अलेक्झांडर द ग्रेट विषयी माहिती 2021 | Full Alexander The Great In Marathi

अलेक्झांडर द ग्रेट चे भारतावरील आक्रमण | Alexander The Great In Marathi

अलेक्झांडर द ग्रेट विषयी माहिती 2021 | Full Alexander The Great In Marathi

प्राचीन काळात ग्रीस या देशामध्ये  नगरराज्ये होती. या नगरराज्यात मॅसिडोनिया हे एक नगरराज्य होते. या मॅसिडोनियाचा राजा फिलिप दूसरा होता. ग्रीसमधील इतर नगरराज्ये मॅसिडोनियाच्या वर्चस्वाखाली होती. परंतू त्याचा खून झाल्यावर मॅसिडोनियाचा राजा त्याचा मुलगा अलेक्झांडर उर्फ सिकंदर हा बनला ( इ.स.पूर्व ३३६). त्याने आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने ग्रीसमधील अस्थिर परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर तो जग जिंकण्याच्या उद्देशाने निघाला. जग जिंकण्याच्या मोहिमेत अलेक्झांडरने भारतावर आक्रमण केले. त्याबाबतची माहिती आपण आजच्या या लेखात बघणार आहोत.

अलेक्झांडरच्या आक्रमणावेळी उत्तर भारतातील राजकीय परिस्थिती :

अलेक्झांडरच्या आक्रमणावेळी भारतामध्ये मगधचे विशाल आणि प्रबळ साम्राज्य होते. मगधच्या नंद घराण्याची सत्ता भारताच्या बऱ्याच मोठया भूभागावर होती. परंतू मगध साम्राज्याचे सिंध आणि पंजाब या प्रदेशांवर वर्चस्व नव्हते. त्या ठिकाणी अनेक छोटी छोटी राज्ये अस्तित्त्वात होती. तत्कालीन ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणात तेथे असलेल्या राज्यांचा उल्लेख होतो. त्यानुसार  काबुल नदीच्या उत्तर दिशेला असलेल्या डोंगराळ प्रदेशात  अश्र्वक, आश्र्वकायन अशी सामर्थ्यशाली राज्ये होती.

हस्ती हे राज्य प्रसिद्ध अशा खैबर खिंडीजवळ होते. याशिवाय अभिसार,पौरव, शिबी, कठ,शुद्रक आणि अग्रश्रेणी ही देखील छोटी मोठी राज्ये होती. ही राज्ये सिंधू,चिनाब,झेलम आणि रावी या जगप्रसिध्द नद्यांच्या खोऱ्यात होती. या राज्यांमध्ये आपापसात वारंवार संघर्ष होत होते. त्यामुळे त्या प्रदेशांत राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. परकीय आक्रमणास ही अस्थिरता अनुकूल होती. याचाच फायदा जग जिंकायला निघालेल्या अलेक्झांडर झाला.

अलेक्झांडरचे भारतावरील प्रत्यक्ष आक्रमण :

मॅसिडोनियाचे राज्य हातात आल्यावर अलेक्झांडरने इतर ग्रीक राज्यांवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर त्याने इराण सोबत जवळपास सात वर्षे संघर्ष करून इराणचा पराभव केला. इराण जिंकल्यानंतर त्याने आपला मोर्चा आशियाकडे वळविला. आशिया मायनर पासून ते अफगाणिस्तान पर्यंतचा भूभाग त्याने आपल्या साम्राज्यात सामील करून घेतला. त्यावेळेस त्याने अफगाणिस्तानमध्ये कंदाहार शहर वसविले. त्यावेळेस कंदाहारला अलेक्झांड्रिया असे नाव होते ते कालांतराने कंदाहार म्हणून प्रचलित झाले.

See also  पहिला चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य विषयी माहिती 2021 | Chandragupta Maurya Story In Marathi

काही कालावधीतच म्हणजे इ. स. पू ३२७ मध्ये अलेक्झांडरने हिंदकुश पर्वत पार केला. त्यावेळेस त्याला आश्र्वकांच्या सैन्याचा सामना करावा लागला. शेवटी जबरदस्त प्रतिकार केल्यानंतर अश्र्वकांचा पराभव झाला. त्यानंतर अलेक्झांडरला अश्र्वकायन यांनी  रोखले. परंतु तिखट प्रतिकार केल्यानंतर ही अश्र्वकायन जिंकू शकले नाहीत. अश्वक आणि अश्र्वकायन ही छोटी राज्ये होती. मात्र त्यांनी अलेक्झांडरच्या सैन्याला जबरदस्त प्रतिकार केला. त्यामुळे ग्रीक इतिहासकार अलेक्झांडरचा भारतातील पहिला मोठा विजय मानतात. अश्वक आणि अश्र्वकायन या राज्यांतून अलेक्झांडरने सुमारे दोन लाख तीस हजार उत्कृष्ट जातीचे बैल मॅसिडोनियाला पाठविले.

