Chanakya’s Strategy On Intelligence Associations 2021| चाणक्य यांची गुप्तचर यंत्रणेबाबत कुटनीति

Chanakya’s Strategy On Intelligence Associations 2021| चाणक्य यांची गुप्तचर यंत्रणेबाबत कुटनीति

Chanakya's Strategy On Intelligence Associations 2021

आर्य चाणक्य (chanakya) म्हणजेच कौटिल्य यांचे मूळ नाव विष्णुगुप्त होय. मगधच्या नंद वंशाचा नाश करून मौर्य साम्राज्याच्या स्थापनेला मार्गदर्शन करणारा महान विद्वान चाणक्य होय. मौर्य सम्राट चंद्रगुप्त याला केवळ मौर्य साम्राज्याची स्थापना करण्यातच मार्गदर्शन केले नाही तर साम्राज्याचा राज्यकारभार कसा चालवावा याबाबतही मार्गदर्शन केले. आर्य चाणक्य यांनी राजनिती (chanaky niti) शास्त्रावरील महान असा ‘अर्थशास्त्र ‘ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात राजाने आपल्या राज्याचा कारभार कसा चालवावा याबाबत मार्गदर्शन केले आहे.प्राचीन काळापासून राज्य रक्षणात हेरखात्याचा सिंहाचा वाटा आहे. राजाने आपले हेरखाते कसे करायचे याविषयी मार्गदर्शन आर्य चाणक्य यांनी ‘अर्थशास्त्र ‘ या ग्रंथात नमूद केले आहे. आजच्या या लेखात आर्य चाणक्य (Chanakya’s Strategy On Intelligence Associations 2021) यांची गुप्तचर यंत्रणेबाबत कुटनीति याविषयी केलेल्या मार्गदर्शनाविषयी माहिती घेऊ या.

आर्य चाणक्य यांनी सांगितलेले गुप्तचरांचे प्रकार :

Chanakya's Strategy On Intelligence Associations 2021
sourse  :  amazon.in

आर्य चाणक्य यांनी राजनिती शास्त्रावर विस्तृत विचार आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथात नमूद केले आहेत. त्या ग्रंथात राज्यकारभाराच्या विविध पैलूंची चर्चा केली आहे. गुप्तचर यंत्रणा याबाबतही त्यांनी अतिशय व्यापक स्वरूपात विचार मांडले आहेत. अर्थशास्त्र या ग्रंथात त्यांनी प्रकरण सात ते दहा यामध्ये गुप्तचर यंत्रणे बाबत मार्गदर्शन केले आहे.
आर्य चाणक्य गुप्तहेरांच्या एकूण नऊ प्रकार पाडतात. 1. कापटिक 2. उदास्थित 3. गृहपतिकव्यंजन 4.वैदेहकव्यंजन 5. तापस व्यंजन 6.सत्री 7. तीक्ष्ण 8.रसद 9. भिक्षुकी.

या नऊ प्रकारात आर्य चाणक्य यांनी गुप्तहेरांच्या वर्गीकरण केले आहे. या गुप्तहेरांच्या प्रकाराबाबत पुढीलप्रमाणे चाणक्य विस्ताराने सांगतात.

See also  Egypt mummy history in marathi 2021 | इजिप्त ममी आणि गिझाचे रहस्य

1. कापटिक : कापटिक या गुप्तहेरात विद्यार्थी असत. कापटिक म्हणजे असा गुप्तहेर की जो दुसऱ्यांची रहस्ये, गुपित जाणून घेण्यात निपुण आहे असा विद्यार्थी.

2. उदास्थित : उदास्थित हे संन्यास घेऊन त्यापासून च्युत झालेले बुद्धिमान लोक असतात.

3. गृहपतिकव्यंजन : गृहपतिकव्यंजन यामध्ये बुद्धिमान परंतु शुद्ध आचरणाचे शेतकरी असत.

4.वैदेहकव्यंजन : वैदेहक व्यंजन म्हणजे व्यापारी वेषातील गुप्तहेर. हा देखील बुद्धिमान आणि शुध्द आचरणाचा असणे गरजेचे होते.

5. तापसव्यंजन : तापसव्यंजन म्हणजे तपस्याच्या वेषातील गुप्तचर होय.

