कुमारी कंदम हे काय होते ? | kumari kandam History In Marathi 2021

 कुमारी कंदम हे काय होते ? | kumari kandam History In Marathi 2021

Kumari kandam History In Marathi 2021)

आपली भारतीय संस्कृती ही एक अतिप्राचीन संस्कृती आहे. काळाच्या ओघात लुप्त झालेल्या भारतीय संस्कृतीतील पैलू समोर येत आहेत. 20 व्या शतकाच्या सुरुवातीस भारताच्या सिंधू संस्कृती विषयी जगाला माहित नव्हते. परंतु सिंधू संस्कृतीच्या पाऊलखुणा मिळालेल्या आहेत. त्याचप्रमाणे भारताच्या अतिप्राचीन संस्कृतीची साक्ष देणारे एक महाद्वीप समुद्रात विलीन झाले आहे असे म्हणतात.  भगवान श्रीकृष्णाची द्वारका नगरी ही समुद्रात बुडालेली आहे असे म्हणतात. त्या बाबत संशोधन सुरु आहे. या लेखात आपण त्याच द्वीपाची म्हणजेच कुमारी कंदम काय होते ? (Kumari kandam History In Marathi 2021) याबाबत माहिती घेऊ या.

कुमारी कंदमचा इतिहास : Kumari kandam History In Marathi 2021

19 व्या शतकातील अमेरिकन आणि युरोपीय संशोधकांच्या मते आफ्रिका,भारत आणि मादागास्कर यांमध्ये एक महाद्वीप होते. त्या महाद्विपाला त्यांनी लेमूरिया असे नाव दिले. त्याच दरम्यान त्यांनी आणखी एक महाद्वीप शोधले. त्या द्वीपला मु (mu) असे नाव दिले गेले.
आजच्या या काळात ज्याप्रमाणे ग्लोबल वॉर्मिगमुळे पृथ्वीवरील वातावरणात विनाशकारी बदल होत आहेत, त्याचप्रमाणे त्या काळात ही अशाच बदलांमुळे लेमूरिया आणि मु हे दोन महाद्वीप जलमय झाले.

फिलीप स्कोल्टर या संशोधकाच्या मते मानवाची उत्पत्ती या दोन महाद्वीपांवर झाली. हे दोन द्वीप भू – वैज्ञानिक हालचालीत समुद्रात विलीन झाले. इ. स.1903 मध्ये सूर्य कुमार यांनी सर्वात अगोदर या महाद्वीपास कुमारी कंदम असे नाव दिले.

महाप्रलयाचे सर्वच धर्मात वर्णन केले आहे. त्सुनामी, भूकंप आणि ज्वालामुखी हे आदिकालापासूनच आहेत.
तमिळ इतिहासकारांच्या मते लुमेरिया या महाद्वीपाचे नाव कुमारी कंदम (kumari kandam ) होते. त्यालाच कुमारीनाडू                ( kumarinadu) असेही म्हणतात.

See also  Chanakya's Strategy On Intelligence Associations 2021| चाणक्य यांची गुप्तचर यंत्रणेबाबत कुटनीति

प्राचीन तमिळ संस्कृतीचा ठेवा समुद्रात विलीन झाला. विद्वानांनी तमिळ आणि संस्कृत साहित्याचा आधार घेऊन कुमारी कंदमचा संबंध पांडियान राजांसोबत जोडला आहे. असे म्हणतात की, कुमारी कंदमच्या पंडीयन राजाचे संपूर्ण भारतीय महाद्वीपवर राज्य होते. दक्षिण भारतातील लोकगीतांतून तसेच लोक कथांतून काळाच्या पडद्याआड गेलेल्या या संस्कृतीचे वर्णन ऐकायला मिळते. लोकगीते आणि कथा या पूर्णपणे काल्पनिक किंवा चुकीच्या नसतात. त्यांना इतिहासाचा थोडाफार तरी आधार असतोच. तमिळ विचारवंत मानतात की आधुनिक मानवी संस्कृतीचा विकास येथेच झाला आहे.

काही विचारवंत या कुमारी कंदमचा संबंध रावणाच्या लंकेशी जोडतात. दक्षिण भारत आणि श्रीलंका यांना जोडणारा रामसेतू (Ramsetu) याच महाद्वीपवर आहे.

Kumari kandam History In Marathi 2021)
सौजन्य : www.flickr.com

फिलीप स्क्लेटर यांनी मादागास्कर आणि भारत याठिकाणी मोठ्याप्रमाणात वानरांचे जीवाश्म आढळतात त्यावरून तेथे असणाऱ्या संस्कृती बाबत अनुमान व्यक्त केले. या विषयाशी संबंधित ‘The Mammals Of Madagascar’ हे पुस्तक त्यांनी 1864 मध्ये प्रकाशित केले.

याचसोबत एल्फ्रेड रसेल आणि एर्नेस्ट हेकेल या संशोधकांच्या मते मानवाची उत्पत्ती या महाद्वीपवर झाली होती. लेमुरिया हा शब्द लेमुर या जीवा पासून तयार झाला. लेमुर या जीवाचे मूलस्थान मादागास्कर हे आहे. त्याचप्रमाणे हा जीव भारतामध्येही आढळला. त्यामुळे हा जीव येथून भारतात हिंदी महासागरात असलेल्या महाद्वीपवरूनच पोचला असेल.

 कुमारी कंदमचे क्षेत्र :

कुमारी कंदम हे उत्तरेला कन्याकुमारी पासून ते ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भाग आणि मादागास्कर पर्यंत पसरलेले होते. 14000 वर्षां पूर्वी जलमय झाल्यावर तेथील लोक इतरत्र पसरले असे म्हणतात.

भारताच्या समुद्र विज्ञान राष्ट्रीय संस्थेतील संशोधकांच्या मते साधारणतः 14500 वर्षांपूर्वी समुद्राचा स्तर आजच्या तुलनेत 100 मीटर खाली होता. तर 10000 वर्षांपूर्वी 60 मीटर खाली होता. त्यामुळे होऊ शकते की भारत आणि श्रीलंका यांना जोडणारा दुवा म्हणून रामसेतूच होता. कालांतराने हा भूभाग पाण्याखाली गेला.

कुमारी कंदमचा विनाश :

तमिळ विचारवंतांच्या मते कुमारी कंदम जलमय झाले तेव्हा त्याच्या 7000 मैल क्षेत्राचे 49 तुकड्यांमध्ये विभाजन झाले. हिमयुगाच्या शेवटी हे द्वीप समुद्रात विलीन झाले आणि तेथील लोक इतरत्र पसरले. या बाबत अधिक संशोधन होणे आवश्यक आहे. कारण कुमारी कंदम चा इतिहास काल्पनिक राहायला नको.

See also  Gautamiputra Satakarni history in marathi 2021| गौतमीपुत्र सातकर्णी माहिती

आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा.

तुम्हाला जर प्राचीन वैदिक संस्कतीबाबत माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील लिंकवर क्लिक करा.

Vedic culture in marathi 2021 | वैदिक संस्कृती महिती मराठी

तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.comया website ला पण भेट देऊ शकता.

स्त्रोत : गूगल

 

Spread the love

1 thought on “कुमारी कंदम हे काय होते ? | kumari kandam History In Marathi 2021”

Leave a Comment