अलेक्झांडर द ग्रेट विषयी माहिती 2021 | Full Alexander The Great In Marathi

अलेक्झांडरला सुरुवातीलाच प्रखर विरोधाचा सामना करावा लागला होता. अश्वक आणि आश्र्वकायान यांच्यानंतर हस्तीचे राज्य अलेक्झांडरला सामोरे आले. जवळपास तीस दिवस प्रखर प्रतिकार केल्यावर हस्तिचे राज्य पडले. हस्तीचा राजा मृत्यू पावल्यावरच अलेक्झांडरला हे राज्य जिंकता आले.

भारताच्या सीमेवरील पहाडी राज्यांचा पराभव केल्यानंतर  अलेक्झांडरने सुमारे इ. स. पू. ३२६ मध्ये सिंधू नदीच्या काठी आपला डेरा टाकला.  आता लवकरच त्याला तक्षशिलेच्या अंभी आणि पोरस यासारख्या पराक्रमी राजांना तोंड द्यायचे होते. मात्र आपल्या भारताला असलेला शाप आडवा आला. अंभी आणि पोरस यांचे शत्रुत्व होते. पोरसला हरवायचे या उद्देशाने अंभी युद्ध न करताच अलेक्झांडरला  शरण जावून त्याचे स्वागत केले. आपल्याच देशातील पोरसपेक्षा हा परकीय अलेक्झांडर जो आपला देश जिंकायला आलेला होता, तो जवळचा वाटला. घोर नामुष्की. अशा या देशद्रोह करण्याच्या परंपरेची  येथून सुरुवात झाली.

अंभिचे पाहून शिशुगुप्त, अभीसार या राजांनी सुद्धा न लढताच आपली तलवार अलेक्झांडरपुढे झुकविली. आपापसात लढणारे हे राजे. मात्र अलेक्झांडर पुढे सपशेल शरणागती पत्करली या पराक्रमी राजांनी. परंतु स्वाभिमानी पोरसने आपली मान, झेंडा आणि तलवार ताठ ठेवली. तो एकट्याच्या बळावर अलेक्झांडरच्या जगजेत्या सैन्याला तोंड द्यायला तयार झाला.

झेलमचे जगप्रसिध्द युद्ध :

स्वाभिमानी पोरस आणि जग जिंकायला निघालेल्या अलेक्झांडर यांच्यात झेलम नदीच्या तिरी जागतिक इतिहासात प्रसिध्द असलेले ‘ झेलमचे युद्ध ‘ झाले.  झेलम नदीच्या एका तीरावर पोरस तर दुसऱ्या तीरी अलेक्झांडरने आपापल्या सैन्यासह तळ दिला. पोरसच्या सैन्यात सुमारे  तीस हजार पायदळ , चार हजार घोडदळ होते तसेच तीनशे रथ आणि दोनशे हत्ती होते. तिकडे अलेक्झांडरच्या सैन्यात देखील सुमारे पस्तीस हजार सैन्य होते. या पराक्रमी सैन्यात घोडदळ तर होतेच शिवाय शस्त्र सामुग्रीने सुसज्ज होते. हे जगप्रसिध्द युद्ध ऐन पावसाळ्यात झाले. झेलम नदी दुधळी भरून वाहत होती. झेलमचे पात्र ओलांडून पलीकडे अलेक्झांडर येणार नाही असा पोरस चा अंदाज होता.

See also  Chankyachya Gupther vishakanya | चाणक्य विष कन्यांचा उपयोग कसा करायचे ?

त्यामुळे पोरसचे सैन्य पूर्णपणे गाफील राहिले. मात्र अलेक्झांडर खरोखरच एक उत्तम सेनापती होता. त्याने आपल्या सैन्यामधून निवडक पण पराक्रमी घोडदळ घेऊन झेलमच्या उगमाकडे गेला. जेथून कमी रुंदीचे पात्र होते आणि त्याचे घोडदळ येऊ शकत होते तेथून झेलम पार केली. अलेक्झांडरच्या या अकस्मात आक्रमणाने पोरसचे सैन्य गळबाळून गेले. अलेक्झांडरच्या सैन्याला रोखण्यासाठी पोरसने आपला पुत्र पाठविला. परंतु पोरसच्या पुत्राने पराक्रमाची शर्थ करूनही तो अलेक्झांडरला रोखू शकला नाही. झालेल्या घनघोर रणसंग्रामात पोरसचा पुत्र हा विरगतीस प्राप्त झाला.

अलेक्झांडरने पुढे येऊन पोरसच्या सैन्यावर जबरदस्त हल्ला केला. झालेल्या पावसाने सर्वत्र चिखल झाला होता. पोरसच्या सैन्यास वेगवान हालचाली करता येत नव्हते. त्याचे रथ चिखलात रुतून बसले. हत्ती देखील फारशी हालचाल करू शकत नव्हते. अलेक्झांडरच्या सैन्याने केलेल्या बाणांच्या हल्ल्याने हत्ती बिथरले. आपल्याच सैन्याला तुडवू लागले. अलेक्झांडरने आपल्या घोडदळ चा उत्कृष्टपणे वापर केला. या घनघोर रणसंग्रामात राजा पोरस जखमी झालेल्या अवस्थेत अलेक्झांडरच्या हाती सापडला. राजा पोरसने पराक्रमाची शर्थ केली. परंतु अलेक्झांडरचा निर्णायक विजय झाला. राजा पोरस त्याच्या हाती सापडला.