6. सत्री : राजाचे जे नातलग गुप्तचर आहेत त्यांना सत्री असे म्हणतात.

7. तीक्ष्ण : जे गुप्तचर प्राणाचीही पर्वा करीत नाहीत ते तीक्ष्ण होत.

8. भिक्षुकी : भिक्षुकी म्हणजे परिव्राजका झालेली दरिद्री पण धीट ब्राम्हण विधवा स्त्री होय.

9. रसद : हे विष देणारे गुप्तचर होत. क्रूर वृत्तीचे असलेले गुप्तचर यांना कोणाविषयी दया माया नसे.

Chanakya’s Strategy On Intelligence Associations 2021

हे गुप्तचर खूप महत्त्वाचे होते. त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असे. राज्यातील तसेच परराज्यातील गुप्त माहिती मिळविणे. शत्रूंच्या हालचालींची माहिती राजास देणे. परराज्यात अराजकता, फितुरी माजविणे. हे गुप्त हेरांचे प्रमुख कार्य असे. याशिवाय आणखी एक महत्त्वाचे या गुप्तचरांचे असे ते म्हणजे परराज्यातील महत्त्वाच्या व्यक्तींना फितूर बनविणे. कोणाला फितूर बनवायचे हेही आर्य चाणक्य यांनी नमूद केले आहे. फितूर होऊ शकणाऱ्या चार प्रकारच्या लोकांची माहिती आर्य चाणक्य यांनी दिली आहे.

फितूर होऊ शकणारे चार प्रकारचे लोक म्हणजे क्रुद्ध, भयभीत ,लोभी आणि मानी होत. या लोकांच्या भावनांचा फायदा आपले इप्सित साध्य करण्यासाठी घ्यावा.

याशिवाय उभयवेतन हेर ही राजाने ठेवावे. उभयवेतन हेर हे परराज्यात नोकरी करून गुप्त बातम्या आपल्या राजाला देत असत. त्यांच्या बातम्यांमुळे राजा योग्य ते पाऊल उचलत असत.

गुप्तहेरांनी कसे कार्य करावे ? x

आर्य चाणक्य हे एक महान विद्वान होते. त्यांनी आपल्या ग्रंथात नमूद केले आहे की गुप्तहेरांनी कसे कार्य करावे. आर्य चाणक्य म्हणतात की, तापसव्यंजन हेरांनी शहरापासून जवळच आपल्या शिष्यांसह वास्तव्य करावे. त्या शहरातील वैदेहकव्यंजन या गुप्तहेराचे जे काही माणसे असतील त्यांनी या तपस्व्याची म्हणजे तापस व्यंजन गुप्तहेराची पूजा करावी.तो एक महान सिद्ध पुरुष आहे अशी बातमी शहरात पसरावी. त्याचे भविष्य खरे ठरेल अशी तजवीज करावी. त्यातून त्या तपस्व्याकडे लोकांची रीघ लागेल. त्या भक्तजनातून काही महत्त्वाची बाब, काही भेद माहिती करून आपल्या राजाला ती माहिती द्यावी.

See also  Chankyachya Gupther vishakanya | चाणक्य विष कन्यांचा उपयोग कसा करायचे ?

Chanakya’s Strategy On Intelligence Associations 2021

अशाप्रकारे गुप्तहेरांनी परस्पर सहकार्याने माहिती मिळवावी आणि आपल्या राज्याचा फायदा करावा.
गुप्तचर यंत्रणेचे महत्त्व आजच्या काळात ही किती आहे हे आपणास माहीत आहे. ज्या देशाची गुप्तचर यंत्रणा कार्यक्षम असेल तो सर्वात समर्थशाली देश होऊ शकतो यात शंका नाही.

आर्य चाणक्य यांनी सांगितलेली राजनिती ( chanakya niti ) आजच्या काळात ही उपयोगी पडेल अशीच आहे.

आमचा Chanakya’s Strategy On Intelligence Associations 2021 हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा.

तुम्हाला जर चाणक्य नीती बाबत माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील लिंकवर जाऊन तुम्ही वाचू शकता.

Chanakya niti quotes information in marathi 2021 | चाणक्य नीति मराठी माहिती

तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या वेबसाईट ला पण भेट देऊ शकता.

Spread the love

Leave a Comment