चाणक्य विष कन्यांचा उपयोग कसा करायचे ? Chankyachya Gupther vishakanya

Chankyachya Gupther vishakanya | चाणक्य विष कन्यांचा उपयोग कसा करायचे ?

Chankyachya Gupther vishakanya

भारताच्या प्राचीन इतिहासात आचार्य चाणक्य हे एक महान कुटनीतीज्ञ म्हणून ओळखले जाते. आचार्य चाणक्य यांनी महान चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या द्वारे प्रथमच अखंड भारत जोडला. साम, दाम, दंड आणि भेद या नीतीने आचार्य चाणक्य याने मौर्य साम्राज्य बळकट केले. शत्रूचा अंत करण्यासाठी वा काही गुप्त बाबी बाहेर काढण्यासाठी आचार्य चाणक्यने (Chankyachya Gupther vishakanya) प्रसंगी सुंदर विषकन्यांचा उपयोग केला. याबाबतची माहिती आपण आजच्या या लेखात बघू या.

विषकन्या कशा तयार केल्या जात असत ? Chankyachya Gupther vishakanya

प्राचीन भारताच्या इतिहासात आचार्य चाणक्य हे एक मुत्सद्दी आणि कुतानितीचे जनक मानले जातात. त्यांनी महान चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे कडून अखंड भारताची पायाभरणी केली. साम,दाम, दंड आणि भेद या नितींचा अचूक आणि प्रभावी वापर करून मौर्य साम्राज्य अभेद्य केले होते. आपल्या शत्रूंचा नाश करण्यासाठी आणि गुप्त माहिती काढण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी विषकन्या (Vishkanya- PoisonDamsels) या गुप्तहेर तंताचा अचूक आणि कुशलतेने वापर केला होता. विषकन्या म्हणजे काय , त्या कशा तयार केल्या जात होत्या आणि इतिहासात त्या विषकन्यांचा वापर कश्याप्रकारे केला गेला होता याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊ या.

प्राचीन भारतात अत्यंत देखण्या आणि बुद्धिवान मुलींची निवड बालपणीच केली जात असे. त्या मुलींना शत्रूच्या विनाशासाठी एक जिवंत अस्त्र बनविण्यासाठी अत्यंत पद्धतशीरपणे प्रशिक्षण दिल्या जात असे.  विषकन्या म्हणून ज्या मुलींची निवड झालेली आहे अशा मुलींना त्यांच्या आहारात लहान वयापासूनच अत्यंत कमी प्रमाणात विष दिल्या जात असे. हे विष साप किंवा वनस्पतीचे असे. जसे त्यांचे वय वाढत जाई तसे विषाचे प्रमाण वाढविण्यात येई. त्यामुळे त्या मुलींच्या शरीराला विषाची सवय होत असे. त्या स्वतः विषप्रतिरोधक बनत असत. त्या स्वतः पूर्णपणे विषारी बनत असत. सापाच्या दंशानेही त्यांना काही बाधा येत नसे.

हे ही वाचा : आचार्य चाणक्य यांची कुटनीती

Chankyachya Gupther vishakanya

आचार्य चाणक्य विषकन्यांचा उपयोग कसे करीत असत ? Chankyachya Gupther vishakanya

आचार्य चाणक्य निपुण कुटनीतीज्ञ होते. राज्याच्या विकासाच्या वाटेत येणारे शत्रू वा स्वकीय यांचा काटा विषकन्यांचा उपयोग करून काढल्या जात असे. या विषकन्यांना योग्यप्रकारचे शिक्षण दिले जात असे. त्यामघ्ये शृंगारकलेसोबतच गायन,संगीत आणि नृत्य यांचे प्रशिक्षण त्यांना दिले जात असे.

हे ही वाचा : आचार्य चाणक्य यांची गुप्तहेर संघटनेबाबत कुटनीती

निपुण अशा या विषकन्या ज्याचा काटा काढायचा असेल त्या व्यक्तीला मोहित करण्याकरिता आचार्य चाणक्य सोडीत असत. या रूपवान विषकन्या त्या व्यक्तीसोबत रात्र घालवीत असत. पाहिजे ती माहिती त्या काढल्यानंतर त्या व्यक्तीला त्या ठार मारीत असत.

मुद्राराक्षस या प्रसिद्ध संकृत भाषेतील नाटकात असे वर्णन आहे कि, नंद सम्राट धनानंद याचा अमात्य याने  चंद्रगुप्त मौर्य याला मारण्यासाठी विषकन्या पाठविली होती.

आचार्य चाणक्य याला या कटाची माहिती मिळाली. आचार्य चाणक्य याने ही विषकन्या चंद्रगुप्ताला मदत करणाऱ्या एका राजाला भेट दिली. त्या रात्री हा राजा मरण पावला. आचार्य चाणक्य यांच्या या हुशारीने अनेक उद्देश सफल झाले. एक तर चंद्रगुप्त मौर्य यांचा जीव वाचला आणि पुढे मौर्य साम्राज्याच्या स्थापनेत अडसर ठरणाऱ्या त्या राजाचा काटा काढल्या गेला. त्यानंतर अमात्य आणि धनानंदाचे इतर अधिकारी चंद्रगुप्त मौर्य यांना मिळाले.

आचार्य चाणक्य यांनी मौर्य साम्राज्याच्या गुप्तहेर संघटनेत विषकन्यांचा सहभाग वाढविला. त्यातून गुप्तहेर संघटना मजबूत करून महान मौर्य साम्राज्याचा पाया मजबूत केला. राजा वा राज्य यांना धोकादायक ठरणाऱ्या शत्रू तसेच स्वकीय यांना आचार्य चाणक्य यांनी विषकन्यांचा उपयोग करून त्यांचा काटा काढला आणि मौर्य साम्राज्य सुरक्षित ठेवले.

आमचा Chankyachya Gupther vishakanya हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा आणि आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना शेयर करा.

तुम्ही आमच्या http://www.marathitrader.inया वेबसाईटला पण भेट देऊ शकता.

 

Spread the love

2 thoughts on “चाणक्य विष कन्यांचा उपयोग कसा करायचे ? Chankyachya Gupther vishakanya”

Leave a Comment