राजा पोरस युद्ध हरला पण अंभीसारखी नामुष्की त्यानं पत्करली नाही. उलट साखळदंडांनी बांधून अलेक्झांडरच्या सामोरे आल्यावर त्याने बाणेदारपणा दाखविला. अलेक्झांडरच्या ‘ मी तुझ्याशी कसे वागावे ‘ या प्रश्नाला बाणेदारपणे उत्तर दिले. ‘ एका राजा दुसऱ्या राजास जसे वागवतो तसे वागवावे ‘ या स्वाभिमानीे उत्तराने अलेक्झांडर प्रभावित झाला. त्याने ताबोडतोब राजा पोरसला बंधनातून मुक्त केले आणि राजा सारखा मन दिला. शिवाय जिंकलेले राज्यही परत दिले. अर्थात यामागे अलेक्झांडरचा हेतू हा होता की भारतातील इतर राजांनी युद्ध न करताच त्याला शरण यावे हा होता.

अलेक्झांडरची माघार आणि मृत्यू :

सुरुवातीच्या विजयांनी अलेक्झांडरचा आत्मविश्वास वाढला. मात्र अलेक्झांडरच्या सैन्याने बियास नदीच्या तीरावर आल्यावर पुढे जाण्यास विरोध केला. दीर्घकाळापासून त्याचे सैन्य आपल्या मातृभूमी पासून दूर होते. सततच्या युद्धाने त्याचे सैन्य थकले होते. प्रत्येक युध्दात अलेक्झांडरच्या सैन्याला प्रखर प्रतिकार झाला. भारतातील छोट्या छोट्या राज्यानीच अलेक्झांडरच्या सैन्याला कडवी झुंज दिली. यापुढे तर बलाढ्य अशा मगधच्या सैन्यास तोंड द्यायचे होते. मगधच्या नंद सम्राटाच्या सैन्याचे लष्करी सामर्थ्य ऐकून अलेक्झांडर च्या सैन्याचे मनोबल खचले. अलेक्झांडरने प्रयत्न करूनही तो आपल्या सैन्याचे मनोबल वाढवू शकला नाही. त्यामुळे त्याने इ. स. पू. ३२६ मध्येच भारतातून परत जाण्याचा निर्णय घेतला.

See also  मौर्य साम्राज्याची प्रशासन व्यवस्था 2021 | Full History Of Maurya Empire In Marathi

अलेक्झांडर द ग्रेट विषयी माहिती 2021 | Full Alexander The Great In Marathi

अलेक्झांडरने भारतातील पुढील मोहीम रद्द केली आणि परतीची तयारी केली. आपल्या देशात जाण्यापूर्वी त्याने भारतात जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावली. त्याने त्या प्रदेशाचे एकूण सात भागात विभाजन केले. त्यावर स्वतंत्र अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. तसेच आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या पाडल्या. परतीचा प्रवास त्याने जलमार्गाने केला. झेलम आणि सिंधू नदी होड्यातून पार करीत समुद्रमार्गे परत जाण्याचे त्याने ठरविले. परतीच्या प्रवासात अनेक समस्या आणि हल्ल्यांना त्याला सामोरे जावे लागले. झेलम आणि चिनाब नदीच्या संगम जेथे होतो तेथे त्याच्यावर क्षुद्रक आणि मल्लव तसेच शिवी आणि अर्जुनायन  या टोळ्यांनी हल्ले केले. परंतु अलेक्झांडरने त्यांचा पराभव केला. पुढे तो ग्रेड्रेसिया मार्गे बाबिलोनियकडे गेला आणि तेथेच त्याचा अंत झाला. (इ. स.पू.३२३)

जग जिंकायला निघालेल्या या महान राजाला शेवटी भारत जिंकता आला नाही. शेवटी तेथून माघार घेऊन नैराश्याच्या गर्तेत सापडला आणि त्यातच त्याचा अंत झाला.

आपण ह्या पोस्ट मध्ये अलेक्झांडर द ग्रेट बद्दल माहिती घेतली . तुम्हाला जर SINDHU SANSKRUTI HISTORY IN MARATHI बद्दल माहिती जाणून घायची असेल तर तुम्ही हि पोस्ट वाचू शकता .

तुम्हाला मराठी निबंध म्हणजेच essay in marathi हवे असतील तर Gyangenix वेबसाईट ला नक्की भेट दया .

 

Spread the love

6 thoughts on “अलेक्झांडर द ग्रेट विषयी माहिती 2021 | Full Alexander The Great In Marathi”

Leave a Comment