Vaishalichi Nagarvadhu Amrapali | आम्रपाली एक शापित सौंदर्यवती

Vaishalichi Nagarvadhu Amrapali | आम्रपाली एक शापित सौंदर्यवती

vaishalichi-nagarvadhu-amrapali
स्त्रोत : postoast.com

कुणासाठी सौंदर्य हे वरदान ठरते तर कुणासाठी शाप ! आम्रपालीचेच (vaishalichi-nagarvadhu-amrapali) बघा ना ! तिचे सौंदर्य हे तिच्यासाठी शापच ठरले होते. कोमल कांती, पाणीदार टपोरे डोळे, स्त्री सौंदर्याचा उत्कृष्ट नमुना असणाऱ्या आम्रपालीला नगरवधू (गणिका) बनावे लागले !  इ. स. पूर्व 500 मध्ये प्राचीन भारतातील आजच्या बिहारमध्ये असलेल्या वैशाली नगरातील आम्रपालीची ही करुण कहाणी. आम्रपालीच्या कहाणीविषयी माहिती आपल्याला जातक कथांमध्ये मिळते. आजच्या या लेखात आपण या वैशालीच्या आम्रपालीचा नगरवधू ते बौद्ध भिक्षुणी कशी झाली याबाबत माहिती जाणून घेऊ या.

आम्रपाली नगरवधू कशी बनली ? vaishalichi-nagarvadhu-amrapali

आम्रपाली कोण होती ? असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडला असेल. आम्रपालीचे आईवडील कोण होते त्याची माहिती ती मिळत नाही. ज्यांनी तिचे संगोपन केले त्यांना ती आंब्याच्या झाडाखाली मिळाली म्हणून तिचे नाव आम्रपाली ठेवले.

सौंदर्याची खाण असलेली आम्रपाली जशी जशी मोठी होत होती तशी तिच्या सौंदर्याची चर्चा सर्वत्र होत होती. प्रत्येकाला ती हवी होती. तत्कालीन ग्रंथांनुसार वैशालीतील प्रत्येक श्रीमंत तिच्याशी लग्न करू इच्छित होता. पाली भाषेतील ग्रंथांमध्ये आम्रपालीच्या अप्रतिम सौंदर्याचा उल्लेख आढळून येतो.

आता एकट्या आम्रपालीने कोणाशी लग्न करावे ? हा फार मोठा गहन प्रश्न होता. जर आम्रपालीने जर कोण्या एकाशी लग्न केले तर उर्वरित नाराज मंडळी वैशालीमध्ये रक्तपात करतील.

त्यामुळे त्यावेळी वैशाली नगरीत आम्रपालीसंबंधी एक सभा घेण्यात आली. त्यात आम्रपालीचे भविष्य ठरणार होते. रक्तपाताचे कारण देत आम्रपाली कोण्या एकाची न राहता पूर्ण नगराची म्हणजेच नगरवधू  राहील असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता आम्रपाली प्रत्येकाची होणार होती. तिला जनपथ कल्याणी ही उपाधी बहाल करण्यात आली.

See also  Socrates Information In Marathi | महान तत्वज्ञ सॉक्रेटीसबद्दल माहिती

येथे आम्रपालीच्या मनाचा , भावनांचा कोणीच विचार केला नाही. तिला काय हवे होते ? याच्याशी कोणालाही काही घेणेदेणे नव्हते. प्रत्येकाला मात्र ती हवी होती. अशाप्रकारे आम्रापालीचे सौंदर्यच तिला शाप ठरले.

हे ही वाचा : नालंदा विद्यापीठ

मगधचा सम्राट बिंबिसार आणि आम्रपाली : vaishalichi-nagarvadhu-amrapali

असे म्हटले जाते कि मगधचा सम्राट बिंबिसार हा देखील आम्रपालीच्या सौंदर्याने तिच्याकडे आकर्षित झाला होता. मगध आणि वैशालीमध्ये नेहमीच युद्ध होत असत.त्यामुळे मगध सम्राट बिंबिसार हा गुप्त वेशात आम्रपालीच्या महालात राहाला होता.

सम्राट बिंबिसार हा स्वतः उत्तम संगीतज्ञ होता. आम्रपाली आणि सम्राट बिंबिसार दोघेही एकमेकाच्या प्रेमात पडले. त्यांना एक मुलगाही झाला. त्याचे नाव विमल कौडिण्य. हाही पुढे भिक्षु बनला. परंतु सम्राट बिंबिसारचे खरे रूप उघड होताच तिने सम्राट बिंबिसारला तेथून निघून जाण्यास सांगितले आणि सुरु असलेले युद्ध थांबविण्यास सांगितले.

हे ही वाचा : प्राचीन भारतातील सोळा महाजन पदे

आम्रपाली भिक्षुणी कशी बनली ?

