प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे विषयी माहिती 2021 | Full Information About Mahajanpade In Marathi

प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे | Mahajanpade In Marathi

इ.स.पूर्व सहावे शतक हे प्राचीन भारताच्या इतिहासातील एक महत्वाचे शतक आहे. सांस्कृतिक,धार्मिक आणि राजकीयदृष्टया हे शतक खूप महत्वाचे आहे. प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांची माहिती म्हणजेच Mahajanpade In Marathi तत्कालीन बौध्द आणि जैन धर्माच्या प्रारंभीच्या धर्मग्रंथातून मिळते. आजच्या या लेखात आपण  प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांची माहिती म्हणजेच Mahajanpade In Marathi बघुया.

महाजनपद म्हणजे काय | what is Mahajanpade In Marathi

उत्तर वैदिक काळात अस्तित्वात असलेल्या एका विशिष्ट राज्यपध्द्तीस महाजनपद असे म्हणत असत. इ.स. पू. सहाव्या शतकात प्राचीन भारतामध्ये  अनेक लहानमोठी राज्ये स्थापन झाली होती. त्यावेळी कोणतेही बलिष्ट असे एकछत्री सार्वभौम राज्य नव्हते.त्यामुळे ही लहान राज्ये स्वतंत्र होती. ही राज्ये म्हणजे मूलतः अनेक कुटुंबांचा समूह असलेल्या कुलांतुन निर्माण झालेली होती. या कुलांतुन विश,गण किंवा जन निर्माण झाले. जनामधील सर्व कुटुंबे ही एकाच कुळाशी निगडित होती. त्या कुटुंबांना आपल्या जनाबद्दल आत्मीयता तसेच अभिमान वाटत असे. त्यातूनच जनपतींनी आपल्या जनाच्या उत्कर्षासाठी विशिष्ट भूप्रदेशावर आपले वर्चस्व स्थापन करायला सुरुवात केली.

हे ही वाचा महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य 

या वर्चस्वाच्या चढाओढीत त्या जनांमध्ये आपापसात संघर्ष, लढाया होऊ लागली. साहजिकच लहान व दुर्बळ असलेली जनपदे युध्दामध्ये पराजित होउन एकतर नष्ट होत.नाहीतर सामर्थ्यशाली जनांचे वर्चस्व मान्य करून त्यात विलीन होत. वर्चस्वाच्या या स्पर्धेतून लहान जनपदे नष्ट झाली. तर सामर्थ्याच्या जोरावर काही जनपदे महाजनपदे बनली. यामध्ये मगध, कोसल या राज्यांचा उल्लेख करावा लागेल.

प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे विषयी माहिती 2021 | Mahajanpade In Marathi

  सोळा महाजनपदे | Mahajanpade In Marathi

१) अंग :

आजच्या बिहार राज्यातील भागलपूर व मोंगीर जिल्हयाचा प्रदेश हा प्राचीन अंग राज्याचा प्रदेश होता.  चंपा हे नगर अंग राज्याची राजधानी होती. त्यावेळी चंपा नगरी व्यापारासाठी प्रसिध्द होते. प्रारंभीच्या काळात अंग राज्य सामर्थ्यवान होते.परंतू अंगपेक्षा सामर्थ्यवान असलेल्या मगध राज्याने नंतरच्या काळात अंगवर विजय मिळवून ते आपल्या राज्यात समाविष्ट केले.

हे ही वाचा अलेक्झांडरचे भारतावरील आक्रमण

See also  Nalanda University History In Marathi 2021 | नालंदा विद्यापीठाचा इतिहास

२) काशी :

काशीला वाराणसी असेही म्हटले जाते. उत्तर दिशेला वरुणा व दक्षिण दिशेला असी या दोन नद्यांमधील प्रदेश म्हणजे काशीचे राज्य होय. प्रारंभी काशी हे राज्य वैभवशाली आणि सामर्थ्यवान होते. परंतु कोसल राजाने काशी राज्याचा पराभव करुन ते आपल्या राज्यात समाविष्ट करून घेतले.

