त करणे याची सुरुवात भारतात झाली. फिलन थ्रोप्स  याने २५ मार्च १७८० च्या प्रकाशित झालेल्या अंकामधील संपादकीय लेखात कोलकात्यामधील पोर्तुगीज स्मशान भूमीमधील अस्वच्छतेबद्दल लिहले होते.

See also  Information About Commonwealth Of Nations 2021 | राष्ट्रकुलबाबत माहिती

तत्कालीन ईस्ट इंडिया कंपनीमधील अधिकाऱ्यांनी कंपनीच्या व्यापरासोबतच खाजगी व्यापर सुरु केला होता. शिवाय भ्रष्टाचार आणि लुट ही चालूच होती. जेम्स आगस्टस हिक्की याने या सर्व बाबी उजेडात आणल्या. वृत्तपत्राच्या माध्यमातून हिक्की याने या अधिकाऱ्यांचा भंडाफोड केला. त्यामुळे त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी हिक्कीला या कार्यापासून रोखण्याचा भरपूर प्रयत्न केला.

First Newspaper In India - Bengal Gazette Information 2021
First Newspaper In India – Bengal Gazette Information 2021

जेम्स आगस्टस हिक्की हा खरोखरच एक हाडाचा पत्रकार होता असे वाटते. त्या काळात हिक्कीने खुप मोठी हिम्मत दाखविली होती. भारताचा पहिला गवर्नर जनरल वारेन हेस्टिंग्स याने जनरल पोस्ट ऑफिसद्वारे बंगाल गॅझेटच्या वितरणावर बंदी घातली. याला कारण असे होते की, हिक्की याने ईस्ट इंडिया कंपनीमधील काही प्रमुख अधिकाऱ्यांच्या खाजगी बाबतीत कठोर शब्दात टिका केली होती.

एवढे होवुनही हिक्की थांबला नाही. त्याने गवर्नर जनरल वारेन हेस्टिंग्स याच्यावरही टिका करणे सुरु केले. हिक्की या आपल्या बंगाल गॅझेटमध्ये वारेन हेस्टिंग्स याला विविध नावांनी संबोधित केलेले आढळते. हिक्कीने वारेन हेस्टिंग्स याचा उल्लेख Mr. Wronghead, The dictator, The Great Moughal  अशी विशेषणे वापरून केला आहे.

बंगाल गॅझेटच्या एका अंकात हिक्की याने वारेन हेस्टिंग्स , त्याची पत्नी आणि मुख्य न्यायाधीश  सर एलीज इम्पी यांचे चरित्रहनन केले. त्यामुळे हिक्की याच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला. हिक्कीवरील आरोप सिद्ध झाले. हिक्कीला दंड द्यावा लागला तसेच तुरुंगात पण जावे लागले. हिक्कीच्या प्रेसवर यूरोपियन समुदायाने हल्ला केला.

आपल्यावर झालेले आरोप, दंड आणि तुरुंगवास यामुळे हिक्की पुरता खचला. गवर्नर जनरल वारेन हेस्टिंग्स याने हिक्कीची पुरती कोंडी केली. जनरल पोस्ट ऑफिसद्वारे बंगाल गॅझेटच्या वितरणावर बंदी घालणे, बंगाल गॅझेटचा सरंक्षक फिलिप फ्रांसिस याला नेमके हिक्कीच्या कठिण काळातच इंग्लॅण्डला जावे लागले.हिक्की पुरता एकटा पडला. सोबत कोणी नाही, शासन विरोधात आणि यूरोपियन समुदाय पण विरोधात गेला होता.

गवर्नर जनरल वारेन हेस्टिंग्स याने बंगाल गॅझेटच्या प्रकाशनासाठी उपयोगात आणले जाणारे टाइप्स जप्त केले तसेच हिक्कीच्या प्रेसवरही बंदी घातली. अशाप्रकारे मार्च १७८२ ला बंगाल गॅझेटचे प्रकाशन बंद झाले.

See also  India's First Nuclear Test 1974 Information In Marathi | भारताची अणुचाचणीकडे  यशस्वी वाटचाल

२९ जानेवारी १७८० ते १६ मार्च १७८२ यादरम्यानच बंगाल गॅझेटचे प्रकाशन झाले असे म्हणतात. बंगाल गॅझेटचे प्रकाशित झालेले सर्व अंक उपलब्ध नाहीत. २९ जानेवारी १७८० आणि ५ जानेवारी १७८२ चे प्रकाशित झालेले अंक कोलकाता येथील दुर्मिळ ग्रंथ संग्रह असलेले राष्ट्रीय पुस्तकालयमध्ये संग्रहित आहेत.

जेम्स आगस्टस हिक्कीच्या बंगाल गॅझेटच्या रुपाने भारतातील पहिले वृत्तपत्र सुरु झाले आणि लगेच बंदही झाले. मात्र भारतात वृत्तपत्राची सुरुवात झाली. त्यानंतर मुंबई,चेन्नई, आणि दिल्ली याठिकाणी सुद्धा इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांमध्ये वृत्तपत्रे सुरु झाली.

आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते जरुर कळवा.

तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या वेबसाईट ला भेट दया .

तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्या बद्दल माहिती घ्यायची असेल तर तुम्ही खालील लिंकवरून माहिती घेवु शकता.

Lokmanya Tilak information in marathi 2021| लोकमान्य टिळक यांच्या विषयी माहिती.

Spread the love

2 thoughts on “First Newspaper In India – Bengal Gazette Information 2021| भारतातील पहिले वृत्तपत्र – बंगाल गॅझेट माहिती मराठी”

Leave a Comment