सौंदर्यवती आम्रपाली अशीच वैशालीतील लोकांचे मनोरंजन करीत आपले जीवन व्यतीत करीत होती. अशातच तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. ती नगरवधूची बौद्ध भिक्षुणी बनली.

त्याचे झाले असे कि, एकदा तथागत गौतम बुद्ध वैशाली नगरीत आले. त्यांच्यासोबत त्यांचे शिष्यगणही होते. तथागातांचे शिष्य रोज वैशालीत जाऊन भिक्षा मागित असत. असेच एकदा तथागातांचे शिष्य आम्रपालीच्या महालासमोरून जात होते. त्यातील एक शिष्य खूप तेजस्वी होता. त्या रूपवान शिष्याकडे ती आकर्षित झाली. तिने त्या तेजस्वी शिष्यास महालात भोजनाचे आमंत्रण दिले.

दुसऱ्या दिवशी तो शिष्य आपल्या सोबत्यांसह आम्रपालीच्या महालासमोर भिक्षापात्र घेऊन उपस्थित झाला. आम्रपालीने आजवर अनेक श्रीमंत लोक बघितले. पण हाती भिक्षापात्र असलेला हा तेजस्वी भिक्षु पाहून ती त्याच्याकडे आकर्षित झाली.

आम्रपालीने त्या तरुण तेजस्वी भिक्षुस आत येऊन भिक्षा ग्रहण करण्याची विनंती केली. हा तरुण रूपवान भिक्षु आत आल्यावर आम्रपाली त्यास म्हणाली कि, तीन दिवसानंतर वर्षाकालास प्रारंभ होत आहे. वर्षाकालाचे चार महिने त्याने तिच्या महालात वास्त्यव्य करावे. यावर तो तरुण भिक्षु बोलला कि, यासाठी मला माझ्या गुरूंची परवानगी घ्यावी लागेल. त्यांनी परवानगी दिली तरच मी येथे येईल. हे सर्व इतर शिष्य बघत होते. त्यांनी त्वरित जाऊन तथागत गौतम बुद्धांना ही वार्ता सांगितली.

See also  अलेक्झांडर द ग्रेट विषयी माहिती 2021 | Full Alexander The Great In Marathi
vaishalichi-nagarvadhu-amrapali
स्त्रोत: m.dailyhunt.in

आपला हा तरुण भिक्षु नंतर तथागत गौतम बुद्ध यांच्याकडे आला. झालेला वृत्तांत त्याने त्यांना सांगितला. मग तथागतांनी त्याच्याकडे काही क्षण बघत नंतर त्याला परवानगी दिली. इतर शिष्यगण मात्र गोंधळात पडले. त्यांना विश्वासच बसेना कि, तथागतांनी त्या तरुण भिक्षूला आम्रपालीच्या महालात राहण्याची परवानगी कशी दिली ?

तीन दिवसानंतर तो तरुण तेजस्वी भिक्षु आम्रपालीच्या महाली वास्त्यव्यास गेला. त्यामुळे वैशाली नगरीत त्या घटनेमुळे चर्चेस उधान आले. शिष्यांनी त्याची वार्ता तथागत गौतम बुद्ध यांना दिली. त्याचा तथागातांवर अजिबात परिणाम झाला नाही. ते म्हणाले कि, मला माझ्या शिष्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही फक्त तुमची दिनचर्या व्यवस्थित करा.

बघता बघता चार महिने उलटून गेले आणि तो तरुण तेजस्वी भिक्षु आश्रमात परत आला. पण येतांना तो एकटाच आला नाही तर त्याच्यासोबत आम्रापालीहीहोती !  ती तथागत गौतम बुद्धांना म्हणाली कि, तिने त्या शिष्यास हरप्रकारे वश करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या शिष्याने आपले मन अजिबात विचलित होऊ दिले नाही. त्याचा संयम आणि निग्रह बघता तिलाही संन्यस्थ जीवनाबद्दल ओढ निर्माण झाली. सर्वसंग परित्याग करून तिने बौद्ध धर्म स्वीकारून भिक्षुणी बनण्याचा मनोदय तथागतांजवळ बोलून दाखविला.

अशाप्रकारे आम्रपालीच्या जीवनाचा उद्धार झाला. एक नगरवधू ते भिक्षुणी असा हा आम्रपालीच्या जीवनाचा प्रवास आहे. तिने आपली सर्व संपत्ती लोकांना वाटून दिली आणि संन्यस्थ जीवन जगायला लागली.

आमचा vaishalichi-nagarvadhu-amrapali  हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा आणि आवडल्यास जरूर आपल्या मित्रांना आवर्जून शेअर करा.

तुम्ही आमच्या http://www.marathimahiti.com या वेबसाईटला भेट देऊ शकता.

स्त्रोत : गुगल

Spread the love

1 thought on “Vaishalichi Nagarvadhu Amrapali | आम्रपाली एक शापित सौंदर्यवती”

Leave a Comment