३) कोसल :

स्वातंत्रपूर्व काळातील अयोध्या प्रांत आणि आजच्या काळात उत्तर प्रदेशातील अवधचा प्रांत म्हणजेच कोसल राज्य होय. कोसल राज्य हे विशाल असे राज्य होते. परंतू शरयू नदीमूळे उत्तर व दक्षिण असे दोन भाग झाले होते. उत्तरेस श्रावस्ती व दक्षिणेस कुशावती अशा दोन राजधान्या या राज्यास होत्या.  काशीचे राज्य जिंकल्यावर कोसलचे सामर्थ्य वाढले. शाक्य जमातीचा पराभव केल्याने कोसलच्या राज्याचा अधिकच विस्तार झाला. प्रसेनजित हा कोसल राज्याचा प्रसिध्द राजा होउन गेला. प्रसेनजितच्या काळात कोसलचा विस्तार झाला आणि कोसल राज्य सामर्थ्यशाली बनले.

हे ही वाचा कुमारी कंदम काय आहे ?

४) वज्जी किंवा वृज्जी :

आजच्या काळातील उत्तर बिहारमध्ये विदेह,लिच्छवी, ज्ञातृक, वृज्जी यांसारख्या आठ-नऊ जमातींचे वज्जी हे संघराज्य होते. या संघराज्याची राजधानी वैशाली ही  होती. प्रारंभीच्या काळात मगध व वैशाली यांच्यात शत्रुत्व होते ; परंतू मगधचा राजा बिंबिसार याने वैशालीच्या राज्याच्या कन्येशी विवाह केला. त्यामुळे यां राज्यांमध्ये चांगले संबंध  निर्माण झाले. परंतू पुढे बिंबिसारचा पुत्र अजातशत्रु याने वज्जी या संघराज्याचा पराभव करुन ते आपल्या राज्यात समाविष्ट करुन घेतले.

५) मल्ल :

मल्ल हे राज्य उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्याच्या परिसरात होते. कुशीनगर ही या राज्याची राजधानी होती. कुशीनगर खेरीज पावा हे नगर देखील महत्वाचे होते. मल्लांच्या एकुण नऊ जमाती किंवा टोळ्या होत्या. पुढे मगधच्या राज्याने मल्लांचा पराभव करुन त्यांना आपल्या राज्यात समाविष्ट केले. तथागत गौतम बुध्द यांचे महापरिनिर्वाण कुशीनगर येथेच झाले.

हे ही वाचा सिंधू संस्कृती 

६) मगध :

मगध हे त्या काळातील सर्वात बलशाली राज्य होते. आताच्या बिहार राज्यातील पाटणा व गया या जिल्ह्यातील प्रदेशांवर मगधचे राज्य होते. शिवाय मगध साम्राज्याच्या सीमा आधुनिक भारताच्या बिहार, झारखंड उत्तर प्रदेश आणि नेपाळच्या काही भागापर्यंत पसरल्या होत्या. मगधची राजधानी पूर्वी राजगृह, गिरिवज्र होत्या , नंतर ती पाटलीपुत्र बनली. मगध हे प्राचीन काळात राजकीय, सामाजिक आणि धार्मिकदृष्टया केंद्रबिंदु राहिलेआहे.

पुराणानुसार मगधवर आठ राजघराण्यांनी मगधावर राज्य केले. तथापि ऐतिहासिकदृष्ट्र्या पुराणातील माहिती गृहीत धरता येणार नाही. मात्र रिपुजय या राजानंतर बिंबिसार हा मगधचा राजा बनला यावर विद्वानांचे एकमत आहे. बिंबिसारने विवाहसंबंध प्रस्थापित करुन कोसल,काशी, मद्र विदेह इत्यादी राज्ये आपल्या राज्याच्या वर्चस्वाखाली आणली. अंग राज्याचा पराभव करून त्याने आपले साम्राज्य अधिक बलशाली केले.

See also  सिंधू संस्कृती व हडप्पा संस्कृती माहिती 2021 | Full Haddapa Sanskruti In Marathi | Sindhu Sanskruti History In Marathi

बिंबिसारनंतर त्याचा पुत्र अजातशत्रु हा कर्तबगार आणि महत्वाकांक्षी निपजला. अजातशत्रुने कोसलचा राजा प्रसेनजित याचा पराभव करून त्याच्या मुलीशी विवाह केला आणि सोबतच काशीचे राज्यही मिळविले. लिच्छवी गणराज्यासोबत युध्द करून ते गणराज्य आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले. अजातशत्रुने मगधचे साम्राज्य हिमालयापासून ते दक्षिणेस विंध्य पर्वतापर्यंत वाढविले.

नंतरच्या काळात अजातशत्रुने बौध्द धर्माचा स्वीकार करुन राजगृह येथे पहिली बौध्द धर्मपरिषद भरविली. अजातशत्रु हा उत्कृष्ट सेनानी तर होताच सोबत मुत्सद्दी पण होता. त्या बळावरच त्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार करून आपले राज्य बलशाली बनविले.

अजातशत्रुनंतर बरेच राजे मगधाच्या राजगादीवर बसले. त्यातील  शिशुनाग या राजाने मगधला पुन्हा पूर्वीचे वैभव प्राप्त करून दिले. त्याने कोसल,वत्स आणि काशी या राज्यांचा पराभव केला. इ.स.पू. ३६४ ते ३२४ नंदराजांनी मगधवर राज्य केले. चंद्रगुप्त मौर्याने शेवटचा नंदराजा धनानंद याचा पराभव करून मौर्य साम्राज्याची स्थापना केली.

थोडक्यात प्राचीन भारताच्या राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात मगध साम्राज्याचा उदय ही एक अंत्यत महत्वाची ऐतिहासिक घटना मानली जाते.

हे ही वाचा चाणक्य नीती

७) चेदी:

चेदी हे राज्य आधुनिक बुंदेलखंडच्या परिसरात होते. या राज्याचा काही भाग नेपाळच्या प्रदेशात पण होता. शुक्तिमती ही चेदी राज्याची राजधानी होती. खारवेलच्या हाथी-गुंफा येथील शिलालेखावरून कलिंगच्या प्रदेशात एक चेदी घराणे राज्य करीत होते.

८) वत्स :

वत्स हे राज्य अलाहाबादच्या परिसरात आणि यमुना नदीच्या काठावरच्या प्रदेशात पसरले होते. कोसम वा कोशांबी ही या राज्याची राजधानी होती. वत्स राज्याचा राजा उदयन हा तथागत गौतम बुध्द यांच्या समकालीन होता. अवंती राज्याचा राजा प्रद्योत याच्यासोबत उदयनचे नेहमी युद्ध चालत असे. पुढे राजा प्रद्योत याच्या कन्येसोबत उदयनचा विवाह झाला आणि या दोन राज्यांमधील संघर्ष थांबला. भासाचे ‘स्वप्नवासवदत्ता’ आणि हर्षाच्या ‘प्रियदर्शिका’  व ‘रत्नावली’ या नाटकांचा नायक राजा उदयन हाच आहे.

९) कुरु :

आजच्या काळातील दिल्ली, मेरठ आणि हरियानातील काही भाग यामध्ये कुरुंचे राज्य पसरले होते. इंद्रप्रस्थ म्हणजे आजची दिल्ली ही या राज्याची राजधानी होती. वैदिक काळात कुरुंच्या राज्याला मानाचे स्थान होते. यादव, पांचाल, भोज, मद्र इत्यादींशी  कुरुंचे वैवाहिक संबंध होते. प्रारंभी या राज्यामध्ये राजसत्ताक शासनपध्दती होती. परंतू पुढे हे राज्य गणराज्य बनले.

See also  Chanakya niti quotes information in marathi 2021 | चाणक्य नीति मराठी माहिती

१०) पांचाल :प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे विषयी माहिती 2021 | Mahajanpade In Marathi

आजच्या दिल्लीच्या उत्तरेस व पूर्वेस हिमालयाच्या पायथ्यापासून चम्बळपर्यंत पांचालाचे राज्य पसरले होते. या राज्याचे गंगा नदीमूळे उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल अशी दोन भागात विभागणी झाली होती. उत्त्तर प्रदेशातील कांपिल्य म्हणजे दक्षिण पांचालची राजधानी होय. तर अहिछत्रा ही उत्तर पांचालची राजधानी होती. अगोदर पांचालमध्ये राजसत्ताक शासनपध्दती होती.मात्र नंतर पांचाल संघराज्य बनले. पांचाल नरेश ब्रम्ह्दत्त याचा उल्लेख तत्कालीन ग्रंथांमध्ये होतो.

हे ही भारताचा ऐतिहासिक ठेवा : हंपी

११) मत्स्य :

आजच्या काळातील राजस्थानमधील जयपुर,भरतपुर आणि अल्वाड यांमध्ये मत्स्य राज्य होते. विराट राजाने विराटनगर हे शहर स्थापन करून त्याला मत्स्य राज्याची राजधानी बनविली.पुढे मगधने मत्स्य राज्य जिंकुन घेतले.

१२) शूरसेन :

मथुरा ही या राज्याची राजधानी होती. चेदी राज्याच्या पश्चिमेला आणि कुरु राज्याच्या दक्षिणेला हे शूरसेन राज्य पसरले होते. शूरसेन राजा हा तथागत गौतम बुद्ध यांच्या समकालीन आणि उपासकही होता. चाणक्यच्या अर्थशास्त्र या ग्रंथानुसार मथुरेच्या वृष्णी आणि अंधक या जमातींचे संघराज्य असावे. पुढे मगधाच्या साम्राज्यात हे राज्य विलीन झाले.

१३) अश्मक किंवा अश्वक :

अश्मक या राज्याबाबत दोन मतप्रवाह आहेत. पाणिनिचा अष्टाध्यायी ग्रंथ बृहत्संहिता, मार्कंडेय पूराण तसेच ग्रीक इतिहासकार यांच्या मते हे राज्य सिंधु नदीच्या प्रदेशात वायव्य भारतात होते. तर बौध्द ग्रंथांच्या मते दक्षिणेला गोदावरी नदीच्या प्रदेशात हे राज्य होते. भट्ट स्वामिन या कौटिल्याच्या भाष्यकाराने अश्मक हेच महाराष्ट्र होय असे म्हटले आहे. या राज्याची राजधानी आधुनिक काळातील पैठण असू शकते. अवंती राज्यासोबतच्या संघर्षात या राज्याचा पराभव होउन हे राज्य अवंतीमध्ये विलीन झाले.

१४) गांधार :

गांधार हे राज्य सध्याच्या अफगाणीस्थानातील कंदहार प्रांत तसेच पाकिस्तानातील पेशावर व रावळपिंडी या भागात पसरले होते. तक्षशिला ही या राज्याची राजधानी होती.इ.स.पू. सहाव्या शतकात पुष्करसारिन या गांधारच्या राजाने अवंतीच्या प्रद्योतचा पराभव केला होता.

१५) कांबोज :

सध्याच्या पाकिस्तानातील हजारा जिल्हा आणि वायव्य प्रांतातील काही भाग यामध्ये हे राज्य होते. गांधार राज्याच्या शेजारीच हे राज्य होते. चाणक्याने आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथात कांबोज हे संघराज्य असल्याचा उल्लेख केला आहे.

१६) अवंती :

पश्चिम मध्य भारतातील गुजरात, राजस्थान व माळव्याच्या प्रदेशात अवंतीचे विशाल असे राज्य होते . उज्जयनी या राज्याची राजधानी होती. प्रद्योत हा येथील राजा होता . त्याचे वत्स,मगध आणि कोसल या राज्यांसोबत सतत संघर्ष चाले . पुढे अवंतीचा राजा नंदीवर्धन याचा मगधाच्या शिशुनाग याने पराभव करून हे राज्य आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले .

मौर्यांची सत्ता स्थापन होईपर्यंत ही महाजनपदे  होती. त्यानंतर मात्र मौर्य काळात भारताचा बराच मोठा भूप्रदेश प्रथमच एकछत्री अंमलाखाली आला.

आपण ह्या पोस्ट मध्ये प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे बद्दल माहिती घेतली . तुम्हाला जर SAMUDRAGUPTA HISTORY IN MARATHI बद्दल माहिती जाणून घायची असेल तर तुम्ही हि पोस्ट वाचू शकता .

तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या वेबसाईटला भेट देऊ शकता.

 

Spread the love

5 thoughts on “प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे विषयी माहिती 2021 | Full Information About Mahajanpade In Marathi”

Leave